Home > Top News > पोस्टमार्टम: थेट कोव्हिड वॉर्डातून...

पोस्टमार्टम: थेट कोव्हिड वॉर्डातून...

पोस्टमार्टम: थेट कोव्हिड वॉर्डातून...
X

कोरोना सुरवातीला सौम्य स्वरूपात आला तरी सुद्धा प्रचंड भीती प्रत्येकाच्या मनात घर करून होती. लॉकडाऊन मध्ये प्रत्येक जण या भीतीच्या सावटाखाली जगत होता. बघता बघता 6 महिने झाले. लॉकडाऊन गेला. मात्र, पुन्हा कोरोना सौम्य झाला असेल असं मला वाटलं. पण असं काही नाही. आज 6 महिन्यानंतर सुद्धा कोरोना ची नवनवीन लक्षण समोर येत आहेत. खूप जास्त आक्रमकता असलेला उग्र स्वरूपाचा हा ड्रॅगन अक्राळविक्राळ स्वरूपात झपाट्याने जीव घेतोय. गुदमरत गुदमरत जगायला भाग पाडतोय. मी हा अनुभव स्वतः घेतोय आणि उघड्या डोळ्यांनी बघतोय सुद्धा!

रुग्णाची संख्या वाढतेय आणि ऑक्सिजन पुरवठा कमी...

लक्षात घ्या बऱ्याच लोकांना कोरोना झाला. त्यांना काहीच लक्षण नसतांना देखील कोरोना होणे. हे सुद्धा आश्चर्यकारक आहे. मात्र, आता जास्तीत जास्त रुग्ण हे गंभीर त्रस्त असल्याचं दिसून येत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आताच्या येणाऱ्या सर्व रुग्णांना ताप खोकला सोबत जास्तीत जास्त दम लागणे, आणि ऑक्सिजनचे प्रमाण फारच कमी असणे, त्यात ऑक्सिजनचा पुरवठा देखील एकीकडे कमी असतांना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्ण वाढी सोबत ऑक्सिजन पुरवठा देखील वाढायला हवा. फक्त बोलून काही होणार नाही. तर यांसाठी पुढाकार सुद्धा घ्यावा लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा, यांनी सोबतीला प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, समाजसेवक यांना सोबत घेऊन आप आपल्या पातळीवर नियोजनबद्ध काम करता येईल का? हे तपासने सुद्धा गरजेचे आहे. कोरोना ही लढाई आता तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

ऑक्सिजन सेंटरसाठी पुढं येणे गरजेचे आहे.

मित्रांनो ही लढाई खूप वेगळी आहे असं मी समाजतोय. मी ज्या रुग्णालयात ऍडमिट आहे. तिथं ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित आहे. कदाचित येणाऱ्या काळात रुग्ण वाढल्यास हा पुरवठा कमी सुद्धा पडेल. हीच परिस्तिथी राज्यातील इतर भागात सुद्धा आहे. तेव्हा अगोदरच ऑक्सिजन बाबत सर्वानी एकत्र येऊन जर पुढाकार घेतला तर शासकीय रुग्णालयात हा ऑक्सिजन प्लांट उभा करता येईल.

याबाबत डॉ निलेश टापरे यांनी प्रस्ताव तयार केलाय. मात्र, शहरातील आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकांनी जर यात सहभाग होऊन यंत्रणेला मदत केली तर आपण लवकरात लवकर हा ऑक्सिजन प्लांट दवाखान्यात उभारू शकतो. कारण अजूनही बरेच दिवस हे युद्ध सुरू राहील. लोकांना ऑक्सिजन न मिळाल्यास लोक तडफडून मरतील. ही वेळ आपल्या कुटुंबावर सुद्धा येऊ शकेल. त्यामुळे आता आपण सर्वांनी चर्चा न करता action plan तयार केला पाहिजे.

हे काम फक्त शासकीय यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, किंवा लोकप्रतिनिधी यांची आहे. असे समजून जर आपण जबाबदारी झटकणार असाल, तर मग येणाऱ्या काळात मृत्यू तांडवांच्या या वादळात उद्ध्वस्त होण्यासाठी सर्वजण सज्ज राहा.

रुग्ण तडफडतायत दुर्लक्षित पणामुळे

मी उपचार घेत असलेल्या दवाखान्यात बघतोय बरीच रुग्ण ताप, खोकला, सर्दी किंवा इतर लक्षणं दिसून आल्यावर सुद्धा हा त्रास सहन करून अंगावर काढतात. कुणाला कळायला नको म्हणुन घरीच काही तरी अघोरी उपचार करत बसतात. जेव्हा मग त्यांना कळून चुकतं की घरात आपण ठीक होऊ शकत नाही, तेव्हा मग तडफडत तडफडत शेवटच्या क्षणाला टेस्ट करायला येतात. तो पर्यंत वेळ पार निघून गेलेली असते.

तुमच्या फुफ्फुसांमध्ये जर इन्फेक्शन खूप जास्त गेलेले असेल तर काही फायदा होत नाही. तुमची #श्वसनक्रिया ब्लॉक होते. श्वास घ्यायला त्रास होतो. अशावेळी लास्ट स्टेपला मात्र, वैद्यकीय यंत्रणा सुद्धा हतबल होऊन हात टेकते आणि अखेर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागतो. याला जबाबदार वैद्यकीय यंत्रणा, राज्यसरकार नाही तर आपला स्वतःचा #दुर्लक्षितपणा असतो. स्वयंसेवी म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे. मी स्वतः स्वयंसेवी म्हणून काम करणार.

समाजात बरेच लोक असताना ज्यांना काही तरी सामाजिक योगदान करायची इच्छा असते. अशा स्वइच्छेने पुढं येणाऱ्या लोकांना जर कोविड वार्डात काम करण्याची इच्छा असेल, तर तात्काळ अशांना भरती करून # नॉर्मल ट्रेंनिग देऊन असे स्वयंसेवी स्थानिक पातळीवर तयार करता येतील. आणि आरोग्य यंत्रणेस मदत होईल.

शासकीय यंत्रणेवर खूप मोठा भार आहे. कमी मनुष्यबळ असतांना देखील तारेवरची कसरत करून रुग्णालयात कर्मचारी धावपळ करतांना दिसतात. मी स्वत: विनंती केली आहे की, मी पूर्ण बरा झाल्यावर मला कोविड 19 वार्डात स्वइच्छेने काम करून रुग्णांना सेवा देण्याची संधी द्यावी. प्रत्त्येक व्यक्तीने पुढं येऊन या कामात सहभाग नोंदवला तरचं आपल्याला कोरोनाच्या चक्रव्यूहात उतरून अभिमन्यू प्रमाणे लढता येईल. अभिमन्यू म्हणून लढायला पुढं येणार असाल तरचं खऱ्या अर्थाने हे चक्रव्यूह आपल्याला उद्ध्वस्त करता येईल.

Updated : 19 Sep 2020 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top