Home > मॅक्स ब्लॉग्ज > रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रदेशाध्यक्षा पाहील्यात का ?

रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रदेशाध्यक्षा पाहील्यात का ?

राजकारण म्हणजे श्रीमंत घरातील लोकांची कामं असं वाटायचं परंतु या बद्दल आज थोडाफार दृष्टिकोन बदलला आहे. कारणही तसंच होतं. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असणाऱ्या रेखा ताई मुलाखतीला येताना चक्क रिक्षातून आल्या होत्या. सोबत ९ ते १० कार्यकर्ते त्याच भागातले होते. याअगोदरही बातमीनिमित्त ताईंची भेट झाली होती परंतु कार्यकर्त्यांच्या गराड्यात बोलता नाही आलं. अशा भावना पत्रकार कृष्णा कोलापटे यांनी व्यक्त केल्या आहेत.

रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रदेशाध्यक्षा पाहील्यात का ?
X

नुकतीच मॅक्स महाराष्ट्रावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची मुलाखत झाली. अत्यंत साधा सरळ स्वभाव आजपर्यंत विविध पक्षातील पदाधिकारी पाहिलेत त्यांचा थाट, त्यांचा रुबाब वेगळाच असतो साधा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी जरी असला तरी चार चाकी गाडीशिवाय प्रवास करत नाही. त्यामुळे राजकारण म्हणजे श्रीमंत घरातील लोकांची कामं असं वाटायचं परंतु या बद्दल आज थोडाफार दृष्टिकोन बदलला आहे. कारणही तसंच होतं. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असणाऱ्या रेखा ताई मुलाखतीला येताना चक्क रिक्षातून आल्या होत्या. सोबत ९ ते १० कार्यकर्ते त्याच भागातले होते. याआगोदरही बातमी निमित्त ताईंची भेट झाली होती परंतु कार्यकर्त्यांच्या गराड्यात बोलता नाही आलं.

रेखा ताई रिक्षातून उतरल्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलू लागल्या, मी एका बाजूला उभं राहून माझं निरीक्षण नोंदवू लागलो. मनात विचार एकच पक्षाच्या येवढ्या मोठ्या पदावर असणारी हि व्यक्ती रिक्षाने कशी काय येऊ शकते. त्यांच्याशी गप्पा मारत ऑफिस मध्ये आलो. ताईंना आमचं ऑफिस दाखवून सर्व स्टाफ सोबत ओळख करुन दिली. त्यांनतर कार्यकारी संपादक मनोज भोयर सर यांनी मुलाखत घेतली.




ताईंची मुलाखत झंझावती झाली. ताईनी आपल्या राजकारणाची मांडणी एकदम मोजक्या शब्दात सविस्तर मांडली. युक्रांत ते मंडल आणि भारिप ते वंचित आघाडीत त्यांचा जनतेच्या प्रती संघर्षात प्रत्येक प्रश्नावर ते सिक्स मारत होत्या मुलाखत उरकल्या नंतर पुन्हा आम्ही ऑफ द कॅमेरा बोलू लागलो यावेळी विषय होता महिलांची राजकीय संघटना यावर प्रश्न असा होता की महिला या कोणत्याही मुद्द्यावर आक्रमक होत नाहीत. ताइनी यावर भन्नाट उत्तर दिलं, म्हणाल्या " महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाही त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. वेळप्रसंगी भांडायला आपली बाजू बरोबर कशी आहे यासाठी झिंझ्या उपटायला सुध्दा कमी करणार नाहीत हे ऐकल्या नंतर स्टुडिओत संपूर्ण हास्य फुललं ताईंचा मोकळा स्वभाव यात दिसून आला. त्यांचं मोजकं बोलणं आणि प्रत्येक प्रश्नावर चौकार षटकार मारणं हा त्यांच्या जीवनातला आता पर्यंतचा संघर्षमय अनुभव जाणवत होता.




यानंतर आम्ही स्टुडिओत फोटो काढले ताईंना मॅक्स महाराष्ट्राचा दिवाळी अंक भेट दिला आणि त्यांना सोडण्यासाठी पुन्हा रोड ला आलो काही कार्यकर्ते तिथे जमा झाले होते त्याना नाष्ट्यासाठी हॉटेलला जावू असं म्हणतं होते परंतू ताईंनी त्यांना इथे वंचित आघाडीची शाखा कुठे आहे असं विचारलं, त्यातील एकजण म्हणाला इथून थोडी लांब आहे पण आमच्याकडे गाडी नाही आपल्याला चालत जाव लागेल आणि ताई चक्क चालत निघाल्या. आणि मी त्यांना बाय करुन पुन्हा ऑफिसला आलो.

हा क्षण मनाला चटका लावणारा होता, विचार करायला लावणारा होता. आता देशातील इतर पक्षांचा तुम्ही विचार करा त्यांच्या पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत झगमगती दुनिया पाहायला मिळेल. चौकात जरी जायचं असेल तरी चार चाकी काढणारी माणसं पाहिली आहेत. आणि रेखा ताई वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत राज्याच्या नेत्या आहेत. ताईंच्या साधेपणामुळे सर्वसामान्याला आजही राजकारणात चांगलं स्थान मिळू शकत. असं मला वाटतं...

पत्रकार - कृष्णा कोलापटे


Updated : 17 Jan 2024 3:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top