News Update
Home > मॅक्स ब्लॉग्ज > देवांचे बाप..?

देवांचे बाप..?

अरे विठ्या विठ्या । मूळ मायेच्या कारटया तुझी रांड रंडकी झाली । असं म्हणणाऱ्या संत जनाबाई वर भाजपवाले काय कारवाई करणार? सुरेश सावंत यांचा भाजपला सवाल

देवांचे बाप..?
X

अरे विठ्या विठ्या । मूळ मायेच्या कारटया तुझी रांड रंडकी झाली । असं म्हणणाऱ्या संत जनाबाई वर भाजपवाले काय कारवाई करणार? सुरेश सावंत यांचा सवाल देवांचे बाप काढले म्हणून शरद पवार यांच्या वर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. मात्र, या अगोदर संत जनाबाई, संत गाडगेबाबा यांनी देखील देवाचे बाप काढले आहेत. त्यांच्यावर भाजपवाले काय कारवाई करणार असा सवाल सुरेश सावंत यांनी केला आहे…

देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला|

देव सोन्याचा घडविला, सोनार त्याचा बाप झाला|

- संत गाडगेबाबा

देवाचे बाप काढल्याबद्दल गाडगेबाबांनाही पूर्वलक्ष्यी प्रभावाने भाजपवाले नोटीस बजावतील. आणि काव्याचा शब्दशः अर्थ घेतला तर विठोबाला खालीलप्रमाणे शिव्या घालणाऱ्या संत जनाबाईचे तर काय करतील कोण जाणे?

अरे विठ्या विठ्या । मूळ मायेच्या कारटया

तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली

तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे

उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी…

भाजपने ज्यासाठी शरद पवार यांना जबाबदार धरले त्या जवाहर राठोड यांच्या पवारांनी वाचलेल्या कवितेतील काही भाग या प्रकरणाचा संदर्भ ठाऊक नसणाऱ्यांसाठी :

"आम्ही पाथरवट

निर्माण करतोय चक्कीचे पाट

ज्या पाटाने पीठ आणि रोटी दिली तुम्हाला

आम्ही मात्र अन्नाच्या कण्यासाठी रोज नुसती घरघर करतोय…

दुसरं काय तर आमचं दुर्दैव

आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसले जातोय

आमच्या छिन्नी आणि हातोड्यांनी

एकदा तर कमाल केली

पाषाणातून वेरूळ, अजिंठा कोरली गेली,

उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून

शिल्पाचं सौंदर्य तुम्ही पाहता अन् म्हणता…

वा! वाहवा! बहुत खूबसुरत!

तुमच्या ब्रह्म, विष्णू, महेशाला

लक्ष्मी अन् सरस्वतीला

आम्हीच रुपडं दिलंय

आता तुम्ही खरं सांगा

ब्रह्मदेव आमचा निर्माता की

आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता?"

Updated : 2022-05-14T13:02:51+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top