Home > मॅक्स ब्लॉग्ज > बाबा आमटे यांचा एक प्रश्न आणि आरती आमटे यांचं आयुष्यच गेलं बदलून

बाबा आमटे यांचा एक प्रश्न आणि आरती आमटे यांचं आयुष्यच गेलं बदलून

आरती आमटे यांनी आपल्या संघर्षमय आयुष्यातून आस्था संस्थेचं काम कसं उभं केलं. याविषयी सांगताना आरती आमटे यांनी बाबा आमटे यांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण मॅक्स वूमनच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सांगितली. पण काय होता तो प्रश्न? जाणून घेण्यासाठी वाचा....

बाबा आमटे यांचा एक प्रश्न आणि आरती आमटे यांचं आयुष्यच गेलं बदलून
X

आरती आमटे यांचा जन्म हेमलकसा येथेच झाला. त्यांचं बालपणही हेमलकसा येथेच गेलं. पण बालपणी आरती आमटे यांचे वडील प्रकाश आमटे आणि आई मंदाकिनी आमटे यांनी आरती आमटे आणि त्यांच्या भावंडांमध्ये कधीच भेदभाव केला नसल्याचं आरती आमटे सांगतात.

पुढे आरती आमटे म्हणाल्या, मी इयत्ता चौथीत असताना एक दिवस ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी आरती आमटे यांना प्रश्न विचारला की, तुला नेमकं काय करायचं आहे? काय शिकायचं आहे? त्यावेळी अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे आरती आमटे यांना त्यावेळी नेमकं काय करायचं ते सुचलं नाही. पण त्यानंतर बाबा आमटे म्हणाले की, आपल्याकडे पेशंट आहेत तु इतर काही करण्यापेक्षा त्यांना ड्रेसिंग करायला शिक. बाबा आमटे यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेला सल्ला अत्यंत महत्वाचा ठरला आणि त्यातूनच पुढे नर्सिंग करून आस्था प्रकल्पाची स्थापना केली, असं आरती आमटे यांनी सांगितलं.


Updated : 20 May 2023 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top