Home > मॅक्स ब्लॉग्ज > माणसाने माणूस म्हणून जगावे- पल्लवी पवार

माणसाने माणूस म्हणून जगावे- पल्लवी पवार

सभोवताली घसरत चाललेली लोकशाही राजकारणाची पातळी आणि धर्मांधता हा आपला वर्तमान असेल तर भविष्य काय असेल याची कल्पना करता येत नाही म्हणून माणसाने माणसासारखे जगावे अशी भावना व्यक्त केली आहे पल्लवी पवार यांनी.

माणसाने माणूस म्हणून जगावे- पल्लवी पवार
X


देशाची धोक्यात असलेली लोकशाही,राजकारणाची घसरत चाललेली पातळी,निकृष्ट दर्जाचे राजकारणी,अगदी निकृष्ठ दर्जाची राजकारण्यांची घसरत चाललेली भाषा,धोक्यात असलेली आपल्या देशाची एकात्मता,एकमेकांच्या जाती धर्माबद्दल द्वेष,भोंगे,स्पीकर ,अजाण ,कुराण,हनुमान चालीसा,सामूहिक हिंसाचार हा आपला वर्तमान आहे ,मग आपले भविष्य काय असेल याची कल्पना करा...

कोणत्यातरी टुकार माणसाने काहीतरी बरळायाचे आणि त्याच्या अंधभक्तांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्या गोष्टीला डोक्यावर घेऊन नाचायचे.डोक्यावर घेऊन नाचतात असे म्हणते कारण गोष्टी जर डोक्यात शिरल्या तर माणूस त्या गोष्टींचा चांगला वाईट विचार करतो आणि चूक काय बरोबर काय हे स्वतःच्या सद्सदविवेक बुद्धी असेल तर बरोबर निर्णय घेतो.

गोरगरीब जनतेला दिले जाणारे पाच किलो राशन, सोशल मीडियाचा वापर करून पसरवला जाणारा सांप्रदायिक द्वेष,तसेच हिंदूनी किती मुलांना जन्म दिला पाहिजे हे सांगणारे बावळट लोक,तसेच काही ही तत्वहीन कारणे देऊन आपला धर्म कसा धोक्यात आहे हे जनसामान्यांच्या मनावर बिबवणे आणि असे अजून बरेच काही ज्या गोष्टींचा विचार केला तर माणूसपणाची लाज वाटावी अशी आजची स्थिती... या सगळ्या फालतू गोष्टीमध्ये अडकून आजचा समाज आपल्या मूळ समस्या, आपल्या गरजा,आपले हक्क ,आपले अधिकार,आपले समाजभान हे सगळे विसरून डोळ्यावर झापडे आल्यासारखे कोणताही विचार न करता अंधानुकरण करत आहे. आजची समाजाची ऐकून स्थिती पहिली तर सगळ्यांचेच भविष्य अंधारमय आहे हे नक्की...

पुढारी त्यांच्या राजकारणासाठी सामान्य माणसाच्या मनात एकमेकांच्या जातीबद्दल,धर्माबद्दल जो द्वेष निर्माण करत आहेत यात त्यांचे काहीच नुकसान होणार नाही पण याचा खूप मोठा फटका आपल्यासारख्या जनसामान्यांनानाच होतो आणि होणार हे नक्की.बर आपण एकमेकांच्या धर्माचा,जातीचा ,माणसांचा द्वेष केला धर्माच्या नावाखाली एकमेकांना संपवून टाकले आणि हिंदूराष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र किंवा अजून कोणत्या तरी वेगळ्या धर्माचे राष्ट्र निर्माण केले, मग पुढे काय?

परत आपल्यात प्रत्येक जातीत अजून बरेच कुळ,गण,गोत्र आहेत त्यातील जो खालच्या दर्जाचा समजला जातो त्याचा द्वेष सुरू,त्यांना संपवून परत त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचा समजल्या जाणाऱ्या लोकांबद्दल द्वेष ...हे न संपणारे चक्र तोपर्येंत सुरू राहणार जोपर्यंत शेवटचा माणूस जिवंत असेल...

आजची परिस्थिती लक्षात घेतली तर आज आपल्या समाजाला आणि देशाला गरज आहे ती प्रेम ,करुणा, बंधुता,आपल्या देशाची एकात्मता आणि विविधता जपण्याची..माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची,एकमेकांच्या चांगल्या विचारांचा,श्रद्धेचा,जातीचा,धर्माचा मान राखण्याची...गरज आहे ती सद्सदविवेक बुद्धी असलेल्या विचारवंतांची,वाचनाची...कारण कोणताच धर्म हिंसा,द्वेष शिकवत नाही प्रत्येक धर्म माणुसकीची आणि प्रेमाचीच शिकवण देतो फक्त एवढे जरी आपल्याला समजले तरी आपण आणि आपली येणारी पुढची पिढी एकमेकांचा आदर करत एक राहण्यायोग्य समाज निर्माण करू शकू.शेवटी काय माणसाने माणसांशी माणसाप्रमाणे वागावे आणि माणसाने माणूस म्हणून जगावे...

- पल्लवी पवार

Updated : 29 April 2022 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top