Home > मॅक्स ब्लॉग्ज > अमेरिकेतील राष्ट्रीयत्व “आर्थिक” तर भारतातील “धर्माधारित” – संजीव चांदोरकर

अमेरिकेतील राष्ट्रीयत्व “आर्थिक” तर भारतातील “धर्माधारित” – संजीव चांदोरकर

अमेरिकेतील राष्ट्रीयत्व “आर्थिक” तर भारतातील “धर्माधारित” – संजीव चांदोरकर
X

कौशिक बसू हे अर्थतज्ञांमधील मोठे नाव, मेनस्ट्रीममधील. त्यांनी भारतातील धार्मिक उन्माद आणि अमेरिकेतील ट्रम्प यांची “अमेरिका फर्स्ट” घोषणा यांची तुलना केली आहे. भारतातील घडवून आणलेलं ध्रुवीकरण भारताच्या अर्थव्यस्वस्थेवर गंभीर विपरीत परिणाम करेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

भारतातील “अतिरेकी राष्ट्रवादाला” धार्मिक मुलामा चढवण्यात आला आहे. तर अमेरिकेतील ट्रम्प यांच्या “अमेरिका फर्स्ट” या घोषणेचा गाभा पूर्णपणे आर्थिक आहे. सत्तेवर येतांना, सत्तेवर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना “मी अमेरिकेच्या हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य देईन” अशा घोषणा दिल्या. ट्रांसटलांटिक आणि पॅसिफिक व्यापार करार गुंडाळून ठेवले. कॅनडा, मेक्सिको बरोबरचा NAFTA करारात बदल करावयास लावले.

चीनविरुद्ध पंगा घेतला. अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांना दुसऱ्या देशात जाऊन उत्पादन न करता अमेरिकेतच करण्यासाठी दडपण आणले. त्याचा फायदा अमेरिकेत काही प्रमाणात रोजगार वाढण्यात नक्की झाला आहे;

(डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक गोष्टींवर टीका केली पाहिजे पण तो लेखाचा विषय नाही)

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी राबवलेल्या जागतिकीकरणाच्या गेल्या चाळीस वर्षाच्या प्रचलित फॉरमॅटला आव्हान तर नक्कीच मिळू लागले आहे. आपल्या देशातील “नेशन स्टेट” जागतिक भांडवलासाठी नाही तर सामान्य नागरिकांच्या हितासाठी राबवले जाईल. हे यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे.

पण भारतात बहुसंख्यांकवाद आणि राष्ट्रीयत्व यांचे असे काही बेमालूम मिश्रण लोकांना पाजण्यात आले आहे. की त्यांचे जीवन-मरणाचे भौतिक प्रश्न सुद्धा त्यांना पडेनासे झाले आहेत.

Updated : 7 Jan 2020 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top