Home > Top News > 85 हजार शस्त्रक्रिया करणाऱ्या रागिनी पारेख...

85 हजार शस्त्रक्रिया करणाऱ्या रागिनी पारेख...

85 हजार शस्त्रक्रिया करणाऱ्या रागिनी पारेख...
X

नमस्कार मित्रहो. मित्रहो मी जुलै १९९४ ला सर जे. जे. रूग्णालयातील नेत्रविभागात रूजु झालो. १९ सप्टेंबर १९९४ ला. डॉ. रागिनी पारेख या विभागात रूजू झाल्या. गेली २५ वर्ष आम्ही दोघे एकत्र काम करत आहोत. १९९४ ला नेत्रविभाग अतिशय डबघाईस आला होता. विभागात फक्त ३० रूग्ण येत असत. एक वर्षात सर्व प्रकारच्या मिळून फक्त ६०० शस्त्रक्रिया होत असत.

मी खेड्यातुन आलो होतो. त्यामुळे येथील तंत्रज्ञानाविषयी मला फार माहीती नव्हती. तसेच माझ्या किडनी खराब झाल्याने माझे डायलीसीस चालु होते. माझ्या आईने मला किडनी दिल्यानंतर हा विभाग चांगला करण्याचा आम्ही विचार केला. डॉ. रागिनी पारेख यांनी सहभाग देण्याचं मान्य केले.

डॉ. रागिनी मुलूंड वरूण रोज ३० किमी चा प्रवास करून सकाळी ७ ते ७.३० पर्यंत विभागात येते. विभागाचे कामकाज रात्री १० वाजेपर्यत चालु असते. दोघांनी एकत्र काम सुरू केल्यामुळे दुप्पट काम होऊ लागले. डॉ. रागीनीने मला येथील नवीन तंत्रज्ञान शिकवले. विभागाचे काम वाढत असताना १९९९ ला आम्ही खेड्यापाड्यात शिबीरे घेण्याचा निर्णय घेतला. तो आजतागायत चालुच आहे.

कोणतेही काम करत असतांना एक माणुस करू शकत नाही.पण दोघे एकाच उद्दिष्टानी एकत्र काम करत असतील तर त्याला यश येते. डॉ. रागिनी व मी काम करत असताना नेत्रविभागातील सर्व कर्मचारी आमच्या या यज्ञात सहभागी झाली. हा शासकीय विभाग असुनही रोज फक्त ८ तास काम न करता १० ते १२ तास काम केले जाते. याचा मोबदला कोणीही मागितला नाही.

शिबीरामध्ये सर्वजन १८-१९ तास दररोज काम करतात. डॉ. रागिनी माझ्यापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करते. महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि वैज्ञानीक काम करणारा विभाग म्हणून या विभागाकडे पाहीले जाते. डॉ. रागिनी व मी एकत्र काम करत असतांना खूप संकटांना तोंड दिले. पण रूग्ण सेवेला आम्ही वाहुन घेतले. डॉ रागिनी व मला एकत्र काम सुरू करून २५ वर्ष आज पूर्ण झाली.

एवढ्या काळात या विभागामार्फत तीन लाखाहून अधिक शस्त्रक्रिया केल्या. तसेच ५८७ लहान मोठी नेत्र शिबीरात जाऊन एक लाखाच्या वर शस्त्रक्रिया केल्या. शिबीरास जातांना शनिवार, रविवार किंवा सुट्ट्यांत शिबीरात जाऊन शस्त्रक्रिया केल्या. ५० लाखाहून अधिक रूग्णांवर ऊपचार करण्यात आले. डॉ. रागिनी यांनी वैयक्तीक ८५ हजार व मी १ लाख ६३ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. हे जागतीक ऊच्चांक आहेत. दोघांनी एकत्र काम केले नसते तर हे शक्यच झाले नसते. डॉ. रागिनीला १०१ वर्षाचे आरोग्यदायी आयुष्य मिळो यासाठी प्रार्थना.

Updated : 22 Sep 2020 4:36 AM GMT
Next Story
Share it
Top