कोरोना लसीच्या चाचण्या थांबवल्या म्हणजे नक्की काय?

156

कोणतीही घडामोड झाली की ताबडतोब अर्धवट बातम्या पसरवणं हा अजून एक फार मोठा रोग आज काल पसरत आहे. निदान काही विषयांबाबत तरी हे व्हायला नको. एकीकडे कोरोना व्हॅक्सिनने अजून फेज तीन ट्रायल पूर्ण देखील केल्या नाहीयेत. तरीही हे व्हॅक्सिन अमुक एक महिन्यात किंवा अमुक एक रुपयांना मिळेल. अशा बातम्यांचं पेव फुटलं आहे. तर दुसरीकडे ऑक्सफर्ड व्हॅक्सिनच्या रँडमाइज्ड फेज ३ ग्लोबल क्लिनिकल ट्रायल तूर्तास थांबण्यात आल्याची माहिती ऍस्ट्राझेनकाच्या प्रवक्त्याने परवा एका वृत्तवाहिनीला दिली.

या चाचण्या काही काळासाठी ( हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे) स्थगित करण्यात आल्या आहेत. यावरून मग नंतर सिरम इस्टिट्यूटला DCGI ( ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ने त्यांच्या ट्रायल्स स्थगित करण्यास सांगितल्या. यावरही पुन्हा काही बातम्या आल्या की, त्यांच्या ट्रायल्स सुरु आहेत म्हणून. मग आज बातमी आली की, त्यांनी देखील काही काळासाठी ट्रायल्स बंद केल्या आहेत. DCGIच्या आदेशानुसार… अशी साधारण या संदर्भातील घडामोडींची साखळी!

कोणत्याही व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल्स घेताना एक स्टॅण्डर्ड रिव्ह्यू प्रोसेस असते, जी सेफ्टी डेटा तपासण्यासाठी वापरली जाते. त्यानुसार ऑक्सफर्ड फेज तीन क्लिनिकल ट्रायलमध्ये हे व्हॅक्सिन दिल्यानंतर एका व्हॉलेंटिअरला काही न्यूरॉलॉजिकल सिप्टम्स दिसले आहेत. पेशन्टवर उपचार होत आहे आणि तो पेशन्ट बरा सुद्धा होतो आहे. इतक्या मोठ्या स्वयंसेवक (व्हॉलेंटिअर) गटामध्ये जर एका स्वयंसेवकाला थोडा त्रास झाला तर लगेचच सगळं संपलं असं होत नाही. ही ट्रायल्समधली एक रुटीन बाब आहे. मग आता यावर एक फार टिपिकल प्रतिक्रिया येऊ शकते ती म्हणजे “हे व्हॅक्सिन कसं असेल कोणास ठाऊक?” आणि असं म्हणून त्याच्या गुणवत्तेबाबत शंका घेतली जाऊ शकते. किंवा अशी सुद्धा काळजी वाटू शकते की आता व्हॅक्सिन काही येणारच नाही म्हणून..

कोणतंही व्हॅक्सिन फेज तीन ट्रायलमध्ये असतांना सेफ्टी डेटाचा अभ्यास केल्या जातोच आणि क्लिनिकल ट्रायल महत्वाच्या असतात त्या याचसाठी. फेज तीन ट्रायलमध्ये व्हॅक्सिन गेलं म्हणजे तर बाजारात येईल असं नसतंच मुळी. तयार केलेल्या व्हॅक्सिनची परिणामकारकता आणि त्याचे शरीरावर होणारे ऍडव्हर्स इफेक्ट हे फेज तीन ट्रायल्समध्ये म्हणूनच पडताळल्या जातात. उलटं ऑक्सफर्ड व्हॅक्सिनच्या ट्रायल्सची ही स्थगिती म्हणजे एक्स्टर्नल प्रेशरला बळी न पडता अत्यंत काळजी घेऊन लस बनवली जाते आहे. याचं उदाहरण आणि ही सकारात्मक बाब आहे. आणि तसंही या व्यतिरिक्त अजूनही बरेच व्हॅक्सीन कॅन्डीडेट फेज तीन ट्रायल्स मध्ये आहेत.

आपल्याकडे सिरम इन्स्टिट्यूट तर्फे ही ऑक्सफर्डची लस येणार म्हणून याबाबत उत्सुकता असणं समजू शकते. पण फेज तीन ट्रायल्समध्ये हे असं होतं असतं आणि यावर रिव्ह्यू घेत राहणं गरजेचं सुद्धा असतं. सो पॅनिक व्हायची गरज नाहीये. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या चीफ सायंटिस्ट ‘डॉक्टर सौम्या स्वामीनाथन’ यावर म्हणल्या तसं की, “हा एक वेक कॉल आहे आणि निराश होऊन जायची गरज नाहीये”.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनाचं सावट अजूनही घोंघावत आहे. आपली भूमिका यात सगळ्यात जास्तं महत्त्वाची आहे. घराबाहेर पडताना कंपल्सरी मास्क घालणं, अंतर – पथ्याचे नियम ( सोशल डिस्टंसिंग ) पाळणं, स्वच्छतेचे इतर सर्व नियम काटेकोरपणे पाळणं हे सगळ्यात जास्तं महत्वाचं आहे. कोरोनाचे असिम्प्टोमॅटिक कॅरिअर्स ( म्हणजे ज्यांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे पण लक्षण दिसत नाहीये) बरेच जणं आहेत. त्यामुळे आपल्याला त्रास नसेल तरीही दुसऱ्यांच्या हितासाठी मास्क घालणं इतकं तर आपण नक्कीच करू शकतो ना? पुणे महानगर पालिकेने मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून जमा केलेला फाईन लाखांच्या घरात आहे अशी बातमी वाचण्यात आली.

पोलिसांना ही अशी कामं करावी लागत आहेत, मास्क घाला हे सांगावं लागतंय आणि फाईन कलेक्ट करावा लागतोय… का बरं? तर निदान पैसे जातील म्हणून तरी काही लोक पुढच्या खेपेला मास्क लावतील म्हणून! ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. खरंच आपण इतकं निर्लज्जपणे वागणार आहोत का? आपल्या कुटुंबाची, आपल्या लोकांच्या तब्येतीची जबाबदारी आपल्यावर आहे आता. त्यामुळे मास्क घालणं आणि त्याबाबत सजगता निर्माण करणं हे सुजाण नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे.

सायंटिस्ट, डॉक्टर्स, पोलीस, स्वछता कर्मचारी, सरकारी कर्मचारी त्यांची काम प्रामाणिकपणे करत आहेत. आपण सुद्धा निदान मास्क वापरणं, अंतर- पथ्याचे नियम पाळणं, कारण नसतांना बाहेर न उंडारणं या साध्या गोष्टी नक्कीच करू शकतो. उगाच शासनाला, सिस्टिमला, वैद्यकीय सेवेला बोल लावत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो जेणे करून निदान आपण आणि आपल्या परिसरातले लोक सेफ राहतील हा विचार करणं, त्या नुसार आचार करणं हे जास्त योग्य नाही का?

 

*ऑक्सफर्ड व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या “तात्पुरत्या स्थगिती” संदर्भातल्या बातम्यांच्या लिंक्स खाली देते आहे. त्या काळजीपूर्वक वाचा म्हणजे मग अर्धवट बातम्यांमुळे, फॉर्वर्डसमुळे दिशाभूल होणार नाही. ही माहिती पडताळून पाहिल्यावर मग शेअर करावयाची असल्यास नक्कीच करू शकता, वेगळी परवानगी घेण्याची गरज नाही.
लिंक्स खालील प्रमाणे:

1)https://indianexpress.com/…/what-pause-means-for-vaccines-…/
2)https://www.thehindu.com/…/coronavirus-…/article32576897.ece
3)https://indianexpress.com/…/oxford-astrazeneca-coronavirus…/
4)https://science.thewire.in/…/astrazeneca-covid-19-oxford-v…/

(सदर पोस्ट सानिया भालेराव यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)

Comments