Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > कामगारांचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य : अच्युत गोडबोले

कामगारांचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य : अच्युत गोडबोले

कामगारांचा संघर्ष आपण विसरत चाललो आहोत का? आंतराराष्ट्रीय पातळीवर कामगारांची चळवळ कधी आणि कशासाठी सुरु झाली? कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतात असंघटित कामगारांची सद्यस्थिती काय? वाचा लेखक, अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचं महत्त्वपूर्ण विश्लेषण कामगारांचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य

कामगारांचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य : अच्युत गोडबोले
X

कामगारांचा संघर्ष आपण विसरत चाललो आहोत का? आंतराराष्ट्रीय पातळीवर कामगारांची चळवळ कधी आणि कशासाठी सुरु झाली? कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतात असंघटित कामगारांची सद्यस्थिती काय? कामगारांचा इतिहास सद्यस्थिती आणि भवितव्य यावर ज्येष्ठ लेखक, अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बातचीत केली आहे.

अच्युत गोडबोले सांगतात की... 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याआधी बॉम्बे नावाचं राज्य होतं. यात आजचा महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन्ही राज्यांचा समावेश 'बॉम्बे' या राज्यात होता. त्यानंतर भाषेच्या प्रमाणे याच दोन राज्याचं विभाजन झाले. गुजराती आणि कच्छच्या लोकांचं गुजरात राज्य झाले तर मराठी, कोकणी भाषिक लोकांचं महाराष्ट्र असं एक नवीन राज्य निर्माण झालं. हे विभाजन बॉम्बे रिऑर्गनाझेशन ॲक्टनुसार करण्यात आली.

खर म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी 1940 सालापासून चळवळीला सुरुवात झाली. महाराष्ट्राला वेगळं राज्य असावं म्हणून ही चळवळ सुरु करण्यात आली. संयुक्त महासभा ऑर्गनाझेशन असं त्याचं नाव होतं. परंतु 1942 साली क्विट इंडिया चळवळ सुरु झाली. यात महाराष्ट्रासाठीची चळवळ मागे पडत गेली. 1956 साली पंडित नेहरू यांनी बॉम्बे हे युनियन टेरेटरी म्हणून जाहीर केलं. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला. यात प्र. के. अत्रे, एस.एम. जोशी, अमृत डांगे, नागगोरे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, मधु दंडवते इ. लेखक, पत्रकार, राजकीय नेते इत्यादींचा सहभाग होता. एस. एम. जोशी हे सुसंकृत आणि मवाळ लिखाणासाठी प्रसिद्ध होते तर अत्रे हे आक्रमकतेने लिखाण करायचे. त्यावेळी पंडित नेहरू, मोरारजी देसाई आणि स. खा. पाटील या तिघांवरही टीका करायचे. महाराष्ट्र मुंबई सकट हवा होता आणि मुंबई कुठे जावी हा त्यावेळी खूप मोठा वाद होता.

दरम्यान, आज महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन देखील आहे. मात्र महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण कामगार दिनाचा इतिहास विसरता कामा नये. असं म्हणत अच्युत गोडबोले यांनी कामगार चळवळीचा इतिहास मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितला.. ते म्हणतात... 19 व्या शतकात जर्मनी, फ्रांस, इंग्लंड, अमेरिका अनेक राष्ट्रांमध्ये कामगार चळवळीने जोर धरला होता. कामगारांच्या कामाचे तास या विषयावरुन कामगारांच्या चळवळी सुरु झाल्या होत्या. 1848 साली कार्ल मार्स्क ने 'कम्युनिस्ट मेनिफेस्टो' लिहिला. त्यामुळे कामगार चळवळीला मोठा दिलासा आणि चालना मिळाली.

15 तासांचे 8 तास कसे झाले?

4 मे 1886 साली शिकागोच्या हे मार्केट अफेयर्सजवळ कामगारांनी आम्हाला 8 तासाचा दिवस असला पाहिजे. यासाठी मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी हल्ला केला त्यात 11 लोकांचा मृत्यू झाला. शेकडो लोकांना तुरुंगात टाकलं. याचे पडसाद जगभरात उमटले. अखेर 1916 साली कामगारांना 15 तासांच्या दिवसापासून सुटका मिळत त्यांच्या कामाचा दिवस हा 8 तासांचा झाला. हे मार्केट अफेअर्स येथील मोर्चा कामगार चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे.

1 मे कामगार दिन म्हणून का घोषित करण्यात आला? भारतात कधी पासून सुरु झाला कामगार दिन? कामगार ही देशाची शक्ती असून कामगार दिनाचे महत्त्व, इतिहास आपण विसरतोय का? आजच्या तरुण पिढीला कामगार दिनाचं महत्त्व माहिती आहे का? कामगारांची सद्यस्थिती काय आहे? जागतिकीकरणामुळे कुणाचा फायदा झाला? आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचा इतिहास सांगताना भारतात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर कामगारांची, असंघटितांची सद्यस्थिती नेमकी काय आहे. या प्रश्नांवर लेखक आणि अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केलेलं सखोल विश्लेषण... पाहा हा व्हिडिओ..

Updated : 2021-05-01T16:09:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top