Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्त्री एक आनंद यात्री

स्त्री एक आनंद यात्री

घराबाहेरची काम पुरुष मंडळी करायची. घरातील कामं स्त्रिया.परंतु आता स्त्रियांना तिच्या नोकरीसोबत बाहेरची कामांचही ओझं वहावं लागतं. एवढं सगळं करूनही घरात जर लहान मुलं असेल तर तिची जबाबदारी आणि जर का कोणी आजारी असेल किंवा वयस्कर मंडळी असतील तर त्यांची सुश्रुषा करण्याची जबाबदारी ही तिचीच. जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रियांच्या स्त्रियांच्या कर्तबगारीचे सखोल विश्लेषण केले आहे अश्विनी गावंडे यांनी…

स्त्री एक आनंद यात्री
X


न गंदगी पसंद है
ना बंदगी पसंद है
दूध सी धुली धुली
फुल सी खिली खिली
एक जिंदगी पसंद है

तसं आपलंही जीवन असावं असं वाटणाऱ्या प्रत्येक स्त्रीला महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आजच्या आधुनिक समाजाच्या जवळपास 60% स्त्रिया ह्या सुपर वुमन कॅटेगरीमध्ये मोडतात. याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. पहिले घराची जबाबदारी होतीच. आता नोकरीची जबाबदारी ही वाढली आहे .परंतु घरची जबाबदारी कमी झाली, असे नाही .आज आमची मुलगी किंवा सून जीन्स ,ड्रेस घालून ऑफिसला जाते ,तर पारंपारिक साडी नेसून वटपौर्णिमा आणि मकर संक्रांति ही साजरी करते. ती एकाच वेळी घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते, तर फोनवर ऑफिसही हँडल करते करोना पासून तर ऑनलाईन मीटिंग घेते आणि ऑनलाईन मीटिंग अटेंड ही करते.

त्यामुळे होते काय की फक्त जगण्याच्या वाटेवर धावणे सुरू आहे. धावणे कसे?

तिथे एक अनामिक थकवा आहे .पण लगेच कोणी आम्हाला "सुपर वुमन" म्हटलं की आमची मान टाइट. पहिले बाहेरची काम पुरुष मंडळी करायची आणि घरातील कामं स्त्रिया परंतु आता स्त्रियांना तिच्या नोकरीसोबत बाहेरची कामांचीही ओझं वहावं लागतं. एवढं सगळं करूनही घरात जर लहान मुलं असेल तर तिची जबाबदारी आणि जर का कोणी आजारी असेल किंवा वयस्कर मंडळी असतील तर त्यांची सुश्रुषा करण्याची जबाबदारी ही तिचीच.

अरे पण हे चाललय काय? मुळात इथपर्यंत आपण पोहोचलोच कसे?

आपली भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आणि रुढीवादी आहे . पुरुष कमवतो म्हणून त्याचं महत्त्व आहे .असे मला वाटले. मग मी कुठे कमी पडते ? पैशांनी जर त्याला महत्त्व असेल तर मीही पैसे कमावू शकते. माझेही महत्त्व आहे .मी ही स्वतःला सिद्ध करू शकते सिद्ध करण्यात वावगे ते काय ?

मुळात हा विचार उगवला तो पुरुषांशी तुलना करूनच. मीही काही कमी नाही .पण ही तुलनाच कशाला ? कारण स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी चे नियम वेगवेगळे आहेत. आजही अत्याधुनिक 21 साव्या शतकात आपल्या समाजात स्त्री-पुरुषांना तोलण्याची वेगवेगळी परिमाणे आहेतच, भौतिक दृष्ट्या. पुरुष कसा आहे? हे त्याच्या पैसे कमवण्यावरून ठरते .तर स्त्रीचे महत्त्व तिच्या रूपावरून ठरते. आणि ज्या गोष्टीवरून ज्या व्यक्तीला तोलण्यात येते ते मिळवण्यासाठी

"वह व्यक्ती अपना तन-मन धन लगा देता है!" सुंदरता हा वेगळाच विषय आहे. सुंदरतेच्या नावाखाली वेगळेच रूढार्थ तयार झाले आहेत. अगदी सामान्य स्त्री ही बघा स्वतःला घर करिअर आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा प्रेझेंटेबल ठेवायला लागली आहे, की आई आणि मुलीत फरक जाणवत नाही. खरंतर हे अत्याधुनिक स्त्रीची ही achievement आहे.

मागच्या पन्नास वर्षात स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले परंतु समानता नाही मिळाली. आज एखादी आघाडीची नटी तिची स्टाईल बदलते आणि तिला करोडो मुली किंवा बायका फॉलो करतात. सर्व प्रॉडक्टच्या मॉडेल बायकाच आहेत मग ते शेव्हिंग क्रीम असो नाहीतर शेव्हींग ब्लेड . स्त्रीने स्वतःचे मूल्य कमी केले आहे. ती फक्त दाखवतात तेवढीच नाही तिची ताकद ,तिची उर्मी यापेक्षा खूप मोठी आहे.

सनी लिओनीचे सोशल मीडियावर भल्याभल्यांना टक्कर देईल इतके फॉलोअर्स आहेत . तिची सुरुवात ज्या ठिकाणावरून झाली होती आणि आता त्या ठिकाणी ती पोहोचली आहे. त्यानुसार भारतीय संस्कृतीच्या पारंपारिक आणि रुढी वादी समाजात असे कसे घडू शकते? तर त्याचे उत्तर तिच्यातील आत्मविश्वास हेच आहे. म्हणून आपल्या प्रत्येकीला यासंदर्भात(आत्मविश्वासाच्या) आत्मचिंतनाची गरज आहे असे मला वाटते.

जगात मुख्यत्वे दोन प्रकारचे शरीरं आहेत स्त्री आणि पुरुष. पण माझी सुंदरता मला कळलीच नाही कारण माझी वास्तविकता मला कळली नाही.

मी प्रत्येक वेळेला स्वतःला तोलते ते दुसऱ्याच्या नजरेतून.आजकाल कॉलेजमधल्या मुलींना बॉयफ्रेंड नसणं म्हणजे किती अपमान जनक परिस्थिती आहे. मी कुणाला अट्रॅक्ट करू शकत नाही. याची किती खंत असते. त्यासाठी काय खटाटोप चालले आहेत बघतोच आहोत आपण सगळीकडे. असं सगळं तर मला जगता येत नसेल तर मी माझी किंमत कमी समजू लागते. काय आहे आपली Self Image (स्वप्रतिमा ) आपल्या मनात? काय आहोत आपण आपल्या नजरेत? 0 ते 10 पर्यंत जर एक ,स्केल केली तर किती पॉईंट देणार आपण स्वतःला? माझी किंमत (value)जर मीच करत नसेल तर इतर का करतील?

माझ्यासाठी जर मी नगण्य असेल तर मग मी इतरांसाठी कशी महत्त्वपूर्ण असू शकेल?

महिलांच्या घोळक्यातील गोष्टी तरी बघूया " आपण काय हो आपल्याला कसेही चालतं." म्हणजेच काय ? की मी स्वतःला अतिशय हिन मानले आहे. स्त्री सुंदर , तिला मुले होत नाहीत ,मुलीच होतात ,एक घराची दोन ,अपत्य संस्कारहीन निघाली ,नवरा बाहेर ख्याली निघाला , नवऱ्याने आत्महत्या केली ,नवऱ्याला व्यसन आहे तरी तीच दोषी. समाजात किंवा कुटुंबाच्या काही वाईट घटना घडत असतील त्याची जबाबदारी स्त्रीचीच हा आपला समाज आणि आम्ही त्यातल्या सुपर वुमन. खरंच एवढी कमकुवत आहे मी.

आजच्या स्त्रिया नोकरी करतात, पैसे कमवतात ,स्वतःचे निर्णय स्वतः घेतात . त्यांना स्वातंत्र्य आहे. पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात जगण्यात अप्रसन्नतेची ,निरूत्साहची , दुःखाची,नकारात्मकतेची ,

निरसतेची झालर का आहे ? सतत भीती ,त्रागा ,राग ,वैताग दुर्बलता, नैराश्य ,हताशपणा रडेपणा. कुंठीत जगणं, स्वतःला जगण्याच्या लायक न समजणे. आजच्या समाजात आपण फिट बसत नाही. ही भावना कारण स्वतःच्या जगण्याचा विचारच नाही .त्यामुळे जगण्यात तारतम्य नाही .सगळे मेंढी पळण जिकडे सगळे धावतात तिकडे मी पण सगळे ज्याला बरोबर म्हणतात त्याला मी पण बरोबर म्हणते. सगळ्यांच्या दृष्टीने जे चुकीचे ते माझ्या दृष्टीने पण चुकीचे मग ती कोणीही असो डॉक्टर ,इंजिनियर लेक्चरर असो नोकरी करणारी असो ,की घरी राहणारी शेवटी येतो तिथेच आपल्या जगण्यात काय राम आहे ?सगळेच निरर्थक सगळेच अर्थहीन.

अजूनही स्त्री बाहेर आलीच नाही "भला मेरी साडी से उसकी साडी सफेद कैसी?". ती बाहेर आलीच नाही "पडोसन की साडी और पडोसी की गाडी से."समाजाने बांधून ठेवले आहे आणि मी ही स्वतःला बांधून ठेवले आहे. परंतु खरंच बांधून ठेवले आहे का की मी बांधून घेतली आहे? हि सुद्धा चिंतनीय बाब आहे.

आपणही कधी आपले स्वत्व शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आपणही समाज विचाराच्या प्रवाहात प्रवाह पतीत होतोच. आणि त्यातून शिकणे टाळतो. कदाचित तेच जास्त सोपं असेल म्हणून.

याचं पर्यावसान कशात झालयं? जगात सर्वात मोठा रोग आकार घेतोय Depression.यावर नेमका इलाज अजूनही सापडलेला नाही. यामध्ये भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहे. Depression म्हणजे काय ? Feeling helpless, hopeless and worthless. Inability to act. अर्थात काहीही करू न शकण्याची क्षमता. म्हणजेच अकार्यक्षम

आजचे जगातील लेटेस्ट वैद्यकीय संशोधन असे सांगते की जगातील 8.7% स्त्रियां आणि 5.3% पुरुष या व्याधींनी ग्रस्त आहे. Bollywood मधली दीपिका Hollywood मधली अभिनेत्री बीयांन्से अशासारख्या, सगळी सुखं आणि ऐश्वर्य पायाशी लोळण घेणाऱ्या व्यक्ती सांगतात आहे की मी Depression मध्ये आहे .मग आपण काही फार दूर नाही.....

विज्ञानाच्या बिग बँग थिअरी नुसार एक महाविस्फोट होऊन पृथ्वीची निर्मिती झाली. आपण जास्त खोलात जाऊया नको परंतु 10 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर माणसाचं अवतरण झालं आणि 10हजार वर्षापासून संस्कृती विकसित व्हायला सुरुवात झाली.

आपल्याला माहिती आहे माणसाचा शरीर हे पेशीं पासून बनलेले आहे .त्याच्या शरीरात एकूण 60 ट्रिलियन पेशी म्हणजे 60 वर बारा शून्य एवढ्या पेशी आहेत. त्यापैकी 60 टक्के पेशी ह्या एकपेशीय आहेत त्यांना अमिबा सेल्स म्हणतात .या पेशींना हवा, पाणी ,सूर्यप्रकाश ,शारीरिक श्रम, आराम ,मलमूत्र विसर्जन असे सगळे व्यवस्थित मिळालं की मानसिक स्तरावर व्यक्तीला संतोष मिळायला लागतो.

पैकी 38.4% सेल्स ह्या माकड पेशी अर्थात मंकी सेल्स आहेत यामध्ये जेवणाची हमी ,मानसिक सुरक्षितता, कुटुंब ,आसरा, मित्रपरिवार एवढं सगळं असलं की मानसिक स्तरावर सुख मिळायला लागते. केवळ 1.6 सहा टक्के पेशी ह्या मानवी पेशी अर्थात ह्युमन सेल्स आहेत .यामध्ये मी काही नवनिर्मिती (creativity )केली तरच मला आनंद मिळायला लागतो. आणि अरिस्टॉटलने अडीच हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले आहे ,की माणसाचा जन्म हा फक्त आणि फक्त आनंद मिळवण्यासाठीच झालेला आहे.

सांगण्याच तात्पर्य हेच की व्यक्तीला कितीही शुद्ध हवा पाणी मुबलक सूर्यप्रकाश मिळाला तरी संतोष (happiness)मिळेल आनंद (joy)नाही. कितीही पैसा कमवला आणि तो साठवला, घरदार घेतली मित्रपरिवार केला तरी सुखच happiness मिळेल आनंद नाही.

आनंद आणि आनंद मिळवायचा असेल तर मला नवनिर्मितीच (Creativity ) करावी लागेल . "इससे ज्यादा कुछ लगता नही और इससे कम नही कुछ होता नही." नवनिर्मिती (Creativity)म्हणजे काय तर दोन गोष्टी एकत्र करून तिसरी गोष्ट करणे भौतिक स्तरावर झाले.

मूल्य प्रवाही(value) भावप्रवाही(emotions) जगणं हेच आनंदाचे निधान आहे . मूल्य value आणि भाव emotions हीच माझी वास्तविकता आहे .हेच माझं या पृथ्वीतलावरचं अस्तित्व आहे. एकूणच आपण संतोष आणि सुखाच्या(happiness) स्तरावर जगतो आहोत आणि आनंद(joy) मिळवण्याची अपेक्षा आहे जे शक्य नाही आज आपण आपल्या जगण्याचं निरीक्षण केलं तर लक्षात येतं की आपल्या आयुष्यात नवनिर्मिती फार नगण्य आहे. त्यामुळे जगण्यात तोच तोच पणा आला आहे त्यामुळे boredom आणि मग पर्यायाने गरजेचे आहे, मनोरंजन (entertainment) आणि म्हणून वाढलाय सोशल मीडियाचा वापर.

सतत तेच तेच जगतो आहोत आणि परिणाम दुसराच काही मिळेल याची अपेक्षा ठेवतो आहोत. आजूबाजूच्या वातावरण आणि स्वतःच्या विचाराने आणि अर्धवट समाजाच्या आधारावर मी स्वतःच जगणं ,स्वतःचा विचार करणे आणि विचार करून जगण्याचा मार्ग बंद केलाय कुंठीत केला आहे.

मग जगायला कसं पाहिजे सोल फुलनेस (soulfulness)म्हणजे रसरशीतपणे. अर्थात सजग (aware) आणि सतर्क(alert ) आणि जीवनाकडे बघण्याचा संपूर्ण आशावादी दृष्टिकोन म्हणजेच रसरशीतपणा. दुसरं म्हणजे स्वप्रतिमा माझ्या मनात माझी स्व प्रतिमा(self image ) इंद्रधनुष्या सारखी सप्तरंगी आहे की काळवंडलेली रसरशीतपणा(soulfulness) आणि स्वप्रतिमा (self image)या एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत.

बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्या निवडणुकीची गोष्ट. सन 2008 त्यांच्यासमोर दुसऱ्या प्रतिस्पर्धी होत्या हीलरी क्लिंटन. सगळीकडचे निर्णय असे होते की जवळजवळ हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष बनणारच. हिलरी नी जेव्हा बघितलं की लोकांनी आपल्याला किती प्रतिसाद दिलाय किती भरभरून मते मिळाली आणि हा विजय पाहून त्या खूप भावनाविवश झाल्या फक्त दोनच मिनिटं त्यांचा संयम सुटला त्या अत्यानंदाने म्हणा किंवा कृतज्ञतेने म्हणा त्यांना रडू फुटले फक्त दोनच मिनिट. लक्षात घ्या रडणे म्हणजे दुबळेपणा नाही ती एक भावना आहे .मीडियामध्ये ही बातमी हा फोटो प्रस्तुत झाला हिलरींच्या रडवेल्या फोटो खाली

Tag line आली. आम्हाला अमेरिकेचा भावी राष्ट्राध्यक्ष असा हवाय? तेव्हापासून हीलरींचा जो गड ढासळला तो पुन्हा सावरलाच नाही .कारण कोणालाही आपले नेतृत्व हे खंबीर आणि कणखर पाहिजे असतं. हिलरी क्लिंटन मध्ये हे गुण नव्हते असं नव्हतं परंतु दोन मिनिटांसाठी समाज जीवनातील जीवनातील सजगता(awareness) आणि सतर्कता (alertness)चुकली नाही तर जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राची राष्ट्राध्यक्ष एक महिला असती त्यामुळे अमेरिकेचाही इतिहास बदलला असता आणि जगाचा ही कारण.

Leadership means what

Male leader is someone who takes you where you wants to be.

Female leader is someone who takes you where you ought to be.

म्हणून पुन्हा सांगते रडणे ही एक भावना आहे परंतु आजही कित्येक स्त्रिया त्याचा शस्त्र म्हणून वापर करतात इतरेजन त्याचा स्त्रीचा वीक पॉईंट म्हणून वापर करतात. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण जगताना सतर्क आणि सजग असणे फार महत्त्वाचे. मुळात स्त्री म्हणजे स्थिरत्व भाव आहे .स्त्रीच्या जगण्याचं अधिष्ठान हृदय आहे जे मेंदू पेक्षा पाच हजार वेळा जास्त शक्तिशाली असतं .

या स्थिरत्वभावातूनच शेतीचा शोध लागला तो एका स्त्रीने लावला."गरज ही केवळ शोधाची जननीच नाही तर प्रज्ञावंताची खाण आहे. आयुष्य हे गरजांवर अधिष्ठित असावे ते तसेच घडावे. महत्त्वाकांक्षेवर नाही. कारण महत्त्वाकांक्षेच्या आसमानाला स्पर्श करताना जमिनीवरचे पाय सुटतात पण गरजा पूर्ण करण्याच्या धडपडीत मात्र जमिनीवर पाय भक्कम रोवता येतात हाच स्त्री मधला चिवटपणा आहे.

महाराष्ट्रातीलच उदाहरण द्यायचे झाले तर गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रात जवळपास 60000 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या बायकांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण नाही . हा आहे स्त्री मधला चिवटपणा आणि याला म्हणतात जगण्याला भिडणे.

आज एकविसाव्या शतकात जिथे स्त्री पुरुष सर्वच क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करतात त्याच देशात स्त्रियांना नैसर्गिक विधींसाठी सार्वजनिक युरिनल मिळावेत यासाठी सह्यांच्या मोहिमा चालवाव्या लागतात. Me too सारख्या मोहिमा चालवाव्या लागतात. आजच्या मोकळेपणाच्या शतकात असेही म्हटल्या जाते की स्त्रियांनी नेहमी आपल्या समस्यांविषयी मोकळेपणाने बोलले पाहिजे " पण खरी मेख तर ही आहे की स्त्रियांनी आपल्या समस्या मोकळेपणाने बोलण्यात काहीच समस्या नाही खरी समस्या आहे "ती त्यांना लक्षपूर्वक ऐकून घेण्यात."

विज्ञानाचे युग म्हटल्या जाणाऱ्या 21व्या शतकाचे नागरिक आपण. एवढ्या प्रचंड प्रगतीनंतर आजपर्यंत विज्ञान मात्र एक रक्ताचा थेंब निर्माण करू शकला नाही. जिथे माझी माऊली अख्खाच्या अख्खा पुरुष निर्माण करू शकते. तिच्या उदरातून तो घडवू शकते नऊ महिन्यांच्या असंख्य मरण यातना भोगून तेही हसत हसत कारण ती नवनिर्मिती आहे. तिच्यातून मिळणारा आनंद अपार आहे. प्रतिरूप निर्माण केल्याचे समाधान आहे. हेच तर स्त्री - निर्मितीचे सर्वात मोठे अधिष्ठान आहे.

कदाचीत पुरुषाशिवाय स्री आई होऊ शकेल .परंतु पुरुष कधी पुरुष निर्माण करू शकणार नाही. हाच सृजनक्षमतेचा प्ररमोच्च बिंदू आहे. निसर्गाने तो सढळ हाताने स्त्रीला बहाल केलाय परंतु माझ्याकडे माझं लक्षच कुठे आहे मी स्वतःला सृजनशील समजतच नाही.

आनंद मिळवण्याच्या आणि नवनिर्मितीच्या असंख्य संधी आपल्या प्रत्येकीकडे आहेत.परंतु मी जे काम करते ते समाजाने आणि मीही दुय्यमच ठरवले आहे. कारण समाजात आजही स्त्रीचे स्थान दुय्यम आहे .कारण तिने तिचा कधी स्वतंत्रपणे विचारच केला नाही तिचा कधीही विचार झाला तो पुरुषांच्या संदर्भातच आणि तिने ही तो तसाच केला आहे. सतत पुरुषांशी तुलना करून पुरुष करतात तेच करण्याच्या किंवा बरोबरी करण्याच्या नादात तिने अनेक नवनिर्मितीच्या असंख्य संधी घालवलेल्या आहेत.

खरोखर आमच्या समाजात स्त्री पुरुष समानता असती तर आज 21व्या शतकातील स्त्रीला आपल्या मूलभूत हक्कांसाठी एल्गार पुकारावा लागला नसता, बेटी बचाव मोहीम उघडावी लागली नसती, कन्या भ्रूणहत्यविरुद्ध मोहीम करावी लागली नसती ,आजही सुशिक्षित आणि सुशिक्षित समाजात बलात्कार झाले नसते, तिला भोगवस्तू समजले गेले नसते. तर हजारो कळ्या उमलण्या आधी अत्याचाराला बळी पडल्या नसत्या, महिला तक्रार निवारण केंद्र उघडावी लागली नसती. मुळात आम्हाला स्त्री पुरुष समानता नकोच आहे .

समाज तरण्यासाठी हवी आहे ती स्त्री पुरुष पूरकता. स्वतःच्या आयुष्याला अर्थपूर्णता प्रदान करणारी कल्पना चावला सुद्धा स्त्रीच होती. स्त्री मूल्यांचा शाश्वत झरा आहे तिच्यात प्रेम , करुणा ,कृतज्ञता ममत्व .वात्सल्य आहे. दुसऱ्याला जगवणं म्हणजे किती मोठे सृजन आहे. स्त्रीत्व हे शरीरावर अवलंबून नसतं. मातृ हृदय हा खरा स्त्रीत्वाचा गाभा आहे.

बाबा आमटे नामक मातृह्रदयाने हाता पायांची बोट झडलेल्या, जगणं नाकारलेल्या माणसांना घेऊन प्रतिविश्व निर्माण केलं. अशा परिस्थितीतही त्यांना सूजनशीलतेच्या आनंदाशी परिचित केलं. हे प्रेम असल्याशिवाय घडू शकत नाही.

भगवान बुद्ध ज्ञानासाठी बाहेर पडले आणि साडेसहा वर्षांनी यशोदेला भेटायला आले. तेव्हा यशोदा त्यांना म्हणाली "तुम्ही पुरुष आहात तुम्हाला ज्ञान पाहिजे होतं. म्हणून तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलाचा त्याग केला .हे एक पुरुष करू शकतो ,आजपर्यंत कोणत्याही स्त्रीने किंवा त्यानंतरही कोणतीही स्त्री बोधप्राप्ती किंवा ज्ञानासाठी आपल्या मुलाला सोडून गेली नाही .जाऊ शकणार नाही कारण त्यामुळेच तिला पूर्णत्व लाभलं. त्या सृजनाचा मी त्याग करू शकत नाही. हे प्रेम आहे ही अनन्यता आहे.

अनन्यता म्हणजे ना कोई अन्य. कारण प्रेमच ज्ञान आहे. तेच पूर्ण मूल्य (complete value)आहे. Love is the foundation of all values.आणि तेच अखिल विश्वाच्या मातृ हृदयी वसते. म्हणून मला माझ्या विषयी माझ्या जगण्याविषयी सजग व्हावे लागेल. "क्यों की खूबसूरती आज भी रूह मे बसती है जिस्म मे नही" मी निसर्गतः आनंद यात्री आहे मी सर्व मूल्यांचे अधिष्ठान आहे.

कारण मीच आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी,कुष्मांडा ,चंद्रघंटा, स्कंदमाता, कात्यायनी ,कालरात्री, महागौरी ,सिद्धीदात्री. माझेच तर स्वरूप आहेत या नवदुर्गा. आणि आदिमाया सुद्धा.

कु. अश्विनी गावंडे
पदवीधर शिक्षिका
एन एल पी कोच, DMITकौन्सिलर
जीवन विद्या प्रबोधक, अकोला

Updated : 8 March 2023 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top