Home > मॅक्स ब्लॉग्ज > फ्रेंड्स विथ बेनेफीट

फ्रेंड्स विथ बेनेफीट

सोशल मीडियावरील स्त्री पुरुषांचे तकलादू संबंध बघून एक मानसशास्त्रीय संज्ञा आठवली. त्यात multiple पार्टनर्स वर थोडं भाष्य केलं आहे. फ्रेंड्स विथ बेनेफीट म्हणजे एक स्त्री व पुरुष मित्र असताना संमतीने झालेले शरीरसंबंध यासंदर्भात लेखिका गौरी साळवेकर यांचा लेख

फ्रेंड्स विथ बेनेफीट
X

ब्रेडक्रमिंग हा अनुभव साधारणपणे आकर्षण किंवा प्रेम यांमध्ये असणाऱ्या 30-40% लोकांना कोणत्याही वयात येतो. यामध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला असे clues पाठवते, तुमच्याशी असं फ्लर्ट करते ज्यामुळे तुम्हाला वाटेल ही व्यक्ती आपल्यात गुंतली आहे. पण त्या व्यक्तीचा तुमच्यात खरोखरच गुंतण्याचा दुरुनदुरुन हेतू नसतो. फक्त असं दाखवून 'फ्रेंड्स विथ बेनेफिट' होता येतंय का? याची चाचपणी समोरची व्यक्ती करत असते.फ्रेंड्स विथ बेनेफीट म्हणजे एक स्त्री व पुरुष मित्र असताना संमतीने झालेले शरीरसंबंध. इथे आधी चांगली मैत्री असू शकते (निदान तसं दाखवलं जातं) किंवा थोड्याफार ओळखीवर देखील असे सिग्नल्स पाठवायला सुरुवात केली जाते,अर्थात समोरच्या व्यक्तीचा कल बघून! मग पुढे गेल्यावर शारीरिक संबंध सोपे होतात. याची शब्दशः व्याख्या अशी की

Dropping small morsels of interest when they sense you are ready to throw in the towel, they peruse you little more attentively ! थोडक्यात समोरचा आपल्याला हवं ते देईल यासाठीची ही एक सुनियोजित योजना असते,सहजसुंदर संबंध नव्हे.





यात कुणी कुणावर दोषारोप करण्याचा प्रश्न किंवा संबंधांनंतर आलेला गिल्ट देखील नसतं कारण सगळंच concensual असतं.

खरी गंमत होते इथेच. गुंतायचं नसतं मग ती व्यक्ती पुढे जायला का बघते? याचं एक कारण हे की आपण या व्यक्तीला आवडतोय याचे काही व्हाईब्ज त्याला मिळू शकतात. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीला कोणतेही डीप कनेक्शन्स नकोच असतात कारण मग answerable राहावं लागतं.समोरची व्यक्ती आपल्यात शरीरसंबंधांनंतर गुंतणार आहे हे माहिती असतं (culprit : oxytocin) म्हणून मग दुसरीकडे जाता येत नाही किंवा त्या व्यक्तीची आपल्याला अडचण होऊ नये म्हणून पटकन संबंध संपवले जातात. त्यासाठी कोणतंही फुटकळ कारण पुरतं. मग 'आपण असेच आहोत,असेच डिझाईन झालोत 'म्हणून आभाळ हाणता येतं, आणि एकाच वेळी कितीही लोकांसोबत हे ब्रेडक्रमिंग करता येतं.कोणत्याही नात्यात इतकी inconsistancy असेल तर ती व्यक्ती मानसिकदृष्टीने कायमच अस्थिर असते ,फक्त दाखवत नसते इतकंच.

डीप कनेक्शन्सचा अर्थ 'मै दुनियासे नही डरता' टाइप हिरोगीरी करणं नव्हे;तर त्या व्यक्तीपाशी आपला सुखाचा शोध थांबलाय हे मान्य करून तिच्याशी कमिटेड राहणं आणि नवे पार्टनर्स न शोधणं. त्या व्यक्तीच्या सुखदुःखाशी, त्या नात्याशी आणि मुख्य म्हणजे आपण त्या व्यक्तीची निवड केली आहे आणि का केली आहे, या विचाराशी बांधील राहणं.

सोशल मीडियावर असलेल्या विशेषतः 35-55 मधल्या लोकांनी हा एक घोळ इथे घालून ठेवलाय. मग त्यातून कृष्णसखा, राधासखी, सोलमेट इत्यादी आयटम निपजलेत.भर घालायला सिनेमे आहेतच.

Soulmate is a pure myth.हॉस्पिटलमध्ये तुमच्या उशाशी बसून जो पैशाची जुळवाजुळव करतो, निव्वळ चहावर दिवस काढत डॉक्टरांकडे आशाळभूत नजरेने बघत थांबतो किंवा थांबते तो माणूस आपला आहे याचा विसर इथे बहुतेक अशा लोकांना पडलेला असतो.

पूर्वी हे नव्हतं का? तर होतं. पण माणसांच्या हातातील या साधनांमुळे आलेली accessibility तेव्हा इतकी नव्हती. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीसोबत स्थिरावणे हेही एकवेळ समजून घेता येईल पण हे ब्रेडक्रमिंग म्हणजे आपली बुद्धी आणि integrity यांचा नावाप्रमाणेच झालेला भुगा आहे!

Integrity फक्त शरीराची असते का? अजिबात नाही. ज्या क्षणी मनात 'हा' हवा किंवा 'ही' हवी हा विचार शिरतो त्याक्षणी integrity संपलेलीच असते.त्यादृष्टीने आपण सगळेच कसे आहोत ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे.पण कुठे थांबायला हवं हे ज्याला समजतं त्याला ब्रेडक्रमिंग का करू नये हेही समजतं.





पुन्हा सांगते की Soulmate is a pure myth!

ज्यांना या ब्रेडक्रमिंगचा अनुभव आला असेल त्यांना फार हेल्पलेस आणि cheated वाटतं हे उघड आहे. पुन्हा सगळंच concensual असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार. त्यामुळे जर आपण अशा कोणत्याही नात्यात असू जिथे समोरच्या व्यक्तीला कोणतेही डीप कनेक्शन्स नको आहेत आणि हेतू फक्त फ्रेंडझ विथ बेनेफिट आहे तिथे प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा किंवा त्या बेगडी नात्याची किंमत मोजावी.

अशा व्यक्तींमध्ये विवाहसंस्था नाकारण्याची किंवा अशी नाती निभावण्याची देखील उघड हिम्मत नसते. त्यामुळे यांना ब्रेडक्रमिंग हा पर्याय सुरक्षित वाटतो.हे एक प्रकारचं इमोशनल अब्युजच असतं पण समोरच्याच्या संमतीने घडलेलं! कारण आधी 'शारीरिक संबंधापुरतेच हे नाते असेल आणि त्यानंतर संपेल ' याबद्दल कल्पना बहुधा दिलेली नसते किंवा ती इतकी संदिग्ध असते की त्यातील बिटविन द लाईन्स मेसेज समोरच्याला वाचता येत नाही.

इथे मी कोणत्याही मूल्यव्यवस्था इत्यादींवर बोलत नाहीये ,मी फक्त अशा नात्यातून येणारं मानसिक नैराश्य आणि जी व्यक्ती हे ब्रेडक्रमिंग खरं मानून चाललीय तिचं नुकसान याबद्दल बोलतेय. या ब्रेडच्या चुऱ्यात स्वतःला घोळवून घ्यायचं का हे आपापलं ठरवा.

ब्रेड इथे एक संकल्पना म्हणून वापरला आहे. ब्रेडची एकूण किंमत आणि त्याची उपयुक्तता (पोट व्यवस्थित भरणे) ,करायला लागणारे कष्ट, वेळ आणि संयम यांच्या तुलनेत ब्रेडच्या चुऱ्याचं मूल्य आणि उपयोग ते काय? असा विचार या शब्दमागे असावा ,असं वाटतं.

-गौरी

Updated : 26 Sep 2023 3:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top