News Update
Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्निपथ : भाजपची ऑफिस बांधण्यापेक्षा सैनिकांच्या पगाराला पैसे द्या: आनंद शितोळे

अग्निपथ : भाजपची ऑफिस बांधण्यापेक्षा सैनिकांच्या पगाराला पैसे द्या: आनंद शितोळे

अग्निपथ योजना काय आहे? अग्निपथ योजना लष्कराचे कंत्राटीकरण करण्याचा डाव आहे का? आणि या कंत्राटीकरणावर उपाय काय? याचा वेध घेणारा लेखक आनंद शितोळे यांचा लेख

अग्निपथ : भाजपची ऑफिस बांधण्यापेक्षा सैनिकांच्या पगाराला पैसे द्या: आनंद शितोळे
X

सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन असत १०+४ , दहा वर्षे सेवा आणि नंतर चार वर्षाची मुदतवाढ. सैनिकांच्या पगाराचा खर्च सरकारांना झेपत नाही. म्हणून हे कंत्राटी कामगार सैनिक म्हणून भरायचे आहेत चार वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने.

इंधनाच्या करातून मिळालेले पैसे , सिलिंडर सबसिडी, जीएसटी , विकलेल्या कंपन्या, खाजगीकरण केलेली विमानतळ, रेल्वे या सगळ्यातून मिळालेले पैसे सैनिकांचे पगार करायला वापरायचे नाहीत ? गडकरी सगळे रस्ते खाजगीकरण करून टोल नाके उभारून करताहेत मग पैसे नेमके लागताहेत कुठं ?

सैनिकांचे पगार करायला पैसे नाहीत ? मग ८००० कोटीची विमान आणि २२००० कोटीच नवीन संसद भवन बांधायला पैसे आहेत ?

देशाची चिंता असते ना सतत तुम्हाला ? मग सगळ्या जिल्ह्यात भाजपची ऑफिस बांधण्यापेक्षा सैनिकांच्या पगाराला पैसे द्या की ?

सीमेवर सैनिक म्हणून दरवेळेला गळे काढणारे चोट्टे भामटे आता बिळात लपून बसतील. बाकी एवढी कंत्राटी सैनिक भरायची वेळ आली असेल तर तेही पैसे वाचवायचा रामबाण उपाय सांगू काय ?

ते तीन दिवसात सीमेवर जायला सज्ज होणारी भागवत काकांची फौज कधी कामाला येणार आहे ? का हेच सगळे सरकारी पगारावर चार वर्षे पोसून गोरक्षकांच्या झुंडी बनवायच्या आहेत ? बाकी या कंत्राटी सेनेमध्ये उच्चवर्णीय समाजाला १०० टक्के आरक्षण ठेवायला हवं. मग कोण सिलिकॉन व्हॅलीत जातंय आणि कोण देशासाठी बंदुका घेऊन उभं राहतील हे तरी कळेल.

Updated : 2022-06-15T19:33:22+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top