Home > मॅक्स ब्लॉग्ज > चिलटे, किडा, मुंगी, डास, झुरळे, उंदीर, धुशी आणि माणसे...

चिलटे, किडा, मुंगी, डास, झुरळे, उंदीर, धुशी आणि माणसे...

देशातील आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूला शहराच्या मर्यादा पावसाने आणि त्यानंतरच्या पुराने उघड केल्या. पण केवळ बंगळुरूच नाही तर दरवर्षी पावसामुळे ठप्प होणाऱ्या मुंबईसह इतर शहरांमधील एक भयाण वास्तव मांडणारा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख...

चिलटे, किडा, मुंगी, डास, झुरळे, उंदीर, धुशी आणि माणसे...
X

देशातील आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूला शहराच्या मर्यादा पावसाने आणि त्यानंतरच्या पुराने उघड केल्या. पण केवळ बंगळुरूच नाही तर दरवर्षी पावसामुळे ठप्प होणाऱ्या मुंबईसह इतर शहरांमधील एक भयाण वास्तव मांडणारा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख...संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक पेजवरुन साभार.. बंगलोर मधील पुरात त्या शहरातील अनेक समाज / आर्थिक घटकांचे नुकसान झाले

बंगलोर आपल्या देशाचा आयटी हब आहे आणि तेथे अनेक आयटी कंपन्याची कार्यालये आहेत ; त्याच्या संघटनेने पटकन आढावा घेऊन , हिशोब करून जाहीर देखील केले कि आमचे प्रत्येक दिवशी २२५ कोटींचे नुकसान झाले / किंवा होत आहे आता सरकारी दरबारी शिष्टमंडळे जातील , विमा कंपन्या येतील , उद्योग , कॉर्पोरेट , बंगले , गाड्या सर्वांचे क्लेम जातील

सामान्य नागरिकांचे कोण वाली ? फेसबुक पंडित म्हणतील मग त्यांनी पण विमा काढावा ; बरोबर , इथे कुत्री मांजरे , बोट आणि नखांचे देखील विमे काढून मिळतात पण विमा कंपन्या काय धर्मदाय संस्था नाहीत ना ; प्रीमियम द्यावा लागतोय , आणि नुकसान झाले त्याप्रमाणात भरपाई नाही , प्रीमियम भरला असेल त्याप्रमाणात भरपाई असते इथे आरोग्य विमा काढायला जमेना ती लोक कधीकाळी पूर येईल आणि नुकसान होईल म्हणून विमा काढणार होय? आणि लाखो लोकांच्या मरण यातनांची किंमत किती ? लहान मुले , म्हातारी . आजारी माणसे , गर्भवती स्त्रिया , पिण्याच्या पाणी , घरातील किचन न चालल्यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधी

त्यांना आपल्या आयुष्याची किंमत माहित नाही; आपले जिवंत अणे हीच दुसऱ्या कोणाची कृपा असते असे संस्कार असणाऱ्या देशात कोण असा विचार करणार ? मुद्दा बंगलोरचा नाहीये शेकडो शहरे , गावे , नैसर्गिक आपत्ती , अपघात , जाळपोळ ,,.... किती तरी घटना ३६५ दिवस घडत असतात आणि लाखो नागरिकांची , त्यांच्या संसाराची राख रांगोळी करतात

चिलटे , किडा , मुंगी , डास , झुरळे , उंदीर , धुशी …. आणि माणसे

ज्या नागरिकांना स्वतःचा जीव , स्वतःच्या घामातून उभे केलेले संसार यांची किंमत माहित नाहीच , पण काढून घ्यायचे पण सुचत नाही, त्या नागरिकांना कोणीही वाली नाही हे नक्की !

संजीव चांदोरकर (८ सप्टेंबर २०२२)

Updated : 8 Sep 2022 1:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top