Home > Top News > राम मंदिर आलं, पण रामराज्य कुठे आहे?

राम मंदिर आलं, पण रामराज्य कुठे आहे?

राम मंदिर आलं, पण रामराज्य कुठे आहे?
X

आज एक भव्य दिव्य सोहळा आपण साऱ्या लोकांनी याची डोळा याची देही अनुभवला. महामारीच्या या काळात हजारो प्रश्न उभे असतांना देशाचे पंतप्रधान मोदी सहा तास अयोध्येतील मंदिराच्या भूमीपूजनाला गेले. त्यासाठी त्यांचा एक खास पोशाख होता. ती गोष्ट तर वेगळीच, मोदी आणि त्यांचा दहा लाखाचा कोट याची चर्चा तर फार आधी झालीच आहे. तर असो प्रश्न हा आहे. राममंदिराचा शुभारंभ तर झाला रामराज्याचा कधी होणार?

रामराज्य आणि महात्मा गांधी हा शब्द एक आहे. या देशात रामाचा अर्थ रामराज्य असा गांधींना प्रेरित होता. इंग्रज जेव्हा हिंदू आणि मुसलमान यांच्या मध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी गांधीजींनी भजन गायलं होत."रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम... ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान" जिथे जिथे गांधींचं भाषण व्हायचे तिथे तिथे हे भजन गायलं जायचं.. याचाच अर्थ राम आणि अल्लाह एक आहे असाच होता. तर आजची तारीख फार महत्वाची आहे. कारण आजच्याच दिवशी मोदी सरकारने कलम ३७० काढून घेऊन तिथल्या विधीमंडळाची कुठलीही परवानगी न घेता काश्मीरचं विभाजन केलं. आणि आज एक वर्ष होऊन देखील तिथल्या नेत्यांचा वनवास नजरकैद संपली नाही. हे लोकशाही वादी देशात शक्य व्हायला लागलं म्हणजेच आज लोकसभा, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्व बघितलं तर प्रश्न निर्माण होतो की आपण खरंच लोकशाही देशात आहोत का??

२० मार्च १९३० मध्ये गांधीजींनी नवजीवन पत्रिकेत एक लेख लिहिला. त्यात त्यांनी स्पष्ट पणे म्हटलं आहे. रामराज्य म्हणजे लोकांचं राज्य, दुसऱ्या शब्दात धर्मराज्य, ज्यात दुसरी बाब होती. गरिबांच कल्याण झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की, त्यात लोकमताचा आदर झाला पाहिजे. या तीनही गोष्टींचा ताळमेळ कुठे आज दिसतो का?? आपला आग्रह राममंदिराचा आहे. कारण राम भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. तर मग देशात रामराज्य का नको?? त्या दिशेने आपला प्रवास कसा सुरू आहे. याचा विचार करायला नको??

मागच्या सहा वर्षात देशात एकही एम्स उभं राहिलं नाही. एकही विद्यापीठ नाही, किंवा अयोध्येमध्ये तरी रामाच्या काळात होतं तसं एक गुरुकुल जे प्राचीन नालंदा विद्यापीठाची आपल्याला आठवण करून देईल. असं काही होणार आहे का?? किंवा असं काही झालं का?

आज देशात सर्वात महत्त्वाचे कोणते प्रश्न आहे. तर कोरोना महामारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्था अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो बजेट या वर्षी सादर केला. ३० हजार करोड चा त्याचा तर या चार महिन्यात काहीही नामोनिशाण नाही. सगळ्या कंपन्या विक्रीस निघाल्या आहे. हजारो कर्मचारी बेकार होत आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम सारखी कंपनी आपल्या २० हजार कर्मचाऱ्यांना वि. आर. एस देण्याच्या तयारीत आहे.

एल. आय. सी. सारखी कंपनी डुबण्याच्या मार्गावर आहे. आपल्या भविष्यासाठी ठेवलेला पैसा ज्याला आपण पी. एफ. म्हणतो. तो लोक वर्तमानासाठी काढत आहे. मग जे राम लोककल्याणासाठी झटणारे होते. त्या रामाच्या देशात मजूर बेरोजगार होत आहेत. तर रामराज्य येणार तरी कसं??

आज रामराज्याचा उल्लेख या साठी वारंवार करावा लागत आहे. कारण आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिरा सोबतच रामराज्याचा उल्लेख वारंवार केला आहे. त्यामुळे मोदी यांना जर रामराज्य अपेक्षित आहे आणि या आधी पण मोदींनी वारंवार गांधींचा उल्लेख आंतरराष्ट्रीय पटलावर केला आहे तर, या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेत आणि रोजचे लोक मरत असतांना या महामारीत मोदी रामराज्य आणणार तरी कसं?

पहिल्यांदा २०१४ मध्ये मोदी यांनी आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील नागपूर, आणि पश्चिमबंगाल या तीन ठिकाणी एम्स ची निर्मिती केली जाईल अशी घोषणा केली. आज त्याच काम कुठपर्यंत आलं?? याची कोणाला काही माहिती नाही. देशातील एकही एम्स दिल्ली च्या धर्तीच का नाही?? हे प्रश्न यासाठी आज उभे राहिले आहेत. कारण देश कोरोनाच्या विळख्यात चालला आहे. आणि आपली आरोग्य यंत्रणा कमी पडतेय हे सत्य आहे.

नागपूर जे देवेंद्र फडणवीस यांचं होम टाऊन आहे. आणि केंद्रात देखील सुदैवाने त्यांच्या पक्षाच सरकार आहे. तिथे वेगाने एम्स च काम का सुरू नाहीयेय?? राज्याला अजूनही केंद्राकडून हक्काचा पूर्ण जीएसटी मिळाला नाहीये. तर राज्याची आरोग्य यंत्रणा सुसज्ज होणार तरी कशी?? या देशात शौचालये उभारल्या गेले. असं वारंवार सांगितल्या जातं. त्या देशात मग अजूनही पिण्यासाठी स्वछ पाणी का नाही?? देशाची वाटचाल ज्या पद्धतीने होत आहे. तिथे रामराज्य येणार तरी कसं?

मोदी यांनी आज भाषण करतांना कार सेवकांच्या बलिदानाची तुलना देशाच्या स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाशी केली. शेवटी या मंदिर निर्मितीतून किमान आजपर्यंत देशात ज्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. त्या थांबुन देशात सौहार्द निर्माण होईल. ही आशा करून गांधीजींना अभिप्रेत असलेलं हे रामराज्य तरी येईल ही अपेक्षा ठेऊया. ज्या रामाच्या अयोध्येमध्ये रक्ताचा पाट वाहला. त्या अयोध्येत यापुढे शांतता नांदेल ही अपेक्षा ठेऊया.

पण मोंदिनी आपल्या भाषणात ज्या रामराज्याचा उल्लेख केला आहे. ते तर गरिबांच्या कल्याणा च आहे. मग पायी मेलेल्या मजुरांचं काय?? पायी जाणारे ११० मजूर मरण पावले. पण याच काळात रेल्वेने ४२८ कोटी चा फायदा कमावला. ज्या देशात एका खासगी उद्योगपतींना ३० हजार करोडचा फायदा करून दिल्या जातो. कोणत्याही अनुभवाशिवाय, कोणत्याही ऑफिस शिवाय, ज्या देशात एकही मोठं विद्यापीठ उभारल्या जात नाही. पण जिओ युनिव्हर्सिटी ला १००० करोड दिले जातात. त्या देशात गरिबांचं कल्याण करणार रामराज्य येणार तरी कसं? ज्या देशात राममंदिराचा निकाल देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त होऊन लगेच राज्यसभेचे खासदार बनतात. त्या देशात राम राज्य अर्थात लोकराज्य येणार तरी कसं?

बारा राज्य पुराने वेढले गेले आहेत. देशात रोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोणी मेल तर या काळात केवळ २० आप्तांनाच शोक प्रकट करण्याची परवानगी आहे. कोणाच्या घरी लग्न असेल तर केवळ ५० लोकच येऊ शकतात. पण मंदिर सोहळ्यासाठी १७५ लोक जमतात आणि हजारो प्रश्न या देशात असताना मोदी या सोहळ्याला सहा तास देतात. यावरुन हा राममंदिराचा सोहळा आहे की सत्तेचा सोहळा असा प्रश्न विचारण्यास वाव आहे.

शेवटी राम आपले सर्वांचे आहेत. कारण ज्या अयोध्येला सोन्याचं रूप दिल्या गेलं ती तर रामाची अयोध्या कधी नव्हतीच, सोन्याची तर लंका होती, पण लंका जिंकल्यावर जेव्हा लक्ष्मण ने रामाला म्हंटल तुम्ही इथले राजा बना तर रामाने सभ्य पणे उत्तर दिलं. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी" आता वाट बघूया चार वर्षात राममंदिर तर होईल पण रामराज्य येईल काय?? तूर्तास एवढेच....

जय राम, जय हिंद, जय संविधान

Updated : 6 Aug 2020 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top