Home > मॅक्स ब्लॉग्ज > बांगलादेश, पाकिस्तान एकत्रित करून अखंड भारत पुन्हा निर्माण होणे शक्य आहे का?

बांगलादेश, पाकिस्तान एकत्रित करून अखंड भारत पुन्हा निर्माण होणे शक्य आहे का?

चार राज्यांमधील भाजपच्या विजयानंतर अनेकांनी अखंड भारताच्या बाता मारण्यास सुरूवात केली आहे. पण अखंड भारताची पुनर्निर्मिती शक्य आहे का, केवळ भक्तांना बरे वाटावे म्हणून अशी वक्तव्य केली जातात का, अखंड भारताच्या निर्मितीचे केवळ थोतांड कसे आहे, याचे विश्लेषण केले आहे आनंद शितोळे यांनी....

बांगलादेश, पाकिस्तान एकत्रित करून अखंड भारत पुन्हा निर्माण होणे शक्य आहे का?
X

चार राज्यांमधील भाजपच्या विजयानंतर अनेकांनी अखंड भारताच्या बाता मारण्यास सुरूवात केली आहे. पण अखंड भारताची पुनर्निर्मिती शक्य आहे का, केवळ भक्तांना बरे वाटावे म्हणून अशी वक्तव्य केली जातात का, अखंड भारताच्या निर्मितीचे केवळ थोतांड कसे आहे, याचे विश्लेषण केले आहे आनंद शितोळे यांनी....

अधून मधून अखंड भारताचे कडक डोहाळे अनेकांना लागतात, कधी भागवतकाका कधी अजून कुणीतरी जागं होत आणि मग ढोल ताशे नगारे वाजायवायला भक्तगण सुरु होतात. यूपीमध्ये संघाची सत्ता आल्यावर हे सुरू झालेलं आहे. समजा भक्तांच्या म्हणण्यानुसार बांगलादेश, पाकिस्तान एकत्रित करून अखंड भारत पुन्हा निर्माण झाला तर काय होईल?

भारताची लोकसंख्या १३९ कोटी, पाकिस्तानची २२.५० कोटी आणि बांगलादेश १६.६३ कोटी. भारतात ५४३ खासदार आहेत, म्हणजे २५ लाख लोकसंख्येला एक खासदार. पाकिस्तानचे खासदार होतील ९० आणि बांगलादेश चे खासदार होतील ६६. एकूण खासदारांची संख्या ६९९ , म्हणजे स्पष्ट बहुमताला किमान ३५० खासदार लागणार.

आता भाजपचे सध्याचे खासदार किती आहेत याचा हिशोब लावा आणि मग नव्या लोकसभेत कुणाचे बहुमत राहील आणि कोण विरोधी पक्षनेता राहील याचा विचार करा. शिवाय या १७८ कोटी लोकांची पोट भरायची ही जबाबदारी सरकारची असेल. मग आपल्याला बांगलादेश आणि पाकिस्तानची भूमी, नैसर्गिक साधन, खनिज,बंदर, संपत्ती हवीय पण तिथली लोक नकोत असं आहे का ?

मग ही ४० कोटी लोक कुठ धाडायची? श्रीलंकेत की अफगाणिस्थानमध्ये की चीनमध्ये की नेपाळमध्ये की थेट रशियात? या ४० कोटी लोकांचे स्थलांतर करायला लागणारा पैसा, यंत्रणा ,साधन, वाहने यांचा खर्च किती? आणि ही लोक सुखासुखी जातील ? परागंदा होतील ?

समजा ४० कोटी मारायची ठरली तर नजीकच्या काळातील रशिया युक्रेन युद्धाचे उदाहरण ताजे आहे, असला आचरटपणा करायला गेलात आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध आले तर इंधन, अन्नधान्य आणि इतर हजारो गोष्टींचा तुटवडा होऊन तुमचेच कथित हिंदू बांधव तडफडत राहतील.

आपल्याच सरकारच्या अत्याचाराने पिडीत झालेले शरणार्थी जेव्हा लाखोंच्या संख्येने भारतात घुसायला लागले तेव्हा इंदिरा गांधीना कठोर पावल उचलून बांगलादेश निर्मिती करावी लागली. ४० कोटी लोकांचे तुम्ही नेमकं काय करणार हा प्रश्न आधी सोडवायला लागणार आणि मग ढोलताशे नगारे वाजवायला सुरुवात करायची.

बाकी या अखंड भारताच्या भंपक,बाष्कळ,अव्यवहार्य मृगजळाच्या मागे धावणारे मंदबुद्धी आणि माठ लोक आहेत, याची खात्री भागवत आणि कंपूला आहे म्हणूनच या पिचक्या पिपाण्या अधूनमधून वाजवण्याची उबळ त्यांना येते आणि त्या पिपाण्यांना रणवाद्य समजून नसलेली छाती फुगवून ढोल वाजवायची उबळ भक्तांना येते.

आनंद शितोळे

#आयरनीच्या_देवा

#अखंडभारताचेथोतांड

#रविवारची_पोस्ट

Updated : 13 March 2022 2:49 AM GMT
Next Story
Share it
Top