Home > Top News > देवेंद्र फडणवीस vs उद्धव ठाकरे: लोकप्रियतेत फडणवीस ठाकरेंना वरचढ ठरतायेत का?

देवेंद्र फडणवीस vs उद्धव ठाकरे: लोकप्रियतेत फडणवीस ठाकरेंना वरचढ ठरतायेत का?

देवेंद्र फडणवीस vs उद्धव ठाकरे: लोकप्रियतेत फडणवीस ठाकरेंना वरचढ ठरतायेत का?
X

मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर सहकारी मंत्रालयात येऊन बैठका घेत आहे. मात्र, ज्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आहे. असे उद्धव ठाकरे मंत्रालयात देखील येत नाही. अशी टीका विरोधक करत आहेत.

तर दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध समस्यांसंदर्भात लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची मातोश्री च्या बाहेर न पडणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण होत आहे का?

मागील 15 दिवसांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा विचार केला तर पुणे, ठाणे, आणि कळंबोली सोडता मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर पडलेले नाहीत. (उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत फेसबूक अकांउट वरील माहिती)

उद्धव ठाकरे यांचे गेल्या 15 ऑगस्टपासून चे दौरे...

15 ऑगस्ट मुंबई (स्वातंत्र्य दिन सोहळा )

18 ऑगस्ट मुंबई (गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनां संदर्भाक आढावा बैठक)

18 ऑगस्ट मुंबई (online) (नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधकांशी आर्थिक शिफारशींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा)

19 ऑगस्ट मुंबई ( नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा )

20 ऑगस्ट मुंबई (पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बैठक)

21 ऑगस्ट मुंबई (रायगड जिल्ह्यातील RT-PCR प्रयोगशाळेचे उद्घाटन Online ) मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि कार्डियाक अँब्युलन्सचे लोकार्पण online

23 ऑगस्ट मुंबई (गणेश मुर्ती विसर्जन सोहळा )

24 ऑगस्ट ठाणे (ठाणे महानगरपालिका सभागृह येथे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना )

24 ऑगस्ट (कल्याण डोंबिवली) (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकांचा लोकापर्ण सोहळा )

25/08 (प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अभिनंदन...)

26/08 मुंबई (सोनिया गांधी यांच्या सोबत ऑनलाईन मिटींग... online )

28/08 मुंबई (‘सिद्धिविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन online सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूरमधील १२ रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण (online)

29/08 मुंबई रमाधाम वृद्धाश्रम नूतन वास्तू उद्घाटन सोहळा online.

देवेंद्र फडणवीस...

16, 17, 18 ऑगस्ट: नागपूर

19 ऑगस्ट: वर्धा आणि यवतमाळ

20 ऑगस्ट: नागपूर

21 ऑगस्ट: भंडारा

28 ऑगस्ट: पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, आणि सांगली

29 ऑगस्ट: सांगली आणि कोल्हापूर

2 सप्टेंबर : नागपूर, भंडारा, गोंदिया (पूरग्रस्त)

3 सप्टेंबर: चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया (पूरग्रस्त)

दोनही नेत्यांच्या फक्त दौऱ्यांचा जरी विचार केला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे, ठाणे सोडता. मुंबई बाहेर पडलेले दिसत नाही. बहुतांश कार्यक्रम ते ऑनलाईनच पार पाडतात. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करुन या भागातील कोव्हिड स्थितीची माहिती घेतली. विदर्भात आलेल्या प्रलयकारी पुरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरस्थितीची स्वत: ग्राउंडवर जाऊन पाहणी केली. आणि लोकांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी केली.

मात्र, राज्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, लोक पुरामध्ये अडकलेले असताना बाहेर पडत नाहीत. अशी टीका विरोधक करत आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तुलना सुरु झाली असून यामुळे उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संदर्भात आम्ही काही राजकीय विश्लेषकांशी बातचित केली...

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे फक्त मुंबईचे मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी बाहेर पडायला हवं. विदर्भात पूर आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. मिटींग घेताना दिसत नाहीत. त्यामुळं तात्कालिक कारणांचा विचार करता, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झाली आहे. फक्त उद्धव ठाकरे यांचीच लोकप्रियता कमी झाली नाही. तर पक्ष म्हणून शिवसेनेची देखील लोकप्रियता कमी झाली आहे. कोरोनाच्या काळात पुर्वी सारखी शिवसेना Active दिसली नाही. एकनाथ शिंदे काम करताना दिसतात. मात्र, शिवसेनेचे इतर नेते फारसे Active दिसत नाहीत. ग्रामीण भागात शिवसेनेला याचा मोठा फटका बसेल. फक्त संजय राऊत माध्यमांवर बोलतात. मात्र, त्यांचं कार्य काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी बातचित केली...

यावेळी त्यांनी या संदर्भात बोलताना कोरोनाच्या काळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपली भूमिका चोख निभावत आहे. विरोधी पक्षाचं नेत्याचं काम करत आहे. सरकारच्या चुका निदर्शनास आणून देत आहेत. सरकारला पत्र लिहित आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या ठिकाणी जायला हवं. जनतेला दिलासा मिळतो. यंत्रणेवर ताण पडत असेल म्हणून ते जास्त बाहेर पडत नसतील. जी काम एखाद्या ठिकाणी न पोहोचता होत असतील तर मुख्यमंत्री ते मुंबईतून करत असतील. मात्र, शरद पवार सारखा माणूस बाहेर पडतो. तर यांनी नक्कीच काही ठिकाणी बाहेर पडायला हवं. लोकप्रियतेबाबत मला काही विशेष वाटत नाही. उद्धव ठाकरे जनतेत तसे लोकप्रिय कधीच नव्हते. लॉकडाऊनच्या काळात फेसबूकला सुरुवातीला views आले. मात्र, नंतर काही तसे दिसले नाही. त्यामुळं लोकप्रियतेवर परिणाम झाला असं म्हणता येणार नाही.

एकंदरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडायला हवं असं मत सर्वच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झाली आहे. याबाबत वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळाले.

Updated : 4 Sep 2020 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top