Home > मॅक्स ब्लॉग्ज > डॉ.शीतल यांच्या आत्महत्येच्या निमित्ताने

डॉ.शीतल यांच्या आत्महत्येच्या निमित्ताने

कोणतीही कलाकृती ही आपल्या मनाची अभिव्यक्ती असते. डॉ.शीतल आमटे- करजगी यांनी आत्महत्या करण्याआधी ट्विटरवर टाकलेल्या त्यांच्या चित्राच्या त्यांच्या मनाची अवस्था शब्दबद्ध केली आहे,गोविंद अ.वाकडे यांनी...

डॉ.शीतल यांच्या आत्महत्येच्या निमित्ताने
X

ताकद वाटत जाणारी माणसं अर्ध्यावर सोडून गेली की समाज अर्धमेला राहतो... -डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या करण्याआधी ट्विटरवर टाकलेल्या त्यांच्या चित्रात वापरलेला आशा पल्लवीत करणारा पिवळा रंग असब्धपणे झाकला गेलाय, चित्र दोन विभागात बघितलं तर लक्षात येईल की वर असलेल्या रंगाचं खाली फार रिफ्लेक्शन दिसत नाही,

सगळं विस्कळीत आहे, चित्रातील स्ट्रेक्स /रेषा बघून त्यात प्रचंड राग आहे हे लक्षात येतं पण त्या रागाला शेवट पर्यंत नेण्याची शक्ती नसल्याने स्ट्रोक्स छोट्या- छोट्या वापरल्या गेलेयतं, मेंदूत ब्लॉकेजस व्हावेत तसे विचार खुंटलेयत, कुठूनतरी वर यायचा प्रयत्न आहे... मात्र आपण दुःखासह वर यावं तर अनेकांना खरं वाटणार नाही म्हणून दुखासह स्वतःला विविध रंगछटांखाली दाबून ठेवण्याचा प्रयत्न चित्रात दिसतोय....

ख्यातनाम चित्रकार असलेली माझी एक मैत्रीण हे बोलत होती आणि मी ऐकत होतो.. खरंतर ती रंगांचे अर्थ उलगडण्याच्या प्रयत्न करत होती आणि मी मात्र डॉ.शीतल यांच्या मृत-मनाचा वेध घेत होतो, दुपारी त्यांच्या आत्महत्येची बातमी आली त्या बरोबर त्यांचे निरागस हास्य असलेल्या चेहऱ्याचे फोटोही व्हायरल झाले, त्यांचं सामाजिक कार्य आणि कुटुंबवत्सल लिखाणामुळे त्या स्मरणात होत्याच तेव्हा त्यांच्या अशा जाण्याने साहजिकच सभोवताली अनेक प्रश्नांनी गर्दी केली आणि प्रश्नांच्या घोळक्यात एकटं वाटू लागलं...

डॉ.शीतल गेल्याच दुःख आहेच पण त्यांनी एव्हढं टोकाचं पाऊल का उचललं असावं? अशी मोठी माणसं आत्महत्या करून स्वतःला मुक्त करत असतील तर आपणही तेच केलं तर चालेल का? आत्महत्याचं सगळ्या जटिल प्रश्नांच उत्तर असतं का? अशा असंख्य प्रश्नांची चादर समाजावर नैराश्य बनून पसरु लागली हे अधिक वेदनादायक होतं आणि त्याहीपेक्षा एखाद्या अंधाऱ्या खोलीत आपण दरवाजा म्हणून भिंतींनाच धडकत राहिलो किंवा दीपस्तंभ वगरे कल्पना खोट्या ठराव्यात एव्हढा हा वाईट प्रकार आहे असं वाटू लागलं

कारण ही मोठी माणसं अशा पद्धतीने जग सोडून जातात तेव्हा आपल्या सोबत सामान्यांच्या जगण्याची उमेद घेऊन जातात...!! केवळ आणि केवळ आपली म्हणविणारी माणसं आणि त्यांची मानसिकता उघडी पडली की डिप्रेशन/ नैराश्य येतं आणि "सांगता येईना अन सहन होईना" अशी अनेकांची गत होते थोडक्यात काय तर माणूस म्हणून तुम्ही जगाशी लढू शकता पण स्वकीयांचा सामना करतांना कुणाच्याच अंगात त्राण राहत नाही अर्जुनही याला अपवाद नव्हता तिथे आपण कोण ...?

पण यावर उपाय आहे का...? तर नक्की आहे...!! तुमचा सारथी खंबीर असायला हवा जो योग्य वेळी योग्य मार्गानेच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेईल आणि भरकटत असाल तर लगाम घालेल अर्थात इथे सारथी हा साक्षात श्रीकृष्ण नसून आपलं मन-मेंदू आणि मस्तक आहे. मात्र अशा घटना बघितल्या की आपला मन मेंदू आणि मस्तकावरील ताबा सुटतो आणि आपण हतबल होतो हतबलता जी आपलं अस्तित्व हिरावून घेते आणि आपण त्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीशी स्वतःची तुलना करायला लागतो

सामान्यतः हे असं होणं स्वाभाविक आहे कारण आपण समाज म्हणून हळवे आहोत त्यामुळे दुःख पचविण्यापेक्षा त्याला अंगिकाराने आपल्याला सोप्प वाटतं पण हे करत असतांना आपणच आपल्या दुबळेपणाची दरी अधिक खोल करत जातो डॉ.शीतल यांच्या आत्महत्येच्या निमित्ताने मला एव्हढचं सांगायच आहे की किंवा तुम्हीही हे आप-आपल्या माणसांना निक्षून सांगायला हवं की..

जे-जे मला आपलं समजतात त्यांनी आजन्म मला त्यांचाच समजावं, माझ्या वृत्तीचा दोष पोटात घालावा, कारण तुम्ही जसे माझ्या शिवाय नाहीत तसा मी तुमच्या शिवाय काहीच नाही, दुर्दैवाने भविष्यात मी कधी माझ्या शब्दाला जागलो नाहीच तर त्याचा अर्थ तुम्ही माझी जागा मृत्यूला द्यावी हे मला अजिबात चालणार नाही

एकूणच काय तर डॉ.शीतल आमटे यांची जाण्याची घटना आपल्याला नैराश्यच देणारी आहे पण आपण या घटनेतून नैराश्य घेण्याऐवजी स्वतःला अधिक मजबूत करण्याचं धाडस जमा करू शकलो तर त्यांच्या आत्म्याला खरी शांती लाभेल अस मला वाटतेकोणतीही कलाकृती ही ही आपल्या मनाची अभिव्यक्ती असते.डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या करण्याआधी ट्विटरवर टाकलेल्या त्यांच्या चित्राच्या त्यांच्या मनाची अवस्था शब्दबद्ध केली आहे,गोविंद अ.वाकडे यांनी...

Updated : 7 Dec 2020 4:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top