Home > Top News > ऐतखाऊ कोण शेतकरी की उद्योगपती?

ऐतखाऊ कोण शेतकरी की उद्योगपती?

ऐतखाऊ कोण शेतकरी की उद्योगपती?
X

बिगर शेतकरी जातीत जन्मलेला, मुंबई सारख्या महानगरात जन्मून मोठा झालेला, कधीही शेतीशी संबंध न आलेला, उच्च शिक्षण, चांगली स्थिर नोकरी करून भौतिक सुखवस्तू जीवन जगत असणारा मी… तरीही माझ्या काळजापर्यंत माझ्या देशातील माझ्या कोट्यवधी शेतकरी बांधवांचा आक्रोश पोहोचतो आहे. जरी आजच्याच आंदोलनाचा ट्रिगर कृषी विधेयकांमुळे मिळाला असला तरी, मला कळतंय मानवी समाजाच्या हजारो वर्षाच्या सिव्हिलायझेशनचा प्रवास शेतकरी समूहांनी आपल्या खांद्यावर वाहिला आहे.

मला कळतंय, एकेकाळी नागरिक भुके मरू नयेत. जनावरांना घातला जाणारा मका आयात कराव्या लागणाऱ्या आपल्या देशाची धान्याची कोठारे यांच्या कष्टामुळे भरली आहेत. मला कळतंय अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येशी तुलना करता शेती क्षेत्राला राष्ट्रीय साधनसामुग्रीत मिळणारा वाटा सतत कमी कमी करत नेला गेला आहे.

मला कळतंय व्हायबिलिटी गॅप फंडिंग असु दे नाहीतर एनपीए ऱ्हाईट ऑफ मार्फत लाखो कोटी रुपयांची सबसिडी लाटणाऱ्या कॉर्पोरेट क्षेत्राला प्रोफेशनल म्हटले जाते आणि सबसिडी मागतात म्हणून शेतकऱ्यांना ऐतखाऊ म्हणून हिणवले जाते.

मला कळतंय युगानुयुगे फ्युडल लॉर्ड्सच्या तोंडी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठी कोर्पोरेट्स आणि जागतिक भांडवलशहांच्या अंगणात ढकललं जातंय. मला कळतंय पाशवी बहुमताच्या जोरावर लोकशाहीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर खोलवर परिणाम करणाऱ्या कायद्यांवर चर्चा देखील नाकारली जातं आहे.

मी माझ्या परीने माझ्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे.

-संजीव चांदोरकर (२५ सप्टेंबर २०२०)

Updated : 26 Sep 2020 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top