Home > मॅक्स ब्लॉग्ज > तापमान वाढीच्या समस्यांच्या निवारणासाठी जंगल वाचविणे आवश्यक

तापमान वाढीच्या समस्यांच्या निवारणासाठी जंगल वाचविणे आवश्यक

वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे की, यावर्षी जंगलातील आगीमुळे जगभरातील अंदाजे 40 कोटी हेक्टर जमीन नष्ट झाली आहे. या संदर्भातीली लेखक विचारवंत विकास मेश्राम यांचा सविस्तर लेख

तापमान वाढीच्या समस्यांच्या निवारणासाठी जंगल वाचविणे आवश्यक
X

वाढत्या तापमान वाढीला जंगलातील आग कारणीभूत आहे असे संशोधकांचे म्हणणे असून जंगलात आग लागण्याच्या घटनांवर प्रकाश टाकणारा अहवाल नेचर मासिकात प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार, यावर्षी जंगलातील आगीतून 6.5 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित झाला असून जो आतापर्यंतचा सर्वाधिक उत्सर्जन आहे. वाढत्या तापमानाला कारणीभूत जंगलांना आग लावणे हे आहे या घटनांमध्ये अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर मोठ्या प्रमाणात जनावरेही दगावली आहेत.

जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते कारण या मध्ये कार्बन डायऑक्साइड व्यतिरिक्त, कार्बन मोनोऑक्साइड, राख ,कार्बनसारखे धोकादायक आणि विषारी कण हवेत सोडते. हे शेकडो किलोमीटरच्या हवेच्या गुणवत्तेत मोठ्या बदलांसाठी जबाबदार आहेत. याचा परिसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. हे केवळ परिसंस्थेवरच नव्हे तर आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम करतात.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मध्य आफ्रिका हा जंगलातील आगीमुळे वायू प्रदूषणाने सर्वाधिक प्रभावित झालेला प्रदेश होता. जर आपण आपल्या भारत देशाबद्दल बोललो तर, भारतीय वन सर्वेक्षणानुसार, नोव्हेंबर 2022 ते जून 2023 दरम्यान, एकूण 2,12,249 आगीच्या घटना घडल्या. या मध्ये

आगीच्या सर्वाधिक घटना ओरिसात घडल्या आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. हिमाचल आणि उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांनाही याचा फटका बसला. अशाप्रकारे, देशातील जंगलातील आगीमुळे मोठ्या वनक्षेत्रावर परिणाम झाला. अशा परिस्थितीत हे आकडे आपल्या चिंतेत प्रचंड वाढ करणार आहेत. जिथे जिथे आग लागली तिथे जंगल संपत्तीचे मोठे नुकसान झाले हे विशेष या मध्ये झाडे जळून नष्ट होत होतात आणि लहान प्राणी आगीत मरत आहेत.

जंगलात आग लागण्याच्या घटनांमागे तापमानात झालेली वाढ हे प्रमुख कारण मानले जाते. अशा परिस्थितीत हवामान बदल रोखण्यासाठी प्रयत्न वाढवले ​​नाहीत तर पृथ्वीवरील धोके वाढतच जातील हे निश्चित. झपाट्याने वाढणारा पारा आणि पावसाअभावी जंगलातील छोटी खुरटी झाडे होत आहेत. वास्तविक, जंगलातील आग आणि त्याचा प्रसार होण्यात हवामानाचा मोठा वाटा आहे. कमी पावसामुळे दुष्काळ पडतो, त्यामुळे तापमान वाढते आणि उष्ण वारे जंगलातील आगींसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. दुष्काळामुळे कडक सूर्यप्रकाशात झाडे, गवत आणि छोटी जंगले सुकू लागतात आणि पृथ्वीही खूप उष्ण होते. DW या जर्मन वेबसाइटवर प्रकाशित झालेला एक लेख या घटनांवर उल्लेखनीय प्रकाश टाकला आहे.

जानेवारी 2024 च्या पहिल्या आठ दिवसांत उत्तराखंडच्या जंगलात 29 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. देशभरात ही संख्या 89 आहे. आगीच्या या घटनांमुळे चिंता वाढली आहे कारण फेब्रुवारी ते जून या काळात जंगलात आगी लागण्याच्या घटना घडतात.नेचर मासिकाच्या अहवालात शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 95 टक्के जंगलातील आग माणसांमुळे लागते. गेली 35 वर्षे जागतिक तापमानवाढीमुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून त्याला थेट मानवच जबाबदार आहे. कोळसा, तेल आणि वायू जाळल्यामुळे होणाऱ्या हवामान बदलामुळे जंगलांना आग लागण्याचा धोका 34 ते 60 टक्क्यांनी वाढला आहे.

जर तापमान असेच वाढत राहिल्यास जंगले जळत राहतील कारण जंगलात आग लागण्यासाठी तीन घटक आवश्यक असतात. उष्णता, इंधन आणि ऑक्सिजन. यापैकी एकही गोष्ट नसेल तर आग लागणार नाही. आपल्या सभोवतालच्या हवेत ऑक्सिजन असतो. झाडांच्या कोरड्या फांद्या आणि पाने इंधन म्हणून काम करतात. एक लहान ठिणगी उष्णता म्हणून काम करू शकते.उन्हाळ्यात सर्वाधिक आगीच्या घटना घडतात. या हंगामात, संपूर्ण जंगलाला आग लावण्यासाठी एक लहान ठिणगी देखील पुरेशी आहे. ही ठिणगी जंगलातून जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांमधून आणि झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासल्यामुळेही येऊ शकते. सूर्याच्या तीव्र किरणांमुळेही कधीकधी आग लागते. गेल्या काही वर्षांत तापमानात वाढ झाल्याने जगभरात जंगले जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या हवामानाचा विचार करता आगामी काळात अडचणी आणखी वाढू शकतात. जंगलातील आगीमुळे केवळ प्राणीच नव्हे तर वनसंपत्तीचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे जंगलातील आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या काळातही जर चिंतेची भावना निर्माण होत नसेल, तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे. नजीकच्या भविष्यात केवळ हवामानातील बदल थांबवून चालणार नाही, तर वन व्यवस्थापनासाठी योग्य योजना राबवाव्या लागतील, अन्यथा आगीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होणे निश्चित आहे.

-- विकास परसराम मेश्राम


Updated : 12 Jan 2024 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top