Home > मॅक्स ब्लॉग्ज > #KargilVijayDiwas: 'हे' आहेत कारगील विजयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

#KargilVijayDiwas: 'हे' आहेत कारगील विजयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

#KargilVijayDiwas: हे आहेत कारगील विजयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी
X

कारगिल विजय दिवस... भारतीय सैन्याच्या शौर्याचं प्रतिक असणारा दिवस... 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचं स्मरणं म्हणून हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या कारगिल या उंच शिखरांवर घुसखोरी केली होती. 14 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले 500 सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध 60 दिवस सुरु होते त्यामुळे भारतीय इतिहासात हे युद्ध लष्कराच्या पराक्रमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला.

कारगिल युद्धाचे महत्त्वाचे मुद्दे:

१) 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती, कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 1999 साली झाले होते.

2) या युद्धाच्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते.

3) कारगिल सेक्टरमध्ये आलेल्या घुसखोरांना सीमेपार करण्यासाठी हे युद्ध झाले होते.

4) हे युद्ध प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ 1999 साली मे ते जूलै या महिन्यांमध्ये झाले.

5) दोन अण्वस्त्रधारी सत्ता एकमेकांसमोर ठाकण्याच्या दुर्मिळ घटनेपैकी एक ही घटना होती.

6) दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य यांना शोधून काढण्यासाठी प्रथमच हवाई दलाचा वापर करण्यात आला. यावेळेस भारताने सफेदसागर या नावाने हवाई कारवाई केली.

7) कारगिल युद्ध हे समुद्रसपाटीपासून अत्यंत उंच प्रदेशात लढले गेल्याने असे युद्ध लढण्यासाठी अत्यंत अवघड समजले जाते.

8) ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 14 जुलै रोजी जाहीर केले.

9) 26 जुलै रोजी ऑपरेशन विजय अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर करण्यात आले.

10) या युद्धात भारताच्या 500 लोकांना हौतात्म्य आले. तर भारतीय सैन्याने 3000 पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Updated : 26 July 2021 4:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top