Home > मॅक्स ब्लॉग्ज > Congress in Municipal Election2026 : काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार!

Congress in Municipal Election2026 : काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार!

कठीण काळातही विचारांशी ठाम राहणारा पक्षच उद्याचा विश्वासार्ह पर्याय ठरतो. काँग्रेस पक्षाने हा कस अनेकदा लावून पाहिला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर, विचारांच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर लढणार वाचा लेखक धनंजय शिंदे यांचा लेख

Congress in Municipal Election2026 : काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार!
X

Politics राजकारण हे केवळ सत्तेचे गणित नसते, तर ते समाजाच्या दिशेचे द्योतक असते. सत्ता बदलत राहते, समीकरणे बदलतात; पण विचार टिकून राहतात तेव्हाच एखादा Political Party राजकीय पक्ष इतिहास घडवतो. आज देश आणि Maharashtra महाराष्ट्र ज्या अस्वस्थ राजकीय काळातून जात आहेत, त्या काळात Congress काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, तो विचारांशी तडजोड न करणारा आणि जनतेच्या प्रश्नांशी निष्ठावान राहणारा पक्ष आहे.

गेल्या काही वर्षांत राजकारणाचा केंद्रबिंदू जनतेच्या प्रश्नांवरून हटवून द्वेष, ध्रुवीकरण, भिती आणि प्रचारयंत्रणेकडे वळवण्यात आला आहे. लोकशाही संस्था, माध्यमे, तपास यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्तेचा दबाव वाढताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाची भूमिका ही केवळ सत्ताधाऱ्यांवर टीका करणारी नसून, लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारी असावी लागते. काँग्रेस पक्ष ही भूमिका सातत्याने निभावत आहे.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी संकट, महिलांची असुरक्षा, आरोग्य व शिक्षणाचा वाढता खर्च, शहरी भागातील पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, घरांचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे सगळे प्रश्न आज सामान्य नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेले आहेत. दुर्दैवाने, सत्ताधारी पक्षांकडून या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून निवडणुका केवळ घोषणांच्या, पैशांच्या आणि प्रचाराच्या जोरावर लढवल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून संघर्ष सुरू ठेवला आहे. अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने प्रतिकूल परिस्थितीतही उल्लेखनीय यश संपादन केले. राज्यभरात ४१ नगराध्यक्ष आणि १००६ नगरसेवक निवडून येणे हे केवळ आकड्यांचे यश नसून, काँग्रेसच्या विचारांवर जनतेचा अजूनही असलेला विश्वास दर्शवणारे आहे. सत्ताधारी पक्षांकडून प्रचंड आर्थिक बळ, प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर, कार्यकर्त्यांवर दबाव आणि धमकावण्याचे प्रकार होत असतानाही काँग्रेसचा कार्यकर्ता विचारांशी निष्ठावान राहून लढला आणि जिंकला.

हे यश मा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने उभारलेल्या वैचारिक संघर्षाचे फलित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवताना सत्ता नव्हे तर मूल्ये केंद्रस्थानी ठेवली आहेत. संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, समता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांसाठी काँग्रेसने आपला संघर्ष अधिक तीव्र केला आहे.

आता राज्यातील २९ महानगरपालिका, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेसाठी नसून, महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहेत. काँग्रेस पक्ष या निवडणुकांकडे केवळ सत्ता मिळवण्याची संधी म्हणून पाहत नाही, तर जनतेशी थेट संवाद साधण्याचे आणि शहरी-ग्रामीण प्रश्नांना न्याय देण्याचे माध्यम म्हणून पाहतो.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष शहरी मध्यमवर्ग, कामगार, महिला, युवक, झोपडपट्टीवासीय, छोटे व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडणार आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली केवळ कंत्राटदारांचे हित साधणाऱ्या योजनांऐवजी, सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांवर आधारित शहरी विकासाचा आराखडा काँग्रेस सादर करणार आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा, दर्जेदार सरकारी शिक्षण, स्वच्छ पाणी, स्वस्त घरकुल, सक्षम सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरण संरक्षण हे काँग्रेसच्या शहरी धोरणाचे केंद्रबिंदू असतील.

काँग्रेस पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा कणा आहेत. महापालिकांचे अधिकार कमी करून त्यांना केवळ राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करणारी यंत्रणा बनवण्याचा प्रयत्न काँग्रेस कधीही स्वीकारणार नाही. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना निर्णयस्वातंत्र्य, पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या सहभागातून विकास ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. आज देशात जी राजकीय संस्कृती रुजवली जात आहे, ती समाजात फूट पाडणारी आणि लोकशाही कमकुवत करणारी आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेसचा लढा हा समावेशकता, संवाद आणि संविधानिक मूल्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करेल, याबाबत शंका नाही.

कठीण काळातही विचारांशी ठाम राहणारा पक्षच उद्याचा विश्वासार्ह पर्याय ठरतो. काँग्रेस पक्षाने हा कस अनेकदा लावून पाहिला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर, विचारांच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर लढणार आहे.

राज्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात एकच विचार आहे….

“आम्ही लढणार, महाराष्ट्र जिंकणार!”

Updated : 27 Dec 2025 7:11 AM IST
Next Story
Share it
Top