Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्रशांत किशोर यांच्या प्रमाणे फेसबूक, ट्वीटर राजकारणात उतरले तर?

प्रशांत किशोर यांच्या प्रमाणे फेसबूक, ट्वीटर राजकारणात उतरले तर?

प्रख्यात राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी प्रत्यक्ष राजकारणात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पण प्रशांत किशोर यांची महत्वकांक्षा पुर्ण होईल का? प्रशांत किशोर यांच्याप्रमाणे फेसबुक आणि ट्वीटर राजकारणात उतरले तर काय होईल? याबाबत परखड आणि मुद्देसूद विश्लेषण केले आहे जेष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी....

प्रशांत किशोर यांच्या प्रमाणे फेसबूक, ट्वीटर राजकारणात उतरले तर?
X

१. उद्योजकाकडे अनेक सल्लागार असतात. कर, हिशेब, कायदेशीर बाबींची पूर्तता, मार्केटिंग, सेल्स, इत्यादीसाठी. परंतु निर्णय उद्योजकाचा असतो. निवडणूक प्रचाराची रणनीती या विषयाचे प्रशांत किशोर कन्सलटंट आहेत. कारण निवडणुका मार्केटिंगच्या तत्वांच्या आधारे जिंकता येतात असं आपल्याकडे मानलं जातं.

२. निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाची विचारधारा, कार्यक्रम आणि घोषणा काय असावी हा निर्णय राजकीय नेतृत्वाचा असतो. तो लोकांपर्यंत प्रभावीपणे कसा पोचवता येईल, मतदारसंघनिहाय त्यामध्ये कोणते बदल करायचे, भर घालायची इत्यादी बाबी निवडणूक रणनीतीकार ठरवतात. एडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग ही त्यांची कौशल्य असतात. ते राजकीय नेते नसतात. त्यांचा राजकारणाशी जिवंत संबंध नसतो.

३. प्रशांत किशोर हे राजनितीक रणनीतीकार आहेत. राजकीय नेते नाहीत. नरेंद्र मोदींसह अन्य राजकीय पक्षांची निवडणुक रणनीती आपण ठरवली तर आपली का नाही ठरवू शकत, असं त्यांना वाटणं साहजिक आहे.

फेसबुकलाही असंच वाटलं होतं. उद्या ट्विटरलाही असं वाटू शकतं.

पैसा फेसबुक, ट्विटर, सोशल मिडिया चलाता हैं, पैसा बॅनर्स लगवाता हैं, पैसा कार चलाता हैं, पैसा भीड जमा करता हैं. मगर पैसा व्होट नही बटोरता. त्यासाठी राजकीय कार्यक्रम आणि संघटन गरजेचं असतं.

४. प्रशांत किशोर नेहमीच दुसर्याच्या संघटनेवर, पैशावर आणि माध्यमांवर आरुढ झालेले आहेत. स्वतःचं स्थान त्यांना नाही. त्यांनी स्वतःचा सामाजिक आधार निर्माण केलेला नाही. त्यासाठी संघटना उभारली नाही वा चालवलीही नाही. आपल्यामुळे इतर पक्षांना यश मिळतं तर आपल्याला का मिळणार नाही, असा विचार ते करत असावेत. त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत. राजकीय महत्वाकांक्षांसाठी संघटन उभारावं लागतं, अनेक स्टेक होल्डर्सना जोडावं लागतं, अनेक न पटणार्या लोकांना आणि विचारांना सामावून घ्यावं लागतं. पैसा खर्च करावा लागतो वा गुंतवणूक करावी लागते, नवीन नेतृत्व तयार करावं लागतं.

५. करावा की हा प्रयत्न, प्रशांत किशोर यांनी. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण कन्सलटंट हा कधीही उद्योजक बनत नाही. कारण जोखीम घेण्याची त्याची क्षमता कमालीची मर्यादीत असते.

Updated : 9 May 2022 3:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top