Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्थलांतरित मजूरांना कायदेशीर संरक्षण द्या – दीनानाथ वाघमारे

स्थलांतरित मजूरांना कायदेशीर संरक्षण द्या – दीनानाथ वाघमारे

कामगार दिन : स्थलांतरित मजूर म्हणजे कोण? ते कुठून येतात? का येतात? महाराष्ट्रात स्थलांतरित मजूरांची सद्यस्थिती काय आहे? स्थलांतरित मजूरांची वाटचाल ही मुंबईच्या दिशेने का होते? तसेच हंगामी स्थलांतरितांची नोंदणी का होत नाही? यासंदर्भात स्थलांतरित मजूर व भटक्या जमातीवर अभ्यास करणारे लेखक दीनानाथ वाघमारे यांचे विश्लेषण नक्की पाहा..

स्थलांतरित मजूरांना कायदेशीर संरक्षण द्या – दीनानाथ वाघमारे
X

पुरोगामी महाराष्ट्र आज मोठ्याप्रमाणात स्थलांतरित मजूरांना रोजगार देण्याचं काम करित आहे. आज कामगारदिनानिमित्त स्थलांतरित मजूर कोण आहेत? हे कुठून येतात? आणि का येतात? यासंदर्भात स्थलांतरित मजूर व भटक्य जमाती पुस्तकाचे लेखक दीनानाथ वाघमारे यांच्याशी बातचीत केली. ते सांगतात की, स्थलांतरित होणारी मोठी संख्या शहरांकडे येताना दिसतात याचे प्रमुख कारण म्हणजे. गरीबी, बेरोजगारी आणि क्षेत्रीय विषम विकास असे. ही तीन कारणे प्रामुख्याने स्थलांतरित होण्यामागे आहेत.

स्थलांतरित होणारी माणसं कोण?

गरिब, द्रारिद्र्य रेषेखालील लोकं आणि भूमिहीनलोकं या तीन लोकांचा मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित होत असते आणि त्यामध्ये अनुसूचित जाती- जमाती, भटक्या जमाती आणि ओबीसी या मागासलेल्या गटांचं स्थलांतर होत असते.

महाराष्ट्रात 2011 च्या जनगणनेनुसार 90 लाखांच्या आसपास लोक स्थलांतरित झालेत. महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करणाऱ्या लोकांची संख्या 30 लाखांच्या आसपास आहे. पुरोगामी महाराष्ट्र विकसित राज्य असूनही लोक दुसऱ्या राज्यात स्थलांतर करण्यामागे कारणं काय तर ही कारणं आहे विषम क्षेत्रीय विकास. मराठवाडा, विर्दभ अविकसित आणि मागासलेला राहिल्यामुळे या भागातील लोक दुसऱ्या भागात रोजगारासाठी स्थलांतरित होतात.

मुंबईत स्थलांतरितांची सद्यस्थिती काय?

मुंबईमध्ये 1 कोटी 84 लाखांची लोकसंख्या आहे त्यापैकी 99 लाख लोक ही स्थलांतरित आहेत. म्हणजेच 52 टक्के लोकं ही मुंबईत स्थलांतरित आहे. आणि मुंबई स्थायिक असलेले लोक 48 टक्के आहेत. यालोकांना मूलभूत सुविधा पोहचवण्याचं काम सरकारच आहे. पाणी, रस्ते, घर, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण असो... या सगळ्या सुविधा पोहचवण्याचा ताण शहरांवर, महानगरपालिकांवर पडतो. याला पर्याय नाही कारण एवढी मोठी लोकसंख्या आंतरराज्यातून, जिल्ह्यातून, राज्याअंतर्गातून येते तसेच ही लोकसंख्या शहरात आल्यानंतर शहरांचा विकास करतात. शहरांचं स्मार्टसिटीत रुपातंर करणे याचं काम मोठ्याप्रमाणात स्थलांतरित मजूर करतात. आणि शहरं खुलण्यामागे स्थलांतरित कामगारांच्या घामाचा, कष्टाचा आणि श्रमाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे सरकारने त्यांना सामाजिक सुरक्षा देणे, त्यांच्या मुलांना शिक्षण देणे, महिलांना आरोग्याच्या सुविधा देणे एकंदरित मूलभूत सुविधा देणे. गरजा पुरवणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. हे होताना दिसत नाही. सरकारने कायदे केले शिक्षण हक्क कायदा केला. आरोग्याच्या सुविधा केल्या. 2013चा अन्नसुरक्षा कायदा केला. परंतु ज्या लोकांना याची अन्नाची प्राथमिक गरज आहे. हे होताना दिसत नाही कारण त्यांच्या रेशनकार्ड नसते. याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. गरजूवंताना सुविधा देणं गरजेचं आहे.

दरम्यान सरकारने हंगामी स्थलांतरितांची नोंदणी करणे गरजेचं आहे. आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधा देण्याची गरज असल्याचं स्थलातंरित मजूर व भटक्या जमाती पुस्तकाचे लेखक दीनानाथ वाघमारे यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितले.

Updated : 30 April 2021 5:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top