Javed Akhtar vs Mufti Debate : फक्त देवावरच्या विश्वासात इन्व्हेस्ट करत रहा !
ह्या डिबेटमध्ये मुफ्ती केवळ atheist लोकांचं देवाला न मानणं कसं चुकीच्या आधारावर आहे ह्यावरच बोलतात पण देव आहे ह्याचा कुठलाही सबळ पुरावा देत नाहीत.
X
Javed Akhtar and Mufti जावेद अख्तर आणि मुफ्ती ह्यांची डिबेट पाहणार नव्हते. कारण Theism vs Atheism Debate आस्तिकता आणि नास्तिकता ह्यांच्यात लॉजिक, rationality ह्या बेसिक गोष्टींपासून फारकत असल्यामुळे ह्या डिबेटचा काय उपयोग असं वाटून वेळ घालवायचा नव्हता. पण दोन दिवसांपासून ज्या पद्धतीने ही डिबेट झाली त्याचं कौतुक ऐकून आणि मुफ्ती ह्यांनी जावेद साहेबांना निरुत्तर केलं ह्याबद्दल वाचलं म्हणून वाटलं पाहूया. पाहिली.
डिबेट civil झाली एवढंच काय ते. पण मुफ्ती ह्यांची argument कुठल्याही अँगलने "विचार करायला प्रवृत्त करणारी" वगैरे वाटली नाही. जावेद अख्तरांना काही टर्म्स माहित नव्हत्या ज्यावर त्यांनी आधीच "माहित नाही" म्हटलं होतं आणि एक दोन ठिकाणी मुफ्ती ह्यांनी जावेद अख्तरांना शब्दात पकडलं just by giving smart retorts. MBA करताना बऱ्याच ग्रुप डिस्कशन्स केल्या होत्या आणि त्यात smart retorts वापरून पॉईंट्स स्कोअर कसा करायचा हे शिकले होते/ते स्किल वापरलंही. पण त्याचा अर्थ तुमच्या argument मध्ये substance असेलच असा होत नाही.
ह्या डिबेटमध्ये मुफ्ती केवळ atheist लोकांचं देवाला न मानणं कसं चुकीच्या आधारावर आहे ह्यावरच बोलतात पण देव आहे ह्याचा कुठलाही सबळ पुरावा देत नाहीत.
समाजात वाईट आहे हेच मुळात देवाचं असणं prove करतं. वाईट नसेल तर चांगलं कळणार कसं असा त्यांचा युक्तिवाद. Really? माणसाकडे विचार करायला मेंदू आहे, भावना आहेत. त्याचा स्वतःचा एक moral compass आहे जो चुकीचं काय बरोबर काय हे ठरवू शकतो. नव्हे, तोच ठरवतो. त्यासाठी देव लागतो?
गाझामध्ये हजारो निष्पाप मुलं मेली. जर देव omnipresent, omnipotent आहे तर तो हे का थांबवू शकत नाही ह्यावर मुफ्ती ह्यांची दोन उत्तरं.
परीक्षा हॉलमध्ये examiner असतो. एखादा परीक्षार्थी चुकीचं उत्तर लिहीत असताना त्याने पाहिलं तर परीक्षक ती चूक सुधारत नाही. ते त्याचं काम नाही. तसंच देवाने माणसाला फ्री विल दिली आहे. त्याचा वापर कसा करायचा हे त्याने ठरवायचं आहे म्हणे. ह्या उदाहरणातच फोलपणा आहे. Examiner चं काम परीक्षेत चुकीचं उत्तर लिहिणाऱ्या मुलाचं उत्तर बरोबर करण्याचं नाहीच. कारण परीक्षेत तो मुलगा काय लिहितो ही त्याची फ्री विल नसून त्याने वर्षभर अभ्यासात जी मेहनत घेतली किंवा घेतली नाही त्याचा परिपाक असतो. उत्तर येत नाही म्हणून आपल्या फ्री विलचा वापर करून जर त्या मुलाने दुसऱ्या मुलाचं उत्तर कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर examiner काय करेल? त्याने काय करणं अपेक्षित आहे? त्याने कॉपी पकडणं अपेक्षित आहे की नाही?
त्यामुळे जर देव असता आणि त्याने माणसांना फ्री विल दिली असती तर examiner च्या नात्याने त्याने कॉपी म्हणजे इथे निरपराध मुलांची हत्या थांबवली असती.
मुफ्ती ह्यांचं दुसरं उत्तर म्हणजे देव सगळं बघतोय आणि हे जे निरपराध मुलांशी होतंय त्याचा एक दिवस इन्साफ होईल. Really? कधी? तर त्याचं उत्तर मुफ्ती ह्यांच्याकडे नाही. त्यावर he tried to suggest that a human being cannot understand/comprehend how and when God will do his justice.
किती सोप्पं आहे असं सांगून लोकांचं तोंड बंद करणं कारण तुम्ही त्याचं sensible, logical, comprehendible उत्तर देऊच शकत नाही.
मी काल उत्पलच्या पोस्टखाली लिहीलं ते पुन्हा लिहीते. एखादी थियरी समजावताना किंवा तिचा विरोध करताना जेव्हा एखादं उदाहरण दिलं जातं तेव्हा ते फक्त एक उदाहरण आहे, पूर्ण थियरी नाही हे बरेचजण विसरतात. डिबेट फक्त त्या उदाहरणाभोवती फिरत राहते तेव्हा ती थियरी कुठेतरी सुटून जाते. त्यामुळे उदाहरण द्यायचंच झालं तर मी इन्व्हेस्टमेंटचं देईन. शॉर्ट टर्म किंवा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. ती करताना एक वर्षाने किंवा 20 वर्षांनी किती रिटर्न्स मिळणार हे पाहून इन्व्हेस्ट करणारा कुठे, किती आणि कधी इन्व्हेस्ट करायचं हे ठरवतो. पण समजा कोणी सांगितलं "तू पगारातले दरमहा 50% इन्व्हेस्ट कर. तुला रिटर्न्स कधी मिळतील ते तुलाही नाही कळणार पण मिळतील एवढं नक्की."
"अरे पण कधी मिळतील? माझ्या हयातीत तरी मिळतील ना?"
"ते नाही सांगू शकत कारण ते मलाही माहित नाही. तसं बघायला गेलं तर आपल्याला कधी, किती आणि कसे रिटर्न्स मिळतील हे समजून घेण्याची आपली लायकीच नाही पण मिळतील एवढं नक्की."
काय कराल हे ऐकून? इन्व्हेस्ट तर करणार नाही पण समोरच्याला वेड्यात नक्की काढाल. पण देवावरच्या विश्वासात मात्र हे होत नाही. आयुष्यभर करत रहा त्याच्यावरच्या विश्वासात इन्व्हेस्ट. ज्यासाठी आयुष्य खर्ची घातलं ते मिळालं नाही की म्हणा "देवानेच काहीतरी दुसरं, चांगलं प्लॅन केलं होतं म्हणून हे मिळालं नाही." दुसऱ्याच्या चुकीमुळे ऍक्सीडेन्ट झाला आणि हातपाय गेले तर म्हणा "देवानेच जीव वाचवला, जीवही जाऊ शकत होता". जीव गेला असता तर म्हणा "हातपाय जाऊन असं आयुष्य जगण्यापेक्षा बरं झालं देवाने मुक्ती दिली". सहा महिन्यांचं बाळ ते साठ वर्षांच्या बाईवर बलात्कार होतो तिथेही म्हणा "न्याय मिळेल." रिटर्न्स कधी मिळतील ह्याची अपेक्षा न करता फक्त देवावरच्या विश्वासात इन्व्हेस्ट करत रहा. आयुष्यात एकही वाईट काम न करता माझ्यासोबत वाईट का झालं किंवा सहा महिन्यांच्या मुलीने असं काय पाप केलं असेल की तिच्यावर अत्याचार झाला असा कोणी हम्बरडा फोडल्यास म्हणा "गेल्या जन्मी तिने..."
समोरच्याचं दुःख, अगतिकता न बघता, लक्षात न घेता, निर्लज्जपणे मागच्या जन्माची पापं मोजा पण त्या सर्वशक्तिमान देवाच्या अस्तित्वावर मात्र शंका घेऊ नका. प्लीजच
गाझामधल्या मुलांबद्दल बोलताना जावेद अख्तरांच्या गळ्यात आवंढा होता आणि त्याचं उत्तर देताना मुफ्ती ह्यांच्या बोलण्यात सराईत निर्ढावलेपणा. असो. आवरते.
राहता राहिला प्रश्न जावेद अख्तरांना निरुत्तर करण्याचा तर कुठल्याही rational, sensible, sensitive व्यक्तीला ती डिबेट पाहून कळेल की अख्तरांचंच पारडं भारी होतं. एकदोन ठिकाणी वर म्हटलं तसं smart retorts मारून मुफ्ती जिंकले असा भास होऊ शकतो पण तो केवळ भासच आहे. अख्तरांचं वय 80 वर्षं आहे. माईक धरताना त्यांचे हात कापतात. त्यांना मध्ये नीट ऐकू येत नाही. त्यांना कदाचित काही मुद्दे आठवतही नसतील. मुफ्ती त्यांच्या अर्ध्या वयाचे असतील त्यामुळे वयाचा, त्यांनी केलेल्या अभ्यासाचा आणि debating skills चा advantage त्यांना मिळाला. But even with this vantage point, he couldn't justify the existence of someone who doesn't exist.
तेजल कृष्णकुमार राऊत

तेजल कृष्णकुमार राऊत
तेजल कृष्णकुमार राऊत जर्मनीत राहतात. IT क्षेत्रात as a consultant/project manager म्हणून काम करतात. त्यांचं शिक्षण Engineering ( B.E. Electrical) and MBA in Marketing झालेलं आहे.





