Home > मॅक्स ब्लॉग्ज > जग नव्या शीतयुद्धाकडे तर चालले नाही ना?

जग नव्या शीतयुद्धाकडे तर चालले नाही ना?

जग दुसऱ्यांदा शीत युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का? दुसऱ्या शीत युद्धाला कोण जबाबदार आहे? अमेरिका की चीन? बलाढ्य देशाच्या स्पर्धेत भारताची भूमिका नक्की काय आहे? यासह चीन च्या भूमिकेवर लष्कर प्रमुख नरवणे यांची भूमिका नरमाईची आहे का? वाचा डॉ. सुभाष देसाई यांचा लेख

जग नव्या शीतयुद्धाकडे तर चालले नाही ना?
X

चीनच्या वाढत्या साम्राज्यवादी धोरणामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत देश एकत्रित आले असून ते चिंताग्रस्त बनले आहेत. जागतिक राजकीय विश्लेषकांच्या मते ही जगाची नव्या शीत युद्धाच्या दिशेने जाणारी वाटचाल आहे.

गेल्या 24 सप्टेंबरला जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुझा, नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट अमेरिकेत व्हाइट हाउसमध्ये एकत्र आले. कोरोना महामारीनंतर प्रथमच ते समोरासमोर आले. अर्थात त्यांनी जाहीर केले की, आमची मैत्री ही कोणत्याही लष्करी कारवाईसाठी नसून लोकशाहीवादी विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आहे. अशी बैठक आम्ही दरवर्षी घेणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.

या मंडळींनी हे ठरवले की, आपल्या देशाचा वापर इतर देशावर आक्रमण करण्यासाठी करण्याचा नाही किंवा अतिरेक्यांना शिक्षण व आश्रय देण्यासाठी करण्याचा नाही. भारताच्या दृष्टीने हा इशारा पाकिस्तानकडे बोट दाखवणार होता. तालिबान अतिरेक्यांना पाकिस्तानने भारताविरुद्ध आश्रय देऊ नये. अशी मोदींनी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी आपल्या भाषणात चीनचा प्रत्यक्ष उल्लेख करणे टाळले आहे. फक्त भारत पॅसिफिक भाग हा मुक्ता नि खुला ठेवण्यावर भर दिला गेला.

चीन विविध देशाच्या समुद्रात घुसखोरी करू लागला आहे. त्याचा एक प्रकारे निषेध होता. चीनने योजलेल्या या महामार्गाला या राष्ट्रांचा विरोध आहे. कारण त्यामागचा उद्देश केवळ व्यापार नसून भूभाग व अर्थशास्त्र यावर प्रभुत्व मिळवणे आहे. युनोच्या जनरल असेंब्लीच्या भाषणात मोदींना चीनचा उल्लेख करण्याचा मोह टाळता आला नाही. कोरोना चे जंतू चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाले की नाही या वादग्रस्त विषयावर ते बोलले की जागतिक आरोग्य संघटनेला या विषयावर संशोधनासाठी स्वातंत्र्य द्यायला हवे आणि समुद्रातली चीनचे आक्रमण थांबवण्याची गरज त्यांनी मांडली.

जागतिक बँकेवर दबाव आणतो याविषयी त्यांनी तक्रार केली. मोदींनी पाकिस्तान वर अतिरेक्यांना आश्रय देऊ नये यासाठी इतरांनी दबाव आणावा असे आवाहन केले. जनरल असेंबली बोलण्याची जो बायडन यांची अमेरिकन अध्यक्ष म्हणून पहिलीच वेळ होती. त्यांनी प्रथम जाहीर केले की, आज अमेरिका कोणत्याच युद्धात सहभागी झालेला नाही पण हे खोटे होते. (मोदींच्या दोस्तीचा कदाचित परिणाम असावा) अफगाणिस्तान मधले वीस वर्षांची लष्करी कारवाई अमेरिकेने थांबवली हे खरे आहे.

पण इराकमध्ये अमेरिकन सैन्य अल शाबाब सारख्या गटाविरुद्ध लढत आहे. इस्लामिक स्टेट बरोबर युद्ध चालूच आहे. आफ्रिकेतील गटाबरोबर आणि अरेबियन पेनिंसुलात अमेरिका युद्ध करत आहे. अमेरिकन लष्कराने सिरीयात बेकायदेशीर तळ का ठोकला आहे? याशिवाय सप्टेंबर 21 मध्ये बायडन सरकारने काबुलवर बॉम्ब फेकले होते आणि तशीच बॉम्ब फेक आम्ही केव्हाही करू अशी धमकी त्यांनी दिली आहे. याचा अर्थ अमेरिकेने युद्ध थांबवले आहे हे खोटे आहे.

हे मोठ्या देशाचे प्रतिनिधी जागतिक व्यासपीठावर खोटे का बोलतात? या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही . बायडेन यांनी जाहीर केले की, आम्हाला पुन्हा शीतयुद्ध नको आहे किंवा जगाचे वेगळे तुकडे पाडण्यातही स्वारस्य नाही. चीनचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही तर त्या दिशेने त्यांनी अंगुलीनिर्देश करण्याचे सोडले नाही.

चीन आणि अमेरिकेने परस्परांच्या व्यापाऱ्यांना अटक केली होती. आता त्यांची सुटका झाली आहे. डोनाल्ड ट्रंप प्रशासनाने चीनवर घातलेले निर्बंध अजून उठले नाहीत. अमेरिका चीनला नेहमीच तिबेट, हॉंग कॉंग कोरिया या प्रश्नावर डिवचत असते. हॉंग कॉंग बाबत 2 पोलिसिज चा पाठपुरावा अमेरिकेने केला आहे. चीनने बजावले की आमच्या देशांतर्गत मामल्यात तुम्ही नाक खुपसू नका.

खुद्द मोदींना अमेरिकेतल्या भारतीयांनी व्हाईट हाऊस समोर निदर्शने करून जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले save India from Fascism अशा घोषणा दिल्या. मोदींच्या हिटलरशाही पासून भारताला वाचवा अल्पसंख्यकावरचे अत्याचार थांबवा, नवे किसान विरोधी शेती कायदे रद्द करा आणि काश्मीर ची स्थिती बिघडू नका. अशा महत्त्वाच्या मागण्या या भारतीयांनी केल्या.

यापूर्वी मोदींनी मार्केटिंगची सारी तंत्र वापरून जगभरच्या भारतीयांमध्ये आपण लोकप्रिय आहोत असं दाखवण्याचा अट्टहास केला होता. पण तो किती फोल होता हे या निदर्शनावरून दिसून येते. नेहमीप्रमाणे मोदींनी सोयीस्कर या सगळ्या आक्षेपांना उत्तर देण्याचे टाळले आणि मौन पाळले. भारताचे लष्कर प्रमुख नरवणे राष्ट्रीय सेवक संघाच्या ज्ञानप्रबोधिनी पुणे मध्ये शिकलेले आहेत. त्यांच्यावर संघाच्या विचारांचा पगडा आहे. ते आता चीनच्या युद्धाच्या धमकीने थोडेसे चिंतित आहेत असेच दिसते. भारताच्या दृष्टीतून ही काही फार चांगली संरक्षणाची बाब नाही.

त्याला हवा फिल्डमार्शल जनरल मानेकशाह, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री अशी पोलादी माणसे हवीत तरच देशाचे संरक्षण सुरक्षित आहे. नदीत दूध ओता आणि गोमूत्र प्या यामुळे देशाचे संरक्षण होत नाही. मंत्र जप करून आणि देवांना अभिषेक करून सोरटी सोमनाथ चे संरक्षण झाले नाही ही गोष्ट मनुवाद्यांनी लक्षात ठेवावी.

लष्कर प्रमुख नरवणेनी चीनच्या आक्रमणाची भीती बाळगू नये कारण राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे सेवक हे देशाचे संरक्षण करू शकतात. असे मागे जाहीर भाष्य केलेले आहे संघाच्या कार्यकर्त्यांना आपण चीन बॉर्डरला पाठवून देऊ या.

डॉ सुभाष देसाई कोल्हापूर

Updated : 14 Oct 2021 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top