Home > मॅक्स ब्लॉग्ज > ब्रिटनमधील संसदीय निवडणुकात मजूर पक्षाचा पराभव - एक विश्लेषण

ब्रिटनमधील संसदीय निवडणुकात मजूर पक्षाचा पराभव - एक विश्लेषण

ब्रिटनमधील संसदीय निवडणुकात मजूर पक्षाचा पराभव - एक विश्लेषण
X

सामान्य नागरिकांना नक्की काय वाटते हे समजून घेण्याला ऑफिसमध्ये बसून खूप रॅडिकल मॅनिफेस्टो बनवणे पर्याय नाही !

संसदीय निवडणकात दरवेळी वैचारिक भूमिकेमुळे विजय किंवा पराजय होत नसतो; विरोधी पक्षाची व्यूहरचना समजण्यात अपयश, नेतृत्वाचे जजमेंट, मुख्य म्हणजे सामान्य लोकांशी तुटलेली नाळ या गोष्टी महत्वाच्या ठरतात

गेली ४० वर्षे नवउदारमतवादाने ब्रिटिश कामगार / कष्टकरी पिचलेला आहे. त्याला मजूर पक्षाने जाहीर केलेला रॅडिकल जाहीरनामा अपील व्हायला पाहिजे होता

पण ब्रिटनमध्ये नवउदारमतवादाचा ठोस अविष्कार होता : युरोपियन युनियन

ब्रिटनच्या संदर्भात युरोपियन युनियनमध्ये बाहेर पडणे म्हणजेच नवउदारमतवादाला विरोध करणे हे ब्रिटिश कामगार/ कष्टकऱ्यानी बरोबर ताडले; पण जेरेमी कॉर्बिन त्यात अक्षरशः अपयशी ठरले

ब्रिटनमधील निवडणुकात मजूर पक्षाने जिंकलेल्या २०३ जागांचा आकडा १९३५ नंतरचा नीचांक आहे

मजूर पक्षाच्या सर्वात मर्मी घाव बसला आहे तो त्याच्या परंपरागत मानल्या गेलेल्या मतदारसंघात.

अनेक दशके ज्या मतदारसंघानी मजूर पक्षाचे सांसद संसदेत पाठवले त्या मतदारसंघात पहिल्यांदा हुजूर पक्षाला निवडून दिले

२०१६ मध्ये ब्रेक्झिट वर जनादेश घेतला गेला; त्यावेळी संसदेच्या ६५० मतदारसंघापैकी ४१० मतदारसंघात “ब्रिटनने बाहेर पडावे” म्हणणाऱ्यांचे मताधिक्य होते, उरलेल्या २४० मध्ये “ब्रिटनने युरोपियन संघाचं राहावे” म्हणणाऱ्यांचे मताधिक्य होते

“बाहेर पडावे” (LEAVE) म्हणणारे प्रायः कामगार / कष्टकरी वर्गातील होते आणि सहाजिकच त्यापैकी अनेक जण मजूर पक्षाचे पिढ्यानपिढ्या खंदे समर्थक होते

“बाहेर पडू नये” (REMAIN) म्हणणारे प्रायः मध्यमवर्गीय होते

ब्रेक्झिट वर हुजूर पक्षाच्या जॉन्सन यांनी सर्वस्व पणाला लावले होते आणि जवळपास एकाच मुद्यावर निवडणूक लढवली

हुजूर, मजूर, लिबरल डेमोक्रॅट सर्व पक्षातील “ब्रेक्झिट” च्या बाजूने असणाऱ्या परंपरागत मतदाराना त्यांनी आपल्याकडे खेचून घेतले

सर्वच पक्षच्या मतदारांमध्ये ब्रेक्झिटच्या बाजूचे व विरोधी अशी फूट पाडण्यात जॉन्सन यशस्वी झाले

मुद्दा आहे मजूर पक्षच्या भूमिकेचा; जेरेमी कॉर्बीन हे मजूर पक्षाचे नेते. अतिशय रॅडिकल. त्यांच्या हेतू विषयी शंका नसणारे

पण ब्रेक्झिट बद्दल त्यांनी संदिग्ध भूमिका घेतली. मजूर पक्ष सत्तेवर आल्यावर आपण पुन्हा एकदा ब्रेक्झिटवर नव्याने जनादेश घेऊ हे त्यांची घोषणा !

दोन वर्षांपूर्वी २०१७ साली संसदीय निवडणुकात मजूर पक्षाने ब्रेक्झिटला निसंदिग्ध पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे मजूर पक्षाने अनेक वर्षातील सर्वात जास्त जागा मिळवल्या होत्या

प्रश्न असा उरतो कि असे असताना मजूर पक्षाने यावेळी ब्रेक्झिटबबाबत संदिग्ध भूमिका का घेतली ?

मजूर पक्षाची जमिनीवरील सामान्य नागरिकांशी नाळ तुटली आणि नेतृत्व शब्दबंबाळ तात्त्विक भूमिका घेणाऱ्या रॅडिकल मध्यमवर्गीयांच्या हातात गेले असा एक आरोप केला जात आहे

ज्यात खूप तथ्य आहे; ब्रिटनसाठीच नव्हे तर भारतासाठी देखील !

सामान्य नागरिकांना नक्की काय वाटते हे समजून घेण्याला ऑफिसमध्ये बसून खूप रॅडिकल मॅनिफेस्टो बनवणे पर्याय नाही !

Updated : 16 Dec 2019 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top