Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाजपच्या एकाधिकारशाही विरोधात संयुक्त लोक कृतीचे आवाहन- डॉ.गणेश देवी

भाजपच्या एकाधिकारशाही विरोधात संयुक्त लोक कृतीचे आवाहन- डॉ.गणेश देवी

केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या एकाधिकारीशाहीने लोकशाही राज्यालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याविरोधात लढण्यासाठी काय केले पाहिजे, याचे विश्लेषण केले आहे राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी

भाजपच्या एकाधिकारशाही विरोधात  संयुक्त लोक कृतीचे आवाहन- डॉ.गणेश देवी
X

राष्ट्र सेवा दल ही एक लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद आणि घटनात्मक मूल्यांचा पुरस्कार करणारी, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्य करणारी संघटना आहे. संघटनेला अतिशय अभिमानास्पद असा प्रदीर्घ इतिहास आहे. अलीकडच्या काळात सेवा दलाने फॅसिझम विरोधी लढा, नागरी हक्क सुधारणा कायदा विरोधी चळवळ आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सर्व ताकदीनीशी सहभाग केला होता.

एक एप्रिल, राष्ट्र सेवा दलाचे प्रथम दल प्रमुख साथी एस.एम.जोशी यांचा स्मृती दिवस आहे. गांधींच्या नेतृत्वाखाली झालेली स्वातंत्र्याची चळवळ आणि आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेली सामाजिक न्यायची चळवळ या दोन्ही आघाडीवर एस. एस. जोशी यांनी योगदान दिले होते. स्वातंत्र्यानंतर देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी एस.एस. यांनी संयुक्त लोक कृतींना आणि प्रयत्नांना प्रेरित केले होते. त्यांचा एक विनम्र वारस म्हणून आजच्या दिवशी देशाच्या संविधानात नमूद केलेल्या पवित्र मूल्यांचे एकजूटीने रक्षण करण्याचा राष्ट्र सेवा दलाचा कठोर निर्धार मी देशातील सर्व महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्यांसमोर मांडला पाहिजे. ते माझे कर्तव्य आहे असे मी समजतो.

रा.स्व.संघाच्या तत्वज्ञानावर आधारित काम करणार्याि भाजप सरकारच्या काळात देशाच्या संघीय रचनेला आणि संवैधानिक घटनात्मक मूल्याधारित सर्वधर्मसमभावाचे धोरण अंगीकारणार्या् लोकशाही भारतीय संघराज्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आपणही अनेकवेळा आपल्या सार्वजनिक भाषणातून या धोक्याचा उल्लेख केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व लहानमोठे राजकीय पक्ष, नागरी संघटना, कार्यकर्ते, विचारवंत, कलाकार, प्रसार माध्यमांतील कृतिशील कार्यकर्ते, मुक्त अभिव्यक्तीचे पुरस्कर्ते आणि विधयक संस्थात्मक काम करणारे कार्यकर्ते अशा सर्वांनी एकत्र येऊन सर्वसमावेशक, सहिष्णू, निर्भय आणि लोकशाही भारताचे जतन आणि संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे.

आजच्या परिस्थितीत एकाच राजकीय पक्षाकडे सर्व राजकीय निधीचे नियंत्रण आहे. एकच राजकीय पक्ष विनाअडथळा देशातील सर्व शासकीय यंत्रणांचा वापर करून सरकारला विरोध करणार्याक किंवा त्या पक्षाच्या सर्वंकष एकाधिकारशाही तत्वज्ञानाला आव्हान करणार्याव सर्वांचे आवाज दडपून टाकत आहे. अशा परिस्थितीत आपण आपले सर्व राजकीय आणि व्यक्तिगत मतभेद बाजुला सारत एकत्रितपणे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे त्यात सहभागी प्रत्येकासाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक 'लोक कृती ' कार्यक्रम असेल – तो भारताच्या लोकांचा कार्यक्रम असेल. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाचा परिचय असलेल्या सर्वांना माहीत आहे की असा संयुक्त लोक कृती कार्यक्रम तयार करणे अजिबात सोपे नाही. आपल्या देशातील सामाजिक गुंतागुंत, सांस्कृतिक विविधता,परस्पर मतभेदांत अडकलेल्या राजकीय भूमिका आणि फाटाफूट यामुळे अशा संयुक्त कृती कार्यक्रमाची एकमताने आखणी करणे अत्यंत अवघड काम आहे. मात्र हे काम कितीही अवघड असले तरी आपल्याला ते करायला पाहिजे. एकसंघ भारतासाठी, भारताच्या संविधान रक्षणासाठी आणि भारतातील लोकशाही रक्षणासाठी आपले ते आजचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. अशा कृती कार्यक्रमाचा विचार करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे देशाचे संघराज्य स्वरुप, सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही व्यवस्था या मूल्यांचा पुरस्कार करणार्याव सर्व राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते, काही महत्त्वाच्या नागरी संघटना आणि महत्त्वाचे विचारवंत आणि बुद्धीमंत यांना आमंत्रित करून हा संयुक्त कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयास आहे. कोविड निर्बंध शिथिल झाले की मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात ही संयुक्त लोक कृती परिषद मुंबईत आयोजित करण्यात यईल.

भारतीय संघराज्यावर प्रेम करणाऱ्या आणि संविधानिक मूल्यांशी निष्ठा असणाऱ्या प्रत्येकाने यात सहभागी व्हावं, हेच आवाहन.

गणेश देवी

राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल

दिनांक : १ एप्रिल २०२१

Updated : 3 April 2021 3:55 AM GMT
Next Story
Share it
Top