Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारतमातेचा खून झाला? राहुल गांधींना नक्की काय दर्शवायच आहे ?

भारतमातेचा खून झाला? राहुल गांधींना नक्की काय दर्शवायच आहे ?

मणिपुरमध्ये भारतमातेची हत्या झाली म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi)भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींच्या या वाक्यांमधून त्यांनी भविष्यातील रणनीती उघड केली आहे. वाचा सागर गोतपागर यांनी केलेले विश्लेषण......

भारतमातेचा खून झाला? राहुल गांधींना नक्की काय दर्शवायच आहे ?
X

“आपने मणिपूर मे हिंदुस्तान की हत्या की है, भारत माता की हत्या की है” म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi)लोकसभा अधिवेशनातील भाषणात भाजपवर(Bharatiy janata party) जोरदार हल्ला चढवला. आपल्या भाषणात त्यांनी मणिपूर दौऱ्यातील दोन महत्वाचे अनुभव ताकतीने मांडले. त्यातील एक अनुभव असा,

“ मैतेई (meitei tribe)भागात भेट देण्यासाठी गेल्यावर त्यांना सांगण्यात आले की तुमच्या सुरक्षेमध्ये कुकी कर्मचारी असेल तर त्याला इथे आणू नका अन्यथा आम्ही त्याला मारून टाकू. कुकी (kuki tribe)भागात गेल्यानंतर सांगण्यात आले की तुमच्या सुरक्षेत मैतेई असेल तर त्याला आम्ही ठार मारू. त्यामुळे आम्हाला कुकी आणि मैतेई यांना वेगळ करावे लागले. त्यामुळे हे राज्य एकसंघ राहिलेले नाही. त्याचे दोन तुकडे झालेले आहेत”.

याच भाषणात राहुल गांधीनी दुसरा अनुभव सांगितला,

“मी मणिपूरमधील (manipur violence)मदत छावण्यांमध्ये गेलो. मी तेथील एका महिलेला विचारले की तुमच्यासोबत काय घडलं? ती महिला म्हणाली,’माझा एकच छोटा मुलगा होता. माझ्यासमोर त्याला गोळ्या घातल्या. मी रात्रभर त्याच्या मृतदेहाशेजारी बसून होते. नंतर मी भीतीने घर सोडले. जे माझ्याजवळ होते ते सर्व सोडून मी आले. मी त्या महिलेला विचारलं काहीतरी सोबत आणलं असेल? काहीच नाही म्हणत तिने इकडे तिकडे शोधून मुलाचा फोटो दाखवला व म्हणाली आता फक्त इतकच माझ्याजवळ राहिलेलं आहे.

या अनुभवांच्या आधारे राहुल गांधींनी मणिपूर येथे भारत मातेची हत्या झाल्याचे सांगितले. विविधतेतील एकता हा भारताचा आवाज आहे. विविध जाती धर्म आणि संस्कृतीचा मिलाफ हा भारताचा आवाज आहे. मणिपूर मध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार न पाडून भारताची ओळख असलेला हा आवाज संपविण्याचा प्रयत्न केला गेला. मणिपूर मध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत. हिंसा होईपर्यंत सरकारने पावले उचलली नाहीत. सरकाराला ही हिंसा थांबवता आली असती. हिंसा थांबवण्यासाठी सरकारकडे विविध आयुधे उपलब्ध होती. पण ही आयुधे सरकारकडून वापरलीच गेली नाहीत. असा राहुल गांधींच्या एकूण भाषणाचा सार होता. या भाषणाचा प्रतिवाद करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा भारतमातेचा खून झाला असा उल्लेख इतिहासात पहिल्यांदा केला गेला. भारत मातेचा खून झाला असे म्हणताना विरोधक बाक वाजवत होते असे भावनिक अनावश्यक मुद्द्यांचा आधार घेत कॉंग्रेस काळात झालेल्या घटनांचा पाढा वाचला.

विरोधकांनी मणिपूरच्या प्रश्नावर चर्चा घडऊन आणण्यासाठी अविश्वासाचा ठराव आणला. पंतप्रधानांनी या प्रश्नावर बोलावे यासाठी लोकसभेतील हे आयुध वापरले परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या २ तास १३ मिनिटांच्या भाषणात केवळ दोन अडीज मिनिटे मणिपूरच्या विषयावर बोलले. वास्तविक पाहता त्यांनी मणिपुरमधील जनतेच्या मानवी हक्काचे होत असलेले उल्लंघन, आयडिया ऑफ इंडिया(Idea of India) या तत्वाला दिली जात असलेली तिलांजली, यावर सरकार म्हणून बोलणे गरजेचे होते. मणिपूर मधील स्थिती हाताळण्यास सरकार अपयशी आहे या राहुल गांधींच्या टीकेवर उत्तर देणे गरजेचे होते. येथील शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सरकारकडून केले जात असलेल्या प्रयत्नांचे स्पष्टीकरण देणे गरजेचे होते. पण त्यांनी ते केले नाही.

या उलट राहुल गांधींच्या (rahul gandhi speech in parliament)भाषणामुळे मणिपूरचा प्रश्न केंद्रस्थानी आला. देशाच्या मुलभूत तत्वाचा खून झाला आहे. हा खून होणे म्हणजेच भारताचाच खून होणे आहे. जातीय धार्मिक दंगली होणे म्हणजे भारताचा खून होणे आहे. देशाचे धार्मिक विभाजन होणे म्हणजे भारताचा खून आहे. हे प्रभावी समीकरण एकूण देशाच्या पातळीवर ठसवण्यात राहुल गांधी यशस्वी झालेले आहेत. देशाच्या सार्वभौमत्वाला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती देशाचे खुनी आहेत. असा अत्यंत प्रभावी मुलभूत मुद्दा राहुल गांधींनी या भाषणातून समोर आणला आहे. कॉंग्रेस या मुद्द्याला विविध राज्यात होणाऱ्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या घटनांना कशी जोडते, हे मुद्दे मतदारांपर्यंत कसे घेऊन जाते यावर भविष्यातील यश अवलंबून आहे....

Updated : 12 Aug 2023 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top