Home > मॅक्स ब्लॉग्ज > असा टाळा हृदय विकार

असा टाळा हृदय विकार

सावधान, तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर डॉ. प्रितम भि. गेडाम यांचा हा लेख तुमच्याचसाठी आहे. दुर्लक्ष केल्यास बहुमोल जीव हिराऊ शकतो.

असा टाळा हृदय विकार
X

(जागतिक उच्च रक्तदाब दिवस विशेष - १७ मे २०२३)

आजच्या आधुनिक वातावरणाने माणसाला नवनवीन सुविधांनी सुसज्ज केले आहे, पण याउलट या सुविधांमुळे मानवी शरीर खूप प्रमाणात अशक्त झाले, त्यामुळे आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. सर्वत्र प्रदूषण, अशुद्ध हवा-पाणी, किरणोत्सर्ग, भेसळ, घातक रसायनांचा वापर, गोंगाट, ई-कचरा, प्लास्टिक कचरा, कमी होत चाललेली हिरवळ, वाढती नैसर्गिक आपत्ती, ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या समस्या माणसांना गुदमरून रोगराईने मारत आहे. तसेच वाढता स्वार्थ, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, खोटा देखावा, अंमली पदार्थांचे व्यसन, गैरव्यवहार, फसवणूक, सभ्यतेचा ऱ्हास यासारख्या समस्या देखील समाजाला उद्ध्वस्त करत आहेत.

सरासरी वयही सातत्याने कमी होत आहे, अशा अशुद्ध वातावरणात शरीर आणि मन सुदृढ ठेवणे कठीण होत असून रोगांचे साम्राज्य विनाशकारी रूप धारण करत आहे. ज्यामध्ये सामान्यतः आढळणारा आजार म्हणजे उच्च रक्तदाब पण आहे. उच्च रक्तदाब(High Blood pressure), ज्याला सामान्य भाषेत बीपी (ब्लड प्रेशर) वाढणे म्हणतात. उच्च रक्तदाब ती स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या रक्तवाहिन्या प्रभावित होतात, याला हाइपरटेंशन देखील म्हणतात. रक्तदाब जितका जास्त असेल तितके हृदयाला(heart Diceses)रक्त पंप करणे कठीण होते. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला सामान्यपेक्षा जास्त मेहनत करावी लागते.

दरवर्षी १७ मे रोजी "जागतिक उच्च रक्तदाब दिन" पाळला जातो. या दिवसाचा उद्देश उच्च रक्तदाबाच्या लक्षणांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, रक्तदाब तपासण्यासाठी प्रेरणा, समस्येवर लवकर प्रतिबंध करण्याच्या पद्धतींचे ज्ञान आणि समाजात उच्च रक्तदाबाची व्याप्ती अधोरेखित करणे हा आहे. उच्च रक्तदाब हे जगभरातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असेही म्हणतात, कारण त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत.

अस्वस्थ जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. ताणतणाव, मिठाचे अतिसेवन, वजन जास्त असणे, व्यायामाचा अभाव, अंमली पदार्थांचे व्यसन, तंबाखू, धूम्रपान हे जीवघेणे आहेत. अनियंत्रित रक्तदाब हे हृदयरोग, पक्षाघात आणि मूत्रपिंडाचे आजार यासारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे प्रमुख कारण आहे. भारतातील एकूण मृत्यूंपैकी २७% हृदयविकारामुळे होतात, ४०-६९ वयोगटातील ४५% लोक प्रभावित होतात. मधुमेह sugar असलेल्या १० पैकी ६ लोकांना उच्च रक्तदाब देखील असतो.

भारतातील परिस्थिती भयावह :- २०१९ मध्ये उच्च रक्तदाबाच्या प्रमाणामध्ये भारत India जागतिक स्तरावर पुरुष आणि महिलांमध्ये अनुक्रमे १५६ आणि १६४ व्या क्रमांकावर होता. भारतातील ३१% लोकसंख्येला उच्च रक्तदाब आहे. सुमारे ३३% शहरी आणि २५% ग्रामीण भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतातील उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या २००० मधील ११८.२ दशलक्ष वरून २०२५ पर्यंत २१३.५ दशलक्ष पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. यानंतर हा आपला देश उच्च रक्तदाबाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल.

द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमधील २०१६-२०२० च्या अभ्यासानुसार, भारतातील ७५% पेक्षा जास्त रुग्णांना उच्च रक्तदाब (हाइपरटेंशन) असल्याचे निदान झाले आहे, पण ते नियंत्रणात नाही. इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्हच्या मते, देशातील अंदाजे २०० दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत, त्यापैकी १०% पेक्षा कमी लोकांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. उच्च रक्तदाब इतर कोणत्याही कारणापेक्षा जास्त प्रौढांना मारतो. भारत सरकारने इंडियन हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह (आईएचसीआई) लाँच केले आहे आणि २०२५ पर्यंत उच्च रक्तदाब (वाढलेला रक्तदाब) २५% सापेक्ष कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

जागतिक स्तरावर परिस्थिती गंभीर होत आहे :- जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मुख्य तथ्ये दर्शवतात की, जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब अंदाजे १.२८ अब्ज लोकांना प्रभावित करते, त्यापैकी दोन तृतीयांश कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत. जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब असलेल्या अंदाजे ४६% लोकांना हे माहित नसते की त्यांना ते आहे, उच्च रक्तदाब असलेल्या ५ पैकी फक्त १ प्रौढ व्यक्ती तो नियंत्रणात ठेवतो, म्हणजे ८०% गुंतागुंत होण्याचा धोका असतो.

भारतात, २०३० मध्ये उच्च रक्तदाबाचा प्रसार ४४% पर्यंत वाढेल, २०३० पर्यंत २५% च्या सापेक्ष घसरणीऐवजी १७% ने वाढेल, असे डब्ल्यूएचओ ने प्रस्तावित केले आहे. (World Health Organization)डब्ल्यूएचओच्या मते, वाढलेल्या रक्तदाबामुळे जगभरात ७.५ दशलक्ष मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, जे एकूण मृत्यूंपैकी १२.८% आहे. उच्च रक्तदाब असलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांना-अंदाजे ७२० दशलक्ष लोकांना आवश्यक असणारे उपचार मिळाले नाहीत. २०२० मध्ये, उच्च रक्तदाबाचा योगदानामुळे युनायटेड स्टेट्समध्ये ६७०,००० हून अधिक मृत्यू झाले.

अमूल्य जीवनाचे मूल्य समजून घ्यावें :- आज आपण ज्या प्रकारच्या वातावरणात श्वास घेत आहोत, सोबतच आरोग्य संबंधित स्थिती सतत खराब होत आहे, त्यावरून असे वाटते की, येणाऱ्या काळात आयुष्य खूप वेदनादायी आणि संघर्षमय असेल. गंभीर आजारांमुळे लहान मुलांनाही जीव गमवावा लागत आहे. पूर्वी जे आजार अधूनमधून ऐकायला मिळायचे, आज तेच आजार आपल्या आजूबाजूला दिसतात आणि ऐकायला मिळतात. या वातावरणाला सर्वात जास्त जबाबदार आहे आपली आधुनिक जीवनशैली. आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाचे गुलाम झालो आहोत.

आज लोक चवीनुसार अन्नपदार्थ निवडतात, पोषणाच्या आधारावर नाही, त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. यांत्रिक संसाधनांद्वारे मानवी श्रम वाचवले जातात, ज्यामुळे मानवी शरीर जास्त क्रियाकलाप करत नाही. अंमली पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान शरीराला पोकळ करत आहेत. अशुद्ध हवा-पाणी आणि प्रदूषण स्लो पॉयझनप्रमाणे माणसांना मारत आहे. आज सर्वसाधारणपणे समाजातील सर्व समस्या मानवनिर्मित आहेत.

परिस्थिती कशीही असो, जगाची संपत्ती लुटूनही आपण क्षणभराचे आयुष्य विकत घेऊ शकत नाही. आजच्या काळात आपणच आपल्या मौल्यवान जीवनाची किंमत समजून घेऊन, चांगली जीवनशैली सुरू केली पाहिजे. पौष्टिक आहार, दैनंदिन व्यायाम, वजन नियंत्रण, व्यसनापासून दूर राहणे, ८ तास पूर्ण झोप, नियमित शारीरिक हालचाली, मैदानी खेळ, सकारात्मक विचार, मीठ, साखर, खाद्यतेल यांसारख्या पदार्थांचा मर्यादित वापर, निसर्गाविषयी आपुलकी, चांगल्या सवयी आणि धोरणात्मक नियमांचे पालन मानवी आरोग्याला आणि मनाला नवीन चेतना व उत्साह प्रदान करतात. उच्च रक्तदाबही अशाच प्रकारे नियंत्रणात ठेवता येतो. निरोगी प्रौढांनी महिन्यातून एकदा रक्तदाब तपासावा.

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास घाबरू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करा. वेळेवर योग्य उपचार घेतल्यास पुढील येणाऱ्या हृदयविकार, पक्षाघात किंवा मृत्यू देखील टाळू शकतो आणि प्रतिबंध किंवा संरक्षण हे उपचारापेक्षा नेहमीच चांगले आहे. समाधानी बना, निसर्ग जीवनदाता आहे, त्याचे रक्षण करा. नेहमी आनंदी राहा, जबाबदाऱ्या समजून घ्या, सकारात्मक विचार आणि समज दाखवा, निरोगी राहा, तणावमुक्त जीवन जगा.

डॉ. प्रितम भि. गेडाम

[email protected]

Updated : 17 May 2023 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top