Home > मॅक्स ब्लॉग्ज > साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी प्रचंड संघर्षातून उभारले साहित्य

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी प्रचंड संघर्षातून उभारले साहित्य

मुंबईत आल्यानंतर आण्णाभाऊ नी अनेक प्रकारची कामे केली. चरितार्थ चालवण्यासाठी मोलमजुरी केली. प्रसंगी कोळसा वाहण्याचे काम केले. एवढेच नाही तर शेठींजीची कुत्री ही सांभाळण्याची कामे केली. अशी कामे करत असताना आण्णाभाऊंना दादरच्या मिल मध्ये काम मिळाले. तेथे आण्णाभाऊ कामगार म्हणून काम करू लागले. आण्णाभाऊ ज्या ठिकाणी काम करत होते,त्याठिकाणी जमादार म्हणून एक व्यक्ती काम करत होता. तो जमादार मिल मध्ये लिहण्याचे काम करत होता. त्याच्याकडे आण्णाभाऊनी लिहण,वाचन शिकवण्याचा आग्रह धरला आणि त्याप्रमाणे जमादारानी त्यांना लिहण्या वाचण्यास शिकवले. यातूनच आण्णाभाऊ साठे जागतिक कीर्तीचे साहित्य निर्माण करू शकले,अशी माहिती प्रा.अनिल लोंढे यांनी बोलताना दिली.

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी प्रचंड संघर्षातून उभारले साहित्य
X

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे जीवन प्रचंड संघर्षाने ओतपोत भरलेले आहे. पूर्वीच्या काळी दलित समाजात शिक्षणाचा अभाव होता. या दलित समाजात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. आण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव असून त्यांचे शिक्षण केवळ नावालाच झाले होते. ते केवळ दीड दिवसच शाळेत गेले होते. परंतु आण्णाभाऊंना घरच्या हलाखीच्या परस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. अशा वेळी दुष्काळी परिस्थिती असताना वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास केला. हा प्रवास 240 किलोमीटरचा होता. मुंबईत आल्यानंतर आण्णाभाऊ नी अनेक प्रकारची कामे केली. चरितार्थ चालवण्यासाठी मोलमजुरी केली. प्रसंगी कोळसा वाहण्याचे काम केले. एवढेच नाही तर शेठींजीची कुत्री ही सांभाळण्याची कामे केली. अशी कामे करत असताना आण्णाभाऊंना दादरच्या मिल मध्ये काम मिळाले. तेथे आण्णाभाऊ कामगार म्हणून काम करू लागले. आण्णाभाऊ ज्या ठिकाणी काम करत होते,त्याठिकाणी जमादार म्हणून एक व्यक्ती काम करत होता. तो जमादार मिल मध्ये लिहण्याचे काम करत होता. त्याच्याकडे आण्णाभाऊनी लिहण,वाचन शिकवण्याचा आग्रह धरला आणि त्याप्रमाणे जमादारानी त्यांना लिहण्या वाचण्यास शिकवले. यातूनच आण्णाभाऊ साठे जागतिक कीर्तीचे साहित्य निर्माण करू शकले,अशी माहिती प्रा.अनिल लोंढे यांनी बोलताना दिली.

शैक्षिणक पुस्तकात आण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचा अभ्यास

आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर पोहचणे हा चमत्कारच म्हणावा लागेल. आज आण्णाभाऊ साठेच्या साहित्याचा अभ्यास प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक, बि.ए,एम.ए च्या पुस्तकात करण्यात आला आहे. आण्णाभाऊ साठे यांच्या जवळपास 130 कथा,कादंबऱ्या आहेत. यातील काही कादंबर्यावर चित्रपट निघाले आहेत. यामध्ये वैजयंता,माकडीचा माळ,वारणेचा वाघ,डोंगरची मैना,आवडी यांचा समावेश होतो. दीड दिवस शाळा शिकलेल्या आण्णा भाऊनी कथा,कादंबऱ्या,पोवाडे लीहले. त्यांचे लिखाण समाजाला दिशा देणारे आहे.

रशियात आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी रशियात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कवण गायले होते. त्याठिकाणी आण्णाभाऊ साठे चे स्मारक उभारले आहे. भातातील 28 राज्यामध्ये त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. आण्णाभाऊच्या तत्कालीन परस्थितीचा विचार केला तर अस्पृश्याना शाळेत प्रवेश नव्हता. आण्णाभाऊ चे लिखाण जगामध्ये परिचित झाले आहे. आण्णाभाऊच्या जीवनामध्ये बरेच चढ उतार आले. आण्णाभाऊ चे शेवटचे दिवस अत्यंत हलाखीत गेले,तरी त्यांनी लिखाण थांबवले नाही. कोल्हापूरच्या एका प्रकाशनाकडून त्यांच्या कथा, कांदबऱ्या प्रकाशित केल्या जायच्या,पण त्यांना अत्यंत अल्प असे मानधन मिळत होते. आण्णाभाऊनी आपले जीवन सामाजिक चळवळीसाठी अर्पण केले होते. आण्णाभाऊनी फकिरा कादंबरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ही मिळालेला आहे.

जग बदल,घालुनी घाव,मज सांगून गेले भीमराव

1956 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्याठिकाणी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी शाहीर,गायक,गीतकार असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी भिमशाहीर वामन दादा कर्डक यांनी आण्णाभाऊना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीत लीहण्यास सांगितले. त्यावेळेस आण्णा भाऊ साठे यांनी जग बदल,घालुनी,घाव मज,सांगून गेले भीमराव हे गीत लिहिले व गायले.

गायक प्रा.अनिल लोंढे गेल्या वीस वर्षांपासून लोकांना समजावून सांगत आहेत महापुरुषांचे विचार

सोलापूर शहरातील प्रा.अनिल लोंढे गेल्या वीस वर्षांपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,शाहू महाराज,आण्णाभाऊ साठे,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला समजावून सांगत आहेत. प्रा. अनिल लोंढे यांचे जीवन अत्यंत हलाखीच्या परस्थितीतून गेले असताना ही त्यांनी शिक्षण सोडले नाही. प्रसंगी त्यांनी सोलापूरच्या बस स्टँडवर हमालीचे काम केले. त्याच ठिकाणी त्यांनी चहाच्या स्टॉलवर काम केले. शिक्षण घेत असताना त्यांना कपड्याची चणचण होती. पण त्यांनी शिक्षण सोडले नाही. शिकत राहिले आणि प्राध्यापक झाले. त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे वारणेचा वाघ हे गाणं एक लाख लोकांनी पाहिले आहे.


Updated : 1 Aug 2022 3:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top