Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना खजील होऊन एक्झिट घेईल!



कोरोना खजील होऊन एक्झिट घेईल!



कोरोनाने मानव जातीवर संकट निर्माण केलं आहे. अनेक आपला नंबर कधी येईल. या विचारात जगत आहेत. हे सर्व आपल्या अवतीभोवती घडत असताना कोरोना नामक या भयंकर महामारीविरोधात आपण एक होऊन लढत आहोत का? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी मार्मिक शब्दांत केलेले विश्लेषण

कोरोना खजील होऊन एक्झिट घेईल!


X


माणसांना साष्टांग नमस्कार घालून करोना विषाणू पृथीवरून एक्सिट घेईल बहुतेक! मी एव्हढा हाहाकार माजवल्यामुळे राष्ट्रातील सर्व नागरिक माझ्याविरुद्ध लढताना एकी करतील, मला घालवतील आणि मग कदाचित पूर्वीसारखे भांडतील असे मला वाटले होते. पण आपण आजच आपल्या आवडत्या भाज्या, फळे, चिकन, मटण खाऊन घ्यावे. कारण उद्या आपण कोरोनाने मरणार आहोत. अशा भीतीने लोक मार्केटमध्ये झुंबड उडवत आहेत.


आपल्या आवडत्या हिरोच्या चित्रपटाला लोक गर्दी करत आहेत. पापपुण्याचा हिशोब ठेवणारा नेमक्या याच दिवसात ड्रोन कॅमेऱ्यातून आपल्यावर नजर ठेवून असल्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्य हिरीरीने पार पडले जात आहे. राज्य सरकारे खाली खेचण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत.

आपले राज्य सरकार तुपले राज्यसरकार म्हणत लस वाटपावरून संकुचित राजकारण सुरूच आहे. सोशल मीडियातून धार्मिक तणाव पसरवायचा प्रयत्न सुरूच आहे. बलात्काऱ्यांना बलात्कार करण्याचे धारिष्ट्य आहेच. जगातील शहरात मास शूटिंगच्या घटना घडतच आहेत. राष्ट्राराष्ट्रात गंभीर लष्करी ताणतणाव सुरूच आहेत.

स्टॉक मार्केटवर कोरोनाची भीती आली आणि गेली सांगत सट्टेबाज लाँग आणि शॉर्टचा अब्जावधी डॉलर्सचा खेळतच आहेत. क्रिकेटच्या मॅचेस प्रेक्षकांसाठी कधी होत्या त्या जाहिरातदारांसाठी / स्पॉन्सर्स साठी होत्या. असे सांगत दररोज क्रिकेटचा रतीब घालण्यात येत आहे. कोरोनाने अकाली मरणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांना "काय करणार नशिबाला" म्हणत लोक आपला नंबर येण्याची वाट बघत जगत आहेत.

मी उगाचच माणसांच्या मागे लागलोय; त्यांचे आयुष्य त्यांना लखलाभ होवो, "They are capable of taking care of themselves"

असे म्हणत कोरोना खजील होत एक्सिट घेईल

संजीव चांदोरकर

Updated : 12 April 2021 2:08 AM GMT
Next Story
Share it
Top