Home > मॅक्स ब्लॉग्ज > जोरम मध्ये फक्त मनोज वाजपेयीच नाही स्मिता तांबे सुद्धा गेली भाव खाऊन

जोरम मध्ये फक्त मनोज वाजपेयीच नाही स्मिता तांबे सुद्धा गेली भाव खाऊन

जोरम मध्ये फक्त मनोज वाजपेयीच नाही स्मिता तांबे सुद्धा गेली भाव खाऊन
X

नुकताच देवाशिष माखिजा दिग्दर्शित चित्रपट जोरम प्रदर्शित होऊन गेला . चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर म्हणावा तितकासा व्यवसाय केला नसला तरी चित्रपटाचे बरच कौतुक झालं आहे.दिग्दर्शक देवाशिष माखिजा ने आदिवासी समाजाचे जीवन अतिशय उत्तमरित्या पडद्यावर मांडलय.

bandit queen या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या मनोज वाजपेयी यांनी जोरम मध्ये अप्रतिम भूमिका केली आहे त्यांनी साकारलेलीआदिवासी दसरु च्या भूमिकेचं कौतुक फक्त समीक्षकच नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा केलय. सर्वानी त्यांच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलय.

आणि या चित्रपटात फक्त मनोज वाजपेयीच नाही तर स्मिता तांबे सुद्धा भाव खाऊन गेलीय तिच्या अभिनयाचं कौतुक सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या अभिनयानं तर समीक्षकांच्या मनात घर केलय.. तिने साकारलेली फुलो करमा ची भूमिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आणि तस बघायला गेलं तर अभिनेत्री म्हणलं कि ग्लॅमर्स चेहरा , झिरो फिगर,अंगावर डिझायनर कपडे. पण हि अभिनेत्री याला अपवाद ठरली आहे गोंदवलेलं कपाळ नाकपुडयांना आणि कानाला गोलाकार रिंग अंगावर असलेला आदिवासी पेहराव अशी फुलो करमा स्मिताने या सिनेमात साकारली आहे. तिच्या या लूकचं आणि अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे .

पण जोगवा,तुकाराम सारख्या चित्रपटात छोटीशी भूमिका करणाऱ्या स्मिता चा प्रवास कसा आहे ते आपण जाणून घेऊया

स्मिता चा जन्म तसा सातारा जिल्ह्यातला काही काळाने ती पुण्यात आली आणि मराठी चित्रपट इंडस्ट्री मध्ये काम करण्यासाठी ती मुंबई मध्ये आली तिने मराठी लोकसाहित्य आणि समाज या विषयात phd सुद्धा केली आहे. त्यामुळे स्मिता ला अभिनेत्री स्मिता तांबे नाही तर डॉक्टर स्मिता तांबे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

स्मिता ने सुरवातीला मराठी नाटक आणि मालिकांमधून काम करत राहिली पुढे तीला आपल्या छोट्याश्या करिअर मध्ये मराठी फिल्म इंडस्ट्री ला टेकू देणाऱ्या दिग्दर्शक राजीव पाटील ने जोगवा या चित्रपट मध्ये संधी दिली. भूमिका तशी छोटी होती पण त्यात तिचं कौतुक झालं .चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तुकाराम,देऊळ, सिंघम रिटर्न या सारख्या चित्रपटात सुद्धा तिने छोटीशी भूमिका केली.

पण स्मिताला खरी ओळख मिळाली ती ७२ मैल एक प्रवास या चित्रपटामधून या चित्रपटामध्ये स्मिता ने अक्षरशः जीव ओतलाय तिने साकारलेल्या राधा अक्काच्या भूमिकेची झलक तिच्यावर चित्रित केलेल्या सिनच्या प्रत्येक फ्रेम मध्ये दिसून येते.असे वाटतेय तिने हि भूमिका केली नसून अक्षरशः जगलीय.

अशोक नामक मुलाच्या टवाळखोरी जाचाला कंटाळून त्याचे आई वडील अशोक ला सातारा येथे बोर्डिंग वर टाकतात मन रमत नाही म्हणून अशोक तेथून कोल्हापूर ला पळ काढतो . ४ पोरांना घेऊन निघालेल्या अशोक ची राधा अक्काशी वाटेत भेट होते.आणि सुरु होतो ७२ मैलाचा प्रवास.


लाचारीच जगणं,दोन वेळच्या जेवणाची भ्रांत,पाचवीला पुजलेली गरिबी ,आईच्या प्रेमाची माया अशी ही राधा आक्का स्मिता अशी साकारते कि बघतच राहावे वाटते . पोटच्या पोरीने चारित्र्यवर घेतलेल्या संशयावरून पेटून उठणारी,धाकट्या मुलाच्या मरणाची दुःख गिळणारी. परस्थितीशी हतबल होऊन २ रुपयांची भेळ मुलांच्या पोटात जावी म्हणून तिची धडपड आणि शेवटी तिने अशोक शी साधलेला हृदय पिळवून टाकणारा साधलेला सवांद.मनाला चटका लावणारी ती शेवटची ताटातूट या सगळ्या प्रसंगामध्ये स्मिता ने अक्षरशः जीव ओतलाय .

स्मिताच्या याच अभिनयाची भुरळ हिंदी फिल्म इंडस्ट्री ला पण पडली. पुढे तिने आज्जी,रुख,नूर ,डबल गेम ,पंगा,जवान या सारख्या हिंदी सिनेमात काम केलं.तसेच सॅक्रेड गेम्स या वेबसिरीज मध्ये स्मिता दिसून आली. फिल्म इंडस्ट्री मध्ये काम मिळवण्यासाठी सुंदर दिसणे नाही तर सुंदर अभिनय असावा लागतो हेच स्मिता ने जोरम मधून आपल्या अभिनयातून दाखवून दिलय . स्मिताला जोरम या चित्रपटासाठी साऊथ आशियाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोकृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Updated : 27 Dec 2023 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top