Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > अर्थज्ञान : तुमच्या पैशावर कुणी सट्टा लावतंय का?

अर्थज्ञान : तुमच्या पैशावर कुणी सट्टा लावतंय का?

अर्थज्ञान : तुमच्या पैशावर कुणी सट्टा लावतंय का?
X

वित्त भांडवल ( Finance Capital ) म्हटलं तर औद्योगिक भांडवलाचा लहान भाऊ, कानामागून आलाय आणि खूप तिखट झाला. त्याचे सर्वात व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याची सट्टेबाज, जुगारी वृत्ती; जुगार खेळणे वाईट वैगरे नैतिक भूमिका आपण घेत नाही आहोत. जुगार आणि वित्त भांडवलाची सट्टेबाजी यात मूलभूत फरक आहे.

जुगारी लोक साधारणपणे स्वत:च्या पैशावर, ऐपतीवर सट्टा लावतात. बंगला गहाण ठेवून जुगारासाठी कर्जे काढली तरी ते स्वतः दिवाळखोरीत जातात, भिकारी होतात. वित्तीय क्षेत्रातील सट्टेबाज साऱ्या समाजाच्या ठेवी आपल्याकडे घेवून त्याचा जीवावर सट्टा खेळतात.

हे ही वाचा...

त्यामुळे ज्यावेळी काही कारणाने वित्तीय अरिष्ट येते. त्यावेळी समाजातील सामान्य लोकांच्या ठेवी डोक्यात येतात, त्यांना नुकसान होते. कौरव-पांडवांच्या युद्धात युधिष्ठीरानी पणाला लावलेल्या हस्तिनापूरच्या साम्राज्यापासून, जगभरच्या नाईट क्लब मध्ये, विविध राज्य सरकारांनी चालवल्या गेलेल्या लॉटऱ्यांमध्ये, अलीकडच्या काळात पर्यटनाच्या शहरांमधे खेळले जाणाऱ्या जुगारात, व इतिहासात जगभर जितका सट्टा व जितक्या प्रकारचा सट्टा खेळला जातो. त्या साऱ्या रकमांची गोळा बेरीज केली तरी आजच्या वित्तीय क्षेत्रातील सट्ट्यामध्ये गुंतलेल्या रकमा काही पटींनी जास्त भरतील.

जगातील साऱ्या बँकांच्या ठेवी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रोखे बाजार, चलनाचा बाजार, कमोडिटी हे सारे वित्तीय मतांचे ( Financial Assets ) प्रकार आहेत

ते गेल्या चाळीस वर्षात कसे वाढत गेले आहेत ते पहा (संदर्भ : transnational institute www.tni.org )

१९८० : वित्तीय मत्ता: १२ ट्रिलियन डॉलर्स ; जगाच्या जीडीपीच्या १२० %

१९९० : वित्तीय मत्ता: ५६ ट्रिलियन डॉलर्स ; जगाच्या जीडीपीच्या २६३ %

२००० : वित्तीय मत्ता: ११९ ट्रिलियन डॉलर्स ; जगाच्या जीडीपीच्या ३१० %

२०१० वित्तीय मत्ता २१९ ट्रिलियन डॉलर्स ; जगाच्या जीडीपीच्या ३१६ %

२०१८ वित्तीय मत्ता: ३४० ट्रिलियन्स डॉलर्स जगाच्या जीडीपीच्या ४०० %

( एक ट्रिलियन डॉलर म्हणजे अंदाजे ७० लाख कोटी रुपये ; भारताची जीडीपी अंदाजे ३ ट्रिलियन डॉलर्स जगातला सगळा वाढावा (सरप्लस), आपल्याच ठेवी वापरून, कोण घेऊन जातंय हे समजून घेऊ या! आणि आपल्याला कोणत्या नॉन इकॉनॉमिक इश्युज मध्ये गुंडाळून टाकलंय आणि ते का ते समजून घेऊ या !

संजीव चांदोरकर हे एक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांचे वित्त भांडवल, वित्त क्षेत्र समजून घेण्यासाठी वित्तीय अरिष्टे : कारणे आणि परिणाम हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.

प्रकाशक युनिक फौंडेशन, पुणे : किंमत १८० रुपये

पुस्तकासाठी संपर्क : ९८५०५ ५३१४४ // ८४११८ ५१००१

Also Available on Bookganga

Updated : 14 Jan 2020 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top