Home > मॅक्स ब्लॉग्ज > कंडोम तयार करणारी कंपनी मोदी सरकारने काढली विक्रीला

कंडोम तयार करणारी कंपनी मोदी सरकारने काढली विक्रीला

कंडोम तयार करणारी नफ्यात असणारी सरकारी कंपनी मोदी सरकारने विक्रीला का काढली? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण

कंडोम तयार करणारी कंपनी मोदी सरकारने काढली विक्रीला
X

हिंदुस्थान लॅटेक्सचे नाव ऐकले असेल, तीच ती सुंदर कंडोम बनवणारी केंद्र सरकारच्या मालकीची, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी; १९६६ सालापासून कार्यरत आहे. तिचे नाव नंतर बदलून HLL LifeSciences असे करण्यात आले होते; वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी आहे. केरळ मध्ये थिरुअनंतपूरम स्थित ही कंपनी केंद्र सरकारने विकायला काढली आहे; १०० % मालकी हस्तांतरित होणार आहे.

केरळ सरकारने केंद्र सरकारला कॉउंटर ऑफर दिली आहे; तुम्हाला जी किंमत अपेक्षित आहे ती द्यायला आम्ही तयार आहोत; ती केरळ सरकारला विकत द्या. केरळ सरकारने त्या काळात १९ एकर जमीन या कंपनीला दिली आहे. केंद्र सरकारने औपचारिक रित्या केरळ सरकार बोली मध्ये सहभागी होऊ शकणार नाही असे कळवले आहे; कारणे माहित नाहीत. तोट्यातील सार्वजनिक उद्योग विकणार कारण किती दिवस तोटा सरकार भरून देणार असे मुद्दे मांडले जात असतात; ही तर नफ्यात असणारी कंपनी आहे.

केंद्र सरकारला येणारी अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार सार्वजनिक उद्योग विकते म्हणतात; इथे तर केरळ सरकार केंद्र सरकारला अपेक्षित किंमत देऊ इच्छिते ; तरी देखील नाही म्हणते केंद्र सरकार.

काय चालले आहे त्याची माहिती घ्या ; समजून घ्या ; विचार करा ; पोलिटिकल इकॉनॉमी समजून घ्या ; फेस व्हॅल्यू वर काहीच स्वीकारू नका.

संजीव चांदोरकर

Updated : 16 March 2022 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top