Home > मॅक्स ब्लॉग्ज > नोटबंदीचा निर्णय दिवाळखोरीचा- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर

नोटबंदीचा निर्णय दिवाळखोरीचा- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

नोटबंदीचा निर्णय दिवाळखोरीचा- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर
X

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वा पंतप्रधान मोदी यांनी चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करत असल्याची घोषणा केली. त्याप्रमाणेच शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयाची नोट चलनातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी भाष्य केले आहे.

मुळामध्ये सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. हाच पूर्णपणे मुळात चुकीचा होता. पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून काढून अर्थव्यवस्थेवर मोदी सरकारने फार मोठा आघात केला. खरं म्हणजे तेव्हाच सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने मोदी सरकारचा राजीनामा मागायला हवा होता. पण त्याच्यामध्ये दुसरे महत्वाची गोष्ट अशी आहे की, लोक काळा पैसा पाचशे रुपये आणि एक हजार रुपयाच्या नोटांमध्ये ठेवतात. अशा प्रकारचा अज्ञानीपणा दाखवून त्यांनी काळा पैसा बंद करण्यासाठी त्या नोटा रद्द केल्या. आणि पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करून दोन हजाराची नोट त्यांनी बाहेर काढली. त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की, पाचशे रुपयाच्या चौपट लोक काळा पैसा दोन हजार रुपयाच्या नोटेमध्ये ठेऊ शकतात. मात्र दोन हजाराची नोट त्यांनी काढली आणि बाजारमध्ये आणली. त्याच्यानंतर जो घोटाळा झाला. त्या नोटांची शाई टिकत नव्हती. ती शाई सुद्धा हळूहळू विरळ होत होती, जात होती. लोकांच्या मनामध्ये confusion होतं आणि एकूणच दोन हजारच्या नोटा काढणं यापेक्षा पहिली नोटबंदी करणे आणि त्यानंतर दोन हजाराची नोट काढणे हे सरकारचे दोन दिवाळखोरीचे निर्णय होते, असं स्पष्टपणे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटलं आहे.

Updated : 20 May 2023 2:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top