Home > मॅक्स ब्लॉग्ज > Maharashtra Political Crisis : शिंदे सरकारचं काय होईल?

Maharashtra Political Crisis : शिंदे सरकारचं काय होईल?

एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर न्यायालयात निर्णय बाकी असताना एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद अधिकृत ठरवले आहे. त्यामुळे हा कंटेम्ट ऑफ कोर्ट नाही का? असा सवाल करत शिंदे सरकारचं पुढं काय होईल याचं विश्लेषण केलं आहे ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांनी...

Maharashtra Political Crisis : शिंदे सरकारचं काय होईल?
X

१) राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष झाले.त्यांना १६४ मते मिळाली.राज्यात आता लोकशाहीची जागा इडीशाहीने घेतल्याचा पहिला पुरावा यातून मिळाला.

२) उत्तराखंडच्या काळ्या टोपीने वर्षभर अध्यक्ष निवडीला परवानगी दिली नाही पण इडी सरकार येताच ताबडतोब परवानगी दिली. या उघड पक्षपातावर मीडियाने मौन पाळले. हेच जर भाजपेतर राज्यपालांनी केले असते तर याच वाहिन्यांनी त्यांना फाडून खाल्ले असते. इतकी लाचारी कुठून येते?

२) भाजपकडे १७० पेक्षा जास्त आमदार असल्याचे ढोल वाहिन्या पिटीत होत्या. मग १६४ मतांनी नार्वेकर निवडले गेले. मजबूत रसद, आमिषांचा पाऊस,साम,दाम, दंड भेद, सुरत,गुवाहाटी, गोवा, चार्टर विमानं असं सगळं करूनही ६ मतं कशी काय कमी झाली शिंदेभाजपची?

३) नव्या अध्यक्षांनी प्रतोद म्हणून गोगावले व शिवसेना म्हणून शिंदेगटाचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय ११/७/२०२२ पर्यंत स्थगित ठेवलेला असताना अध्यक्षांचे हे वर्तन कंटेंट ऑफ कोर्ट नाही का?

४) समजा उद्या शिवसेनेच्या तक्रारीवरून ३९ आमदारांची आमदारकी गेली तर या सरकारचे काय होईल? कारण १६४ वजा ३९ म्हणजे१२५ आमदार होतात, बहुमत कुठेय?

५) अगदी आज जसे अध्यक्ष पहिल्याच दिवशी पक्षपाती वागले, तसे वागून त्यांनी ३९ च्या शिंदेगटाला अभय दिले तर मग त्यांना गोगवलेंच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवावे लागेल. तसे झाल्यास ह्या अन्यायामुळे राज्यात या सरकारविरुद्ध प्रक्षोभ माजेल आणि या सरकारला जनता कधीच माफ करणार नाही.

६) समजा निवडणूक आयोगाचे आजवरचे भाजपधार्जिणे वर्तन बघता त्यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना अशी मान्यता दिली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनमत उसळेल. हे सरकार जेव्हा पडेल तेव्हा या ३९ मधले किती परत निवडून येतील?

७) गेल्या आठ वर्षांत दिलासालयातून खूपदा भाजपला दिलासा मिळालेला आहे. तसे जरी झाले तरी जनता सर्वोच्च आहे नी ती या पक्षफोड्यांना माफ करणार नाही. तेव्हा शिवसेना लढणार नी जिंकणार हे नक्की आहे.

Updated : 4 July 2022 3:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top