Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोनाच्या संकटात खेडे भकास

कोरोनाच्या संकटात खेडे भकास

कोरोनाच्या संकटात खेडे भकास
X

ग्रामीण संस्कृति मध्ये सभ्यता असूनही स्वतंत्र भारतातील खेड्यांची स्थिति फार गंभीर असून खेड्यांची चिंता केवळ निवडणुकीच्या काळात राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांना येतो कोरोना काळातही या परिस्थितीची प्रचिती येत आहे. प्रत्येकजण म्हणत होता की कोरोनाचा खरा प्रादुर्भाव शहरांनंतर खेड्यात दिसून येईल. जेथे आरोग्याची पायाभूत सुविधा अजूनही अत्यंत कमकुवत असून काहीच उपलब्ध नाही . जेथे आता भुरटे डॉक्टर, स्थानिक कंपाऊंडर प्रकारचे लोक आणि औषध विक्रेत्यांवर अवलंबून आहेत.

गांधीजींच्या विचारसरणीनुसार गाव हे शाश्वत विकासाचे केन्द्र व्हावे या साठी त्यांनी 1909 मध्ये गांधीजींनी लिहिलेल्या हिंद स्वराज या पुस्तिकामध्ये भावी। हिंद स्वराज मध्ये गावाचे स्वःताचे एक शास्त्र असावे याचा उहापोह त्यांनी केला असून स्वराज्यासंदर्भात ब्लू प्रिंट आहे. गांधीजी हिंद स्वराज्यातील सभ्यतेनुसार खेड्यांना मूलभूत आणि स्वावलंबी बनविण्याच्या बाजूने होते.

मोहनदास, राजमोहन गांधी यांनी लिहिलेल्या गांधींचे चरित्र मध्ये केला आहे. गावांना प्राधान्य न देण्याचा परिणाम हा होता की भारताची संपूर्ण धोरणनिर्मिती शहरकेंद्रित झाली. त्याचा प्रभाव माध्यमांवरही पडला. त्यांनीही निवडणुका सोडून खेड्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे टाळले. ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच घेतलेल्या सुनावणीमध्ये खेड्यांची प्रचंड लोकसंख्या आणि त्यांची चिंता कुठेही दिसत नाही या बाबत सरकारला फटकारले . दुर्दैवाची बाब म्हणजे ती देशाची अंतर्गत सुरक्षा असो की बाह्य शत्रूंकडून झालेले आक्रमण असो ही भूमिका या खेड्यातून आलेल्या सैनिकांनीच देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 67 टक्के लोक अजूनही खेड्यांमध्ये राहत आहेत. कोरोना कालावधीत असंघटित श्रमिक आणि अल्प दैनंदिन वेतन मिळवणार्‍यांची मोठी लोकसंख्या खेड्यात परतली आहे. हे आजकाल देशातील जवळपास 70 टक्के लोक खेड्यांमध्ये राहत आहेत असे सर्रासपणे म्हणता येईल. परंतु कोरोना काळात इतक्या मोठ्या लोकसंख्येची चिंता कोठेही दिसत नाही. पंतप्रधानांनी 15 मे रोजी देशातील जिल्हाधीकाऱ्या सोबत झालेल्या बैठकीत गावांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची व कोविड रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यानंतर काही हालचाली झाल्या आहेत पण परीस्थिती मध्ये काही बदल झाला का हा प्रश्न आहे?

आजकाल भारतात जर आपण सहा महानगर आणि मोठी राज्य असलेल्या राज्याच्या राजधानी आणि आणखी काही मोठी शहरे यांची लोकसंख्या समाविष्ट केली तर ती अंदाजे पस्तीस कोटीं पर्यंत जाईल या मध्ये आपण जर असंघटित कामगार जोडले तर जे या शहरात दररोज छोट्या छोट्या नोकर्या करण्यासाठी येतात त्यांना गृहीत धरले तर ही लोकसंख्या 40 कोटी पेक्षा जास्त होत नाही मग पुरेशा सोयी सुविधा या शहरी समुदायासाठी का?

कोरोना या काळात व्यापक विचारांच्या कमतरतेचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश ,महाराष्ट्र, असो वा बिहार, झारखंड किंवा बंगाल, उत्तराखंड किंवा राजस्थान, छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश, कोरोनाचा संसर्ग खेड्यात राहणार्‍या लोकांमध्ये झपाट्याने पसरत आहे आणि शाशन प्रणाली, माध्यम आणि न्यायव्यवस्थेमध्ये कोठेही त्यांच्याबद्दल गंभीर चिंता नाही. शहरांमध्ये वीज गेली तर पाणीपुरवठा खंडित झाला, रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेले, न्यायपालिका याची दखल घेतो, यंत्रणा हादरायला लागते आणि मीडिया भूकंपांच्या रूपाने ते सादर करते. परंतु गैरसोयीच्या डोंगरावर राहणार्‍या ग्रामस्थांना दररोजच्या जीवनात अनेक संकटे , भूकंपांचा सामना करावा लागतो, परंतु शहरी समस्येच्या पद्धतीने याची काळजी घेतली जात नाही.कोरोनामधील प्रथम प्राधान्य म्हणजे आता गावे वाचवणे हे असायला हवे . उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा येथे मृतदेह बुडवल्याच्या बातम्यांमुळे गावोगावी दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. केन्द्र आणि राज्ये सरकारे प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरली आहेत .

आम्ही कोरोनाकडून दररोज धडे घेत आहोत. त्यातील एक धडा म्हणजे आता आपणही धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी असलेली गावे आणली पाहिजे. नोकरशाहीच्या विचारसरणीतही बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या प्रशिक्षणातच याचा गांभीर्याने समावेश केला पाहिजे. न्यायपालिकेलाही खेड्यांकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला पाहिजे तर खेड्याची परीस्थिती सुधारेल.

Updated : 11 Jun 2021 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top