Home > मॅक्स ब्लॉग्ज > तुमचे बॅंकांमधील पैसे सुरक्षित आहेत का?

तुमचे बॅंकांमधील पैसे सुरक्षित आहेत का?

आयुष्यभर घाम गाळून, पोटाला चिमटा काढून पै पै साठवून ठेवलेला तुमचा बॅंकांमधील पैसा सुरक्षित आहे का? सार्वजनिक बॅंकांमधील पैसा अधिक सुरक्षित की खासगी बॅंकांमधील पैसा? वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख...

तुमचे बॅंकांमधील पैसे सुरक्षित आहेत का?
X

देशाच्या बँकिंग क्षेत्राची चिंता करायला बरीच मोठी मंडळी आहेत. त्यांच्या हा ला हा काय करताय?

तुम्ही तुमच्या ठेवींची तरी चिंता करा!

आयुष्यभर घाम गाळून, पोटाला चिमटा काढून पै पै साठवून ते पैसे सार्वजनिक बँकांमध्ये ठेवी ठेवणाऱ्या माझ्या कोट्यवधी भावा बहिणींनो, सार्वजनिक बँकांमध्ये थकीत कर्जे वाढली आहेत. म्हणून आम्ही त्या खाजगी क्षेत्राला चालवायला देत आहोत. त्यामुळे तुमच्या ठेवी सुरक्षित राहतील असे तुम्हाला सांगितले जातंय. त्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला मान काय डोलवताय ?

लक्षात ठेवा: १९६९ च्या राष्ट्रीयीकरणांनंतर एकाही सार्वजनिक बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी बुडालेल्या नाहीत.

लक्षात ठेवा: याच काळात डबघाईला आलेल्या भारतातील अनेक खाजगी क्षेत्रातील बँका एखाद्या सार्वजनिक बँकात विलीन / मर्ज केल्या गेल्या आहेत.

लक्षात ठेवा : खुद्द अमेरिकेत २००१ ते २०१९ मध्ये ५६० खाजगी क्षेत्रातील बँका नागरिकांच्या बऱ्याच ठेवी घेऊन बुडाल्या आहेत.

रघुराम राजन आणि विरल आचार्य सारखे मोठे लोक देखील सार्वजनिक बँकांबद्दल एकांगी विश्लेषण करतात. देशातील कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या ठेवींच्या सुरक्षितिता बँकांची मालकी सार्वजनिक असेल तरच टिकू शकते. हे त्यांना माहित असून देखील ही जाणकार मंडळी स्पष्ट मांडत नाहीत याचे वाईट वाटते.

तुम्ही तुमच्या घामातून आलेल्या ठेवींची चिंता करा; त्या सार्वजनिक मालकीच्या बँकांमध्ये अधिक सुरक्षित राहू शकतात. सार्वजनिक बँकांच्या खासगीकरण विरोधी मोहिमेत सामील व्हा...

-संजीव चांदोरकर (१ ऑक्टोबर २०२०)

Updated : 2 Oct 2020 4:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top