Home > मॅक्स ब्लॉग्ज > क्लासिकल भांडवलशाही आणि मक्तेदार भांडवलशाही यातील फरक काय?

क्लासिकल भांडवलशाही आणि मक्तेदार भांडवलशाही यातील फरक काय?

प्रत्येक भांडवलशाही मध्ये कामगारांचं मरण हे आलचं... मात्र कामगारांबरोबरच ग्राहकांचं मरण देखील भांडवलशाही मध्ये दडलेले असते. वाचा संजीव चांदोरकर यांचा क्लासिकल भांडवल शाही आणि मक्तेदार भांडवलशाही यातील फरक सांगणारा लेख

क्लासिकल भांडवलशाही आणि मक्तेदार भांडवलशाही यातील फरक काय?
X

गुगलची मक्तेदारी असली तर मला काय फरक पडतो? गुगल विरुद्ध अमेरिकेतील न्याय खात्याने मक्तेदारी नियंत्रण कायद्याखाली दावा लावला आहे. भारत देखील आपल्या कॉम्पिटिशन कमिशनसारख्या नियामक मंडळाकडे गुगल विरुद्ध चौकशी करण्याचा विचार करत आहे. समाजमाध्यमामध्ये नेहमी भांडवलशाही समर्थक विरुद्ध समाजवाद / डाव्या विचारांचे अशा घमासान चर्चा होतात; ज्याचे स्वागत केले पाहिजे. पण मुळात क्लासिकल भांडवलशाही आणि मक्तेदार भांडवलशाही ही दोन भिन्न मोडेल्स आहेत.

स्पर्धेवर आधारित क्लासिकल भांडवलशाही समाजातील वस्तुमाल उत्पादनाला जेवढी उपयुक्त तेवढी मक्तेदार भांडवलशाही समाजाला घातक असते. मक्तेदार भांडलवलशाही मोनोपॉली रेंट कमवायला लागते. आपल्या वस्तुमाल सेवांच्या मनमानी किंमती ठेवते; कामगारांना कमीतकमी वेतनात राबवून घेते. आणि सर्वात गंभीर म्हणजे आपल्याला मुळात स्पर्धक तयार होणार नाहीत. यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरून नव्या पोटेन्शियल स्पर्धकांना गर्भाशयात खुडून टाकते.

अमेरिकेत सोशल मीडिया कंपन्या व्यतिरिक्त विमानकंपन्या, बँका, औषध निर्माण, म्युझिक लेबल्स अशा अनेक क्षेत्रात चार दोन कंपन्यांच्या हातात सारे मार्केट आहे. या क्षेत्रांमध्ये स्पर्धेचा अभाव असल्यामुळे, ग्राहकांना वस्तुमाल सेवांसाठी अधिक किंमत मोजावी लागते.

एका अंदाजानुसार अमेरिकन कुटूंब जास्त किंमतीमुळे सरासरी महिन्याला ३०० डॉलर्स जास्त देतात; आणि कामगारांना वर्षाला दीड ट्रिलियन्स डॉलर्स वेतन कमी मिळते. भांडवलशाही समर्थकांना आवाहन की त्यांनी मक्तेदारी भांडवलशाही बद्दल आपली भूमिका जाहीर करावी.

संजीव चांदोरकर (२२ ऑक्टोबर २०२०)

Updated : 25 Oct 2020 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top