Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > नरेंद्र भाई सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलात की काय ?

नरेंद्र भाई सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलात की काय ?

नरेंद्र भाई सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलात की काय ?
X

आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब,

प्रधानमंत्री,

भारत सरकार,

नवी दिल्ली.

महोदय,

नरेंद्रभाई त्या शेतकरी आंदोलनाच काय करायचं ? मी काय म्हणतो एकदाच मारून टाका ना त्या सर्वांना . मिलिट्री बोलून सगळ्यांना गोळ्याच घाला ना जनरल डायरप्रमाणे . भारतीय राजकीय इतिहासात पुढील कित्येक वर्षे आपण अमर होऊन जाल.

तुम्हाला मरेपर्यंत सत्ता पाहिजे ना ? तर तसा कायदा करा ना . साहेब तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सत्ताधीश रहा . आता शेवटचा श्वास कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवा . नैसर्गिकरीत्या की हिटलरच्या पद्धतीने . आणि हो तसा कायदा करताना त्यात एक उप कलम घाला . तुमच्या नंतर त्या पदावर अमितभाई शहा असतील . त्यानंतर कंगना राणावत , एन.आर .आय. अक्षयकुमार आणि तीस चाळीस किलो वजन जर कमी होणार असेल तर स्मृती इराणी बाईंना सुद्धा एखादा चान्स द्या . ही सगळी मंडळी प्रधानमंत्री पदाच्या लायकीचीच आहेत . तुमच्यानंतर हीच मंडळी त्या पदाला योग्य न्याय देऊ शकतील . जाता जाता त्या अर्णबच्या आणि त्याच्यासारख्या पत्रकारितेतील 98% पत्रकारांच्या पुढ्यात दोन तीन किलो मटण टाकून जा . पुढची काही वर्षे चघळत बसतील . म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला सुखाने राज्य करता येईल . असो .

नरेंद्रभाई थोडीफार मस्करी केली हो तुमची . तुम्ही सध्या प्रधानमंत्री कमी आणि विनोदी जास्त वाटता. काय ती लांब दाढी आणि काय तो गेटअप ? एवढी पांढरी दाढी कशी झाली हो तुमची ? मस्त चमकत असते ती .. पांढरी शुभ्र दाढी . फॉरेनवरून क्रीम वगैरे मागविलीत की काय ? कारण बलात्कारी आसारामबापू सध्या तुरुंगात असल्याने तो काय उपलब्ध करून देऊ शकत नाही .

नरेंद्रभाई , त्या चीनचे काय झाले हो ? अरुणाचलप्रदेश या भारताच्या भूभागात त्यांनी छानसे गाव सुद्धा बसवले आहे . तुम्हाला काय माहिती मिळाली की नाही ? साहेब , तुम्ही तिथे जाऊन दाखवा की , तुमची ती मर्दुमकी की काय ? या गरीब शेतकऱ्यांवर काय दादागिरी करताय ?

तुम्ही दिल्लीच्या रस्त्यावर खंदक खोदून ठेवला आहे . पहिल्यांदा खिळे लावले नंतर काढले . तुमच्यात थोडा जरी दम असेल ना तर त्या चीनशी टक्कर घेऊन बघा ना साहेब . मी जिवंत असेपर्यंत तुमचा गुलाम होऊन राहील साहेब . तुमच्या विरोधात एकही शब्द लिहिणार नाही . चीनच्या विरोधात तुमची हातभर फाटते आणि इथे आमच्याच देशप्रेमी , देशभक्त , गरीब शेतकऱ्यांसमोर तुम्ही भाईगिरी करता ? तुमचा तो तडीपार मित्र असल्याने तुम्ही काहीही कराल काय असे वाटते का तुम्हाला ? तुम्हा दोघा गुजराती व्यापाऱ्यांनी सगळ्या देशाचा सत्यानाश करून ठेवला आहे असं नाही का वाटत तुम्हाला साहेब ?

सगळ्या संविधानिक संस्थांना गुलाम करून त्यांना आपल्यासमोर शेपटी हलवत ठेवायचे हेच का तुमचे राजकारण ? अदानी अंबानी सारखी उच्च दर्जाची श्वापदं पाळल्यावर आणि त्यांच्याच मालकीची मीडिया हाऊस तुमच्या दिमतीला असल्यावर तुम्हाला लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही राबविण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटणे स्वाभाविक जरी असले तरी इतिहासात त्याची नोंद वेगळीच होणार आहे . याचा कधीतरी शांत बसून विचार करा की महोदय .

इतिहास तुम्हा दोघांना आणि 98% भाडखाउ पत्रकारांना कधीही माफ करणार नाहीत हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा . तुम्हा सर्वांचा इतिहास देशद्रोही असा लिहिला जावा असे वाटते का साहेब तुम्हाला ?

नरेंद्रभाई तुम्ही कोणत्या गुर्मीत आहात हो ? अहो त्या दुसऱ्या महायुद्धाचा जनक ॲडॉल्फ हिटलर ने स्वतःला गोळी घालून घेतली आपण किस खेती मुली ?

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे . तुमचा तथाकथित भारतरत्न सचिनभाई तेंडुलकर ( गुजरातचा जावई ) ह्याला लगेच खवखव करायला लागले . तो अधिकृत गे करण जोहर , सरकारी अनुदानावर सरकारी जाहिराती टाईप चित्रपट बनविणारा एन . आर .आय . अक्षयकुमार यांच्या खालच्या बुडाला लगेच आग लागली . ही नकली देशभक्त मंडळी खऱ्या देशभक्त शेतकऱ्यांना देशभक्ती शिकवायला लागली. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनात साठ पेक्षाही अधिक शेतकरी शहीद झालेत . त्यावेळी भारतातील तमाम सेलिब्रिटी तोंडाचा कॅन्सर झाल्यासारखे गप्प बसले होते.

अमेरिकेतील प्रख्यात गायिका रॉबिन रियाना फेंटो उर्फ रियाना हिने या शेतकऱ्यांना सपोर्ट केला म्हणून काय तो आकांडतांडव केला या चिंनपाट सेलिब्रिटींनी ?

साहेब , काय चूक आहे हो त्या "परदेशी " रियानाची ? तुम्ही नाही का अमेरिकेत जाऊन त्या ट्रम्प तात्यांची प्रचाराची सभा घेतलीत ? तेव्हा अमेरिकेतल्या लोकांनी तुमचा विरोध केल्याचे काही ऐकिवात नाही . ट्रम्प तात्या पडला बरं का साहेब . लय माजला होता . तुम्ही त्याची चांगलीच जिरवली साहेब . परत तो तुमच्या " नादीच " लागणार नाही .

शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्ही केलेली तयारी पाहून चीनच्या मॅनमार चौकातील आठवण येते .तेथील सरकारने विद्यार्थ्यांवर रणगाडे चढवले होते साहेब .चीनचे सरकार कम्युनिस्ट सरकार म्हणून तुम्ही त्यांना हिनवणार . मग साहेब तुमच्या सरकारला कोणते नाव द्यायचे ? नाझी सरकार की मुसोलिनी सरकार ?

आमच्या तथाकथित गाण कोकिळा ( कोकिळा पक्षी मधुर गाते हे कोणत्या बहिऱ्याने लिहून ठेवले कोणास माहीत ) लताबाई मंगेशकर यांनी त्यांच्या लहानपणी बरेच कष्ट की काय घेतलेत म्हणे ? म्हणजे लोकलने प्रवास करणे वगैरे वगैरे . त्यासुद्धा नंतर बऱ्याच पैसेवाल्या झाल्या . मुंबईत , देशात ,परदेशात बरीच प्रॉपर्टी आहे म्हणतात बुआ. कोणत्या दलित , वंचित व्यक्तीला मदत करायचं तर सोडूनच द्या , ह्या समूहाबद्दल त्यांच्या गळ्यातून काही चांगले बोलणे सुद्धा बाहेर पडत नाही हो . तुमच्या आर.एस. एस. विचारसरणीच्या बाई आहेत त्या बरं का ? भारतरत्न पुरस्कार , खासदारकी काँग्रेस कडून घेणार , गाणं मात्र भाजपा चे गाणार . डबल ढोलकी बाकी काय ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनभाई भागवत ( हे सर्वजण भाईच बरं का ) यांचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल काय म्हणणे आहे हे अजून काही समजले नाही . तथाकथित राष्ट्रीयत्व , हिंदुत्व या विषयावर पोपटपंची करणारे मोहनभाई शेतकऱ्यांच्या विषयावर गप्प का ? कुठे गेली त्याची लाठी ? शेतकरी भारतीय नाहीत का ? शेतकरी हिंदू नाहीत का ?

साहेब , आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना आम्ही नम्र विनंती करणार आहोत की , त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचा संपूर्ण ' महाराष्ट्र बंद ' ठेऊन शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा . संपूर्ण महाराष्ट्र ( ३०-४० मराठी भैये सोडले तर ) शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश हा देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल .

परदेशी सेलिब्रिटींनी आपल्या इथल्या शेतकऱ्यांची बाजू घेतली तर आपल्या इथल्या थर्ड क्लास सेलिब्रिटींना त्याचा राग का यावा हो साहेब ? तुम्हाला म्हणून सांगतो साहेब , तुम्ही कोणाला सांगू नका . अंबानी कुटुंबाच्या लग्नात अमिताभभाई ( भैय्या नव्हे ) पासून सचिनभाई पर्यंत सगळेच वाढप्याचे काम करतात बरं का . तिथे त्यांची अवस्था अक्षरशः भिकाऱ्या सारखी असते हो साहेब .

तसेही मोदी साहेब तुम्ही करोनाच्या कार्यकाळात अपयशी ठरलात .लॉक डाऊनच्या काळात मयत झालेल्या लोकांनाच्या बाबतीत आपण जबाबदार आहात .संपूर्ण अर्थव्यवस्थेचा झालेला सत्यानाश याला सुद्धा आपणच जबाबदार आहात . पी एम फंडाचा सर्वात भ्रष्ट स्कॅम आपल्या सरकारचा आहे . थाळ्या, घंट्या , दिवे लावून करोना घालवणारे आपण जागतीक दर्जाचे नेते म्हणून सिद्ध झालात अजून काय हवंय साहेब ?

जाऊ द्या . सोडून द्या . " हम दो हमारे दो ." चलता है . घ्या काळजी स्वतःची . बाकी ती दाढी कधी काढणार आहात साहेब तेवढं जरा कळवा . पण काही म्हणा हा साहेब दाढी मात्र फूल पांढरी शुभ्र आहे ." मै भी आण्णा तू भी आण्णा " ह्या धर्तीवर " मेरी भी दाढी तेरी भी दाढी " असे काही होऊ नये म्हणजे झालं .

एक शेतकरी समर्थक,

- ऍड . विश्वास काश्यप,

माजी पोलीस अधिकारी, मुंबई

Updated : 2021-02-20T14:17:26+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top