Home > मॅक्स ब्लॉग्ज > पाऊले चालती मानव्याची वाट...!!

पाऊले चालती मानव्याची वाट...!!

काँग्रेसने गेल्या काही काळाच फार खचता खाल्ल्या आहेत. अनेक निवडणुकांमध्ये पराभव पाहिला आहे. पण तरीही न डगमगता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभ्रमंती करणारी काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. भारत जोडो आधी देशभ्रमंती करणाऱ्या अशा किती पदयात्रा निघाल्या होत्या जाणून घ्या प्रकाश झावरे पाटील यांच्या या लेखात...

पाऊले चालती मानव्याची वाट...!!
X

काँग्रेसने गेल्या काही काळाच फार खचता खाल्ल्या आहेत. अनेक निवडणुकांमध्ये पराभव पाहिला आहे. पण तरीही न डगमगता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभ्रमंती करणारी काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. भारत जोडो आधी देशभ्रमंती करणाऱ्या अशा किती पदयात्रा निघाल्या होत्या जाणून घ्या प्रकाश झावरे पाटील यांच्या या लेखात...

सुप्रभात !

भारत जोडो !!

" पदभ्रमण " ही भारतीय सांस्कृतिक परंपरा आहे.अगदी आद्य शंकराचार्य देखील केरळ ते केदारनाथ पदभ्रमण करीत गेल्याची कथा आहे.ती सत्त्यही असू शकते..तो समकालीन ज्ञानमार्गाचा शोध असू शकतो ..

गौतम बुध्द आणि त्यांचे शिष्यांनी तर भारत आणि आशिया खंडातील अनेक देशात पदभ्रमण करुन धम्म प्रचार करीत मानवतेचा व शांतीचा संदेश दिला...

वारकरी पंथही शेकडो वर्षे मर्यादित असले तरी वार्षिक वारी भ्रमण करतोच...

गांधीजींची " दांडी यात्रा " ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचवीणारी ठरली. एरवीही महात्मा पदभ्रमण प्राधान्यक्रमाने करीत..

विनोबांचा ( विनोबा भावे .."भक्तांचे" माहितीसाठी आडनाव नमूद केले )भूदान यज्ञ..पदभ्रमणातूनच साकारला होता..!

समाजवादी चंद्रशेखर यांनीही भारत यात्रा काढली होती...

कोरोना काळात लाखो गरीब आबालवृद्ध श्रमजीवी देशभर प्रचंड हालअपेष्टा , पिळवणूक सहन करीत हजारो किलोमीटर पदभ्रमण आपल्या गावी पोहचले...या यात्रेत शेकडो नि:ष्पाप भूतिर्थी पडले ..त्यांचे आपल्या समाजव्यवस्थेला तळतळाट लागले असतील.......!

.

.

आता राहुल गांधी यांची " भारत जोडो"पदयात्रा नक्कीच नियोजनबध्द, शिस्तबद्ध, साधनसंपन्न आहे. परंतु ही यात्राही पदयात्राच आहे. राहुल गांधी यांच्या दैनिक उत्साहास उत्स्फुर्त व मनस्वी दाद द्यावीच लागेल. रस्त्यावर,गावागावातील, शहराशहरातील सर्व वर्गीय, धर्मीयांचे जीवन त्यांना प्रत्यक्ष दर्शी होईल...व्यथा समजतील, वेदना समजतील..

पदभ्रमण माणसाला परिपूर्ण करते..!!

पाऊले चालती मानव्याची वाट...!!

प्रकाश झावरे पाटील

Updated : 11 Sep 2022 6:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top