Home > मॅक्स ब्लॉग्ज > पॉर्न महोत्सव  - डॉ. विनय काटे

पॉर्न महोत्सव  - डॉ. विनय काटे

पूर्वी आत्तासारखे स्मार्टफोन नसल्याने जे काही उपक्रम व्हायचे ते सामूहिक व्हायचे. मग सिनेमा बघण असो वा सण साजरे करण. हेच संस्कार तेव्हाच्या तरुणाईवर देखील होत होते. तरुणाई म्हटल की त्यांचा कल पॉर्न कडे असणारच हे काही नव्याने सांगायला नको. अर्थात तेव्हा पॉर्न देखील मित्र मित्र एकत्र पाहायचे. कसे जाणून घ्या डॉ. विनय काटे यांच्या लेखातून...

पॉर्न महोत्सव  - डॉ. विनय काटे
X

काळ तोच 1999-2000 सालचा! आमच्या एका मित्राकडे तेव्हा मोठा कलर टिव्ही आणि होम थिएटर सिस्टीम होती. त्याचे आईवडील आठवडाभराच्या ट्रीपला गेले होते, त्यामुळे त्याचे घर हे तेव्हा आमच्यासाठी हक्काचे स्थान होते. आम्ही सगळ्या मित्रांनी मग पॉर्न महोत्सव साजरा करण्याचे ठरवले. आम्ही 7-8 मित्र घरच्यांना अभ्यास करायला मुक्कामी जातोय म्हणून घरातून सकाळीच जेवण करून संध्याकाळचा डबा घेवून त्या मित्राकडे जात असू.

तेव्हा गावातल्या एका बंद पडलेल्या मिलच्या मालकाने CD भाड्याने देण्याचा व्यवसाय थाटला होता. एका सीडीचे भाडे दिवसाला 20-30 रुपये काहीतरी होते. आम्ही सगळे मित्र रोज वर्गणी करून किमान 6-7 VCD तिथून भाड्याने आणून पाहायला लागलो. मित्राचे घर थोडे गर्दीपासून बाजूला असल्याने होम थिएटरचा आवाज मोठा करून मोठ्या स्क्रीनवर आनंदाने आस्वाद घेतला जात होता. बाथरूम सदैव बिझी राहत होते. इतक्या साऱ्या CD पाहून नंतर मॉडेलसुद्धा ओळखीच्या वाटायला लागल्या होत्या.

रोजच्या रोज जुन्या CD देवून नव्या CD आणणे हा उपक्रम झाला होता. आणि एके दिवशी गंमत झाली. CD बदलून आणायला मी आणि मित्र गेलो होतो तेव्हा नेहमीचा दुकानदार जागेवर नव्हता, तर त्याची पंचविशीतली बायको तिथे बसली होती. तिला बघून आम्ही एकदमच चपापलो की आता काय करायचे! बाकीची गिऱ्हाईक आपल्या सिनेमाच्या CD माघारी करत होती. आम्ही आपले काय करायचे या विचारात अंग चोरुन तिथेच उभे राहिलो. थोड्या वेळाने सगळे गेल्यावर आमच्या हातातल्या CD पाहून तिने विचारले "CD माघारी करायच्या आहेत का?" आम्ही होकारार्थी मान हलवून तिच्या हातात सगळ्या CDs दिल्या.

त्यांच्या कव्हरवर कसलेही चित्र नव्हते. तिने शांततेत त्या CD माघारी घेतल्या.

तिने सांगितलेले पैसे आम्ही तिला दिले. पैसे घेता घेता ती म्हणाली "चांगलं नवीन कलेक्शन आलंय काल. पाहिजेत का?" एखाद्या माणसाने भूत बघावे तितका जोराचा झटका मला आणि मित्राला बसला. नाही म्हणावे तर आजचा महोत्सवाचा दिवस वाया जाणार होता. आम्ही हळूच म्हणालो "द्या!" तिने लगेच एका कपाटातून 30-40 CDs चा गठ्ठा काढला आणि वरची अगम्य नावे वाचून आम्हाला अजुन 6-7 CD देवून टाकल्या. तो घेवून तडक आम्ही मित्राच्या घरी पोचलो आणि परत शो सुरू केला!

- डॉ. विनय काटे

Updated : 7 Oct 2022 9:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top