Home > मॅक्स ब्लॉग्ज > असत्याच्या प्रचाराचे तंत्र

असत्याच्या प्रचाराचे तंत्र

सत्तेला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्तमानपत्रातील खोटी जाहिरात बाजी व जनसंपर्क महाअभियान द्वारे जनतेची दिशाभूल केली जात आहे. असत्याच्या प्रचाराचे तंत्र काय आहे ते जाणून घेऊया सतीश देशमुख यांचा लेखातून.

असत्याच्या प्रचाराचे तंत्र
X

तंत्र क्रमांक 1: जर्मनीचा हुकूमशाहा ॲडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या 'माईन काम्फ' या आत्मचरित्रात असे लिहिले आहे की लोकांची जर दिशाभूल करायची असेल तर "खूप मोठ्ठ" (Big Lie) खोटे बोलले पाहिजे. त्यामुळे लोकांना असे वाटते की इतके खोटे कोणी बोलू शकतो का? इतक्या खात्रीपूर्वक कॉन्फिडन्स नी सांगितले जात आहे. म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे.

तंत्र क्रमांक 2: जर्मनीचा प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्स यांनी असे सांगितले होते की खोटे बोलताना वारंवारता महत्त्वाची आहे. खोट्या घटनेला किंवा बाबीला वेगवेगळ्या माध्यमातून व लोकांकडून तेच तेच ऐकायला मिळायला पाहिजे. मग लोकांना हळूहळू ते खरे वाटायला लागते. एखादी खोटी गोष्ट वारंवार व सातत्याने सांगितली की तर लोकांना सत्य वाटू लागते.

तंत्र क्रमांक 3: अर्धसत्य (Half Truth)

खरे खोट्याचे बेमालुम मिश्रण करा. कारण काही लोकांना मोठ्या खोट्या बातमीतील खोटेपणा लगेच लक्षात येतो. त्यात थोडे सत्य मिसळा.

तंत्र क्रमांक 4: सामान्य माणूस हा विश्लेषक नसतो. त्यामुळे वस्तूस्थिती पेक्षा भावनाप्रधान भाषेचा वापर, नव्या, सोप्या, सुटसुटीत घोषणा करा.

एक उदाहरण देतो. सध्या "गरीब कल्याण" टॅग लाईन वापरली आहे. गेल्या दहा वर्षात अदानी ची संपत्ती 1225 टक्क्यांनी वाढून, त्यांच्या जागतिक श्रीमंताच्या क्रमवारीने 437 वरून 23 वर झेप घेतली आहे. अंबानीच्या संपत्तीमध्ये 350% वाढ होऊन त्यांचा क्रमांक 41 वरून 9 वर पोचला आहे. ही संपत्ती गरिबांच्या व शेतकऱ्यांच्या खिशातून गेली असणार ना. गरीबाचे कल्याण कुठे झाले?

शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेले धान्य तुम्ही 80 कोटी लोकांना फुकट वाटले, त्यात तुमची काय कर्तबगिरी?

कृषी द्रोही धोरणे राबवून, शेतमालाच्या किंमती पाडून, महागाई निर्देशांक नियंत्रणात आणला तर त्यात काय कौतुक?

आत्महत्या थांबल्या का? शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली का?

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, गुंतवणूक वाढली का?

या जाहिरातीमधील आकडेवारीची सत्यता तपासण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा पण उपयोग नाही. कारण त्यात बदल करून तो अगोदरच सौम्य केला आहे. सरकारचा हस्तक्षेप सांख्यिकी खात्यामध्ये वाढलेला आहे. बेरोजगारीच्या चुकीच्या आकडेवारी मधून ते लक्षात आले होते.

या जाहिरातीतील एकेक गोष्टीची सत्य पडताळून

पाहणे हे खरे तर मीडिया, पत्रकारितेचे काम आहे. पण ते आम्हालाच करावे लागत आहे.

अजून काही सत्य तुमच्यासमोर आणणार आहे, वेळ मिळेल तसा.

, B.E. (Mech.), पुणे

Updated : 2 Jun 2023 2:45 AM GMT
Next Story
Share it
Top