Home > Top News > श्रुती मोदी माफीची साक्षीदार

श्रुती मोदी माफीची साक्षीदार

श्रुती मोदी माफीची साक्षीदार
X

सुशांत सिंह राजपूतच्या अनैसर्गिक मृत्यूचा तपास अनेक केंद्रीय यंत्रणा करत आहेत. बिहार सरकारने याप्रकरणी CBI तपासाची विनंती केली होती. CBI, ED आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) तपासात आघाडी घेतलीये. पण प्रसारमाध्यमांमधील बातम्यांवरुन EDच्या हातात याप्रकरणी खूप काही लागलेले दिसत नाहीये. सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा वळता केला गेला का, याबाबत धागेदोरे मिळत नसल्याचे या बातम्यांवरुन दिसते. पण सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर श्रुती मोदी हिच्याकडू EDला महत्त्वाची माहिती मिळाल्याचे समजते आहे.

या प्रकरणात सुमारे दीड महिन्यापूर्वी श्रुती मोदी ही माफीची साक्षीदार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे याप्रकरणात जो गुन्हेगारी स्वरुपाचा कट पुढे येतोय त्यामध्ये आरोपी म्हणून श्रुती मोदीचे नाव येणार नाही. पण त्यासाठी श्रुती मोदीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करावे लागणार मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

या प्रकरणाच्या तपासाच्या कक्षा रुंदावणार असल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने याआधीच दिले होते. त्यानुसार आता NCBने सुशांत सिंहचा जवळचा सहकारी सॅम्युएल मिरांडा आणि आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अटक केली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या रियाच्या नेटवर्कमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

गुप्तचर विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, NCBच्या छाप्यात दोन ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सुशांत सिंहच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. मारीजुआना, हशीश, MDMA, LSD, BUDS या ड्रग्जची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये हे आरोपी सहभागी होते. NCBचे ज्येष्ठ झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी य़ा प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर हे रॅकेट उघड झाले. कस्टम विभागाच्या Air Intelligence विभागाअंतर्गत वानखेडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्तव्य बजावले आहे. त्यांची NIAमध्येही नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी Directorate of Revenue Intelligence (DRI)मध्येही काम केले आहे.

पण याचा अर्थ असा नाही की सीबीआयच्या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. या तिन्ही केंद्रीय तपास यंत्रणांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तपासातील कोणतीही माहिती लिक केल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. पण तरीही या प्रकरणाशी संबंधित काही अधिकारी भपकेबाज न्यूज चॅनेल्सला निरुपयोगी किंवा चुकीची माहिती पुरवत आहेत. तपासातील माहिती लिक झाली तर वरिष्ठांची कारवाई नको आणि तपासात प्रसारमाध्यमांचा अडथळा नको म्हणून तपास यंत्रणांनी ही युक्ती केली आहे.

“NCBने 4 जणांना अटक केल्याने या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई दिसली. पण ED आणि CBIचा तपास गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात तपासातील माहिती लिक होऊ नये यासाठी या तपास यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसाठी कडक आचारहसंहिता लागू करण्यात आली आहे. तपासाच अडथळा येऊ नये आणि तपासावर कोणताही प्रभाव पडू यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती गुप्तचर विभागातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने मॅक्स महाराष्ट्रने दिली.

ED आणि CBIच्या फॉरेन्सिक टीमने पोस्ट मॉर्टेमबाबतच्या तपासातून सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूचे कारण आणि डिजिटल फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांच्या तपासात मोठी प्रगती केली आहे. “सुशांत सिंहच्या अकाली मृत्यूनंतरही त्याच्या बँक खात्यांमधून (नियमित नसणारे )आर्थिक व्यवहार झाले का, याचा तपास CBI करत आहे. यामध्ये सुशांतच्या ऑडिटरने तिमाहीसाठी भरलेल्या GST बद्दल दिलेली माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

डिलीट झालेला डाटा पुन्हा हाती

सुशांत सिंहने आणि त्याच्या जवळच्या लोकांनी वापरलेल्या विविध डिजिटल साधनांमधून डिलीट झालेला डाटा पुन्हा मिळवणे शक्य आहे. CBIच्या डिजिटल फॉरेन्सिक टीमकडे अशी हायटेक यंत्रणा असल्याने हा डाटा पुन्हा मिळवता येऊ शकतो.

“जोपर्यंत या प्रकरणातील डिजिटल साधनं आमच्या ताब्यात आहेत तोपर्यंत जाणेतपणाने किंवा अजाणतेपणाने डिलीट झालेला डाटा मिळवणे कठीण नाही. मग यामध्ये लॅपटॉप, फोन, कॉम्प्युटरचे हार्डड्राईव्ह आणि आज वापरात असलेले कोणतेही तांत्रिक साधने असले तरी त्यातून डिलीट झालेली माहिती काढता येते. मॅक नंबर, सिमकार्ड नंबर आणि International mobile equipment ID (IMEI) एवढेच नाहीतर आयफोनचा वापरला झाला असेल तरी क्लाऊड स्टोरेजमधून हरवलेला डाटा मिळवता येऊ शकतो.

या प्रकरणात सर्व डाटा पुन्हा हाती आला आहे. जर encryption 128 बाईट्सपेक्षा कमी असेल तर डिलीट केलेला डाटा पुन्हा मिळवणे खूपच सोपे आहे. पण जर encryption 256 बाईट्स किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर डाटा पुन्हा मिळवण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि आज ते सर्व शक्य आहे” अशी माहिती गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मॅक्स महाराष्ट्रला दिली आहे.

तपास यंत्रणांना सर्व डाटा सूत्रबद्ध पद्धतीने सहज मिळवता आला आहे. त्याचबरोबर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या करारांचाही फायदा या तपासात झाले आहे, उदा. भारताने गेल्यावर्षी स्वित्झर्लंडसोबत केलेल्या द्विपक्षीय करारामुळे स्वित्झर्लंडमधील खासगी बँक खात्यांमध्ये भारतातून किती पैसा वळता केला जातोय याची पूर्ण माहिती आता उपलब्ध होऊ शकते. एकूणच आता तिन्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून या प्रकरणाचा उलगडा कधी होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Updated : 8 Sep 2020 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top