Home > मॅक्स ब्लॉग्ज > #Rajyasabha कॉंग्रेस योगेंद्र यादवांचे विधान खरे ठरवत आहे का?

#Rajyasabha कॉंग्रेस योगेंद्र यादवांचे विधान खरे ठरवत आहे का?

:मे २०१९ मध्ये योगेंद्र यादव म्हणाले होते की, 'मोदींचे आव्हान पेलण्यास सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे.' या विधानानंतर योगेंद्र यादव यांच्यावर टीकेची झोड उठली होती. कॉंग्रेस स्वतःच यादवांचे विधान खरे ठरवत आहे का? कॉंग्रेसला खरचं मोदींशी दोन हात करायचेत का? राज्यसभा उमेदवारांच्या नावावरुन कॉंग्रेस थेट मोदी- भाजपला मदत करत आहेत का? लेखक तुषार गायकवाड यांनी केलेलं सडेतोड विश्लेषन...

#Rajyasabha कॉंग्रेस योगेंद्र यादवांचे विधान खरे ठरवत आहे का?
X

मे २०१९ मध्ये योगेंद्र यादव म्हणाले होते की, 'मोदींचे आव्हान पेलण्यास सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे.' या विधानानंतर योगेंद्र यादव यांच्यावर टीकेची झोड उठली होती. कॉंग्रेस स्वतःच यादवांचे विधान खरे ठरवत आहे का? कॉंग्रेसला खरचं मोदींशी दोन हात करायचेत का? राज्यसभा उमेदवारांच्या नावावरुन कॉंग्रेस थेट मोदी- भाजपला मदत करत आहेत का? लेखक तुषार गायकवाड यांनी केलेलं सडेतोड विश्लेषन...

मे २०१९ मध्ये योगेंद्र यादव म्हणाले होते की, 'मोदींचे आव्हान पेलण्यास सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे.' या विधानानंतर योगेंद्र यादव यांच्यावर टीकेची झोड उठली होती. कारण ब्रिटिश राजवट उलथवण्यात ज्या काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. त्या काँग्रेसला मोदींशी दोन हात करणे अशक्य नव्हते.

पण आता योगेंद्र यादव यांचे ते विधान स्वतः काँग्रेस पक्षच तंतोतंत खरे करताना दिसत आहे. सध्या मुद्दा असा आहे की, 'काँग्रेसला खरंच मोदींशी दोन हात करायचे आहेत का?'

महाराष्ट्र राज्यसभा सदस्य म्हणून जाहीर केलेल्या नावावरुन काँग्रेसच मोदी-भाजपला थेट मदत करत आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय. काँग्रेस भाजपच्या कच्छपी लागलेली नसेल, तर महाराष्ट्र राज्यातील नेत्यांस राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने का घेतला?

समस्त महाराष्ट्र काँग्रेसच्या उरलेल्या मतदारांना दुखावून एक अमराठी नेता महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडल्याने, राज्यातील काँग्रेसचा मतांचा टक्का घटेल. हे न समजण्याइतपत शहाणपण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे आणि नेतृत्वाकडे कसा काय नाही? सतत महाराष्ट्राबाहेरचा उमेदवार लादण्याची परंपरा कायम ठेवण्याचा हा काळ आहे का?

महाराष्ट्रातून राज्यसभेवर मूळचे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते व प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मोहम्मद इम्रान प्रतापगढी निवडलेत. कव्वाली गायक, उर्दू भाषेतील कवी महाराष्ट्रातील समस्या राज्यसभेत मांडणार आहेत का?

महाराष्ट्र काँग्रेसमधे राज्यसभेसाठी एकही लायक नेता नाही का? की, दिल्लीतील राहुल भोवतीच्या कोंडाळ्याचा निर्णयच यापुढे काँग्रेस मध्ये राबवला जाणार असल्याचा हा स्पष्ट मेसेज असावा.

इम्रान प्रतापगढी सन २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले होते. पण ते पराभूत झाले. जून २०२१ मध्ये त्यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेश मधील काँग्रेसच्या मतांचा टक्का सातत्याने कमी होत असताना हा निर्णय घेऊन, बहुधा महाराष्ट्रातील काँग्रेस गाडायचेच ठरवले असावे.

राजस्थान मध्ये चिंतन करुन आलेल्या काँग्रेसला मरगळ झटकून पुन्हा नव्याने ठाम उभा राहण्याची इच्छा आहे का? जर असेच सुरु राहीले तर २०२४ मध्ये राज्यात काँग्रेसचे ३० च्या आसपासच आमदार निवडून येतील. तेसुद्धा जसे २०१४ व २०१९ मध्ये स्वतःच्या ताकदीवर निवडून आले तसेच.

राजस्थानमधून राहुलच्या कोंडाळ्यातील रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही उमेदवार राजस्थानचे नाहीत. या अनुषंगाने 'पवन खेरा' यांनी 'शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई' असे ट्विट केलं आहे. बहुधा हातची राज्ये घालवून देश भाजप युक्त करण्याचा मानस काँग्रेसने केलाय की काय? असा प्रश्न पडतो.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाला राजस्थानमधून उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला. म्हणून प्रतापगढींना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. एकंदरीत काँग्रेसलाच समर्थक आणि मतदारांची गरज उरलेली नाही. यापुढे आपण काँग्रेसकडून अपेक्षा ठेवावी का? हा ज्याचा त्याचा प्रश्न!!

'शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई' असे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी, समर्थकांनी म्हणत स्वतःची समजूत काढावी.

Updated : 30 May 2022 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top