लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा जीव गेला? सरकारला माहीत नाही!

579

लोकहो, नीट ऐका,

संसदेत लेखी उत्तरात सरकार काय सांगतय !! आमच्याकडं किती लोक स्थलांतरित झाले याचीही आकडेवारी नाही. आणि आमच्याकडं लॉकडाऊन काळात या स्थलांतरित किती मेले याचीही आकडेवारी नाही. ना या लॉकडाऊन काळात किती लोकांचे रोजगार गेले याचीही आकडेवारी नाहीये.

मात्र, आम्ही गरिबांसाठी अमुक केलं, ढमूक केलं, हे स्थलांतरित गरीब नव्हते? भारतीय नव्हते? यांचा गुन्हा काय होता?
चार तासांची मुदत देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यावर सगळ्यात जास्त फरफट यांचीच झाली ना?

लोकहो, आमच्याकडं ना बेरोजगारीचा डाटा आहे ना? आमच्याकडं स्थलांतरित लोकांचा डाटा आहे ना, आम्हाला नोटाबंदी च्या काळात नेमक्या किती नोटा परत आल्या हे दीड वर्ष सांगता आलं नाही. जीएसटी बद्दल तर पूर्वतयारी न करताच कायदा लागू केल्याचा ठपका ठेवून कॅगनेच कान धरलेले,तरीही माननीय महोदय म्हणतात आम्ही गरिबांसाठी खूप काही केलं ?

तरीही दरवेळेला “आज कुछ तुफानी करते है” म्हणून काहीतरी अचाट निर्णय जाहीर करायचे आणि मग ४० पैसे पोस्ट दराने वेठबिगारी भक्तांच्या बिनडोक टोळ्या त्याला “मास्टर स्ट्रोक” म्हणून टाळ्या वाजवत, थाळ्या वाजवत समर्थन करत बसणार.

महोदय,
राजा बाण मारतो आणि जिथे बाण लागला. तिथे जाऊन हुजरे नेम लागल्याचं वर्तुळ काढतात आणि राजा आपलीच पाठ थोपटून घेतो. असली अवस्था झालीय !!
कुठं नेउन ठेवलेलं २० लाख कोटींचे पॅकेज !!

#अंधेर_नगरी

Comments