Home > मॅक्स ब्लॉग्ज > अफिगाणिस्तान देश आहे की टोळ्यांचा समुह?

अफिगाणिस्तान देश आहे की टोळ्यांचा समुह?

जगभरात ज्या अफगाणिस्तानची चर्चा सुरु आहे. तो अफगाणिस्तान देश नक्की काय आहे? त्याचा इतिहास काय आहे? त्याची भौगोलिक रचना नक्की कशी आहे? तेथील मुख्य व्यवसाय नक्की काय आहे? अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की वाचा आनंद शितोळे यांच्या अफगाणडायरीच्या पहिल्या भागात...

अफिगाणिस्तान देश आहे की टोळ्यांचा समुह?
X

अफगाणडायरी ०१

अफगाणिस्तान (Afganistan) इस्लामच्या आगमनापूर्वी अनेक टोळ्यांचा समुदाय होता आणि इस्लाम नंतरही त्याच रूप बदललेलं नाही. या टोळ्यांच्या जातपंचायती असतात आणि सगळ्या टोळ्यांची मिळून एक मोठी जातपंचायत असते जिला 'लोया जिर्गा' म्हणतात. समुदायाचा, टोळीचा कारभार या पंचायती चालवतात. अफगाण टोळ्यांची अस्मिता अफगाण लोकांसाठी सर्वोच्च असते, देश-धर्म-व्यक्ती यापलीकडे जाऊन.

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था थोडीफार शेती त्यातही सुक्यामेव्याचे उत्पादन आणि जास्त करून अफूची शेती आणि अफूच्या उपपदार्थ निर्मिती-व्यापार यावर अवलंबून आहे.


a

अफगाण टोळीवाले लढवय्ये आहेत...

गेली अनेक शतक अफगाणिस्तान पूर्णपणे जिंकून तिथे आपला कुठला तरी कायदा-राज्य स्थापन करण्याचे मनसुबे ठेऊन आलेल्या सत्तांना तात्पुरता विजय मिळालेला असला तरीही कायमस्वरूपी मुलभूत बदल शक्य झालेले नाहीत. याला ना रशिया अपवाद ना अमेरिका अपवाद आहे. पण तरीही बाहेरच्या सत्तांना इथे नाक खुपसावे वाटते त्याच कारण अफगाणिस्तान भौगोलिकदृष्ट्या दक्षिण आशियात अतिशय मोक्याच्या जागेवर आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून आशियातून युरोप, मध्यपूर्वेतील देशांना जोडणारा मार्ग अफगाणिस्तान मधूनच जातो हे महत्वाचं कारण आहे.

अफगाणिस्तान कायमच स्वतंत्र पण टोळ्यांच्या अंमलाखाली असलेला देश राहिलेला आहे. मुळात त्याला देश म्हणनं हेच मोठं धाडस आहे. हा टोळ्यांचा समूह आहे हे जास्त योग्य आहे. या टोळ्यात असलेले अंतर्विरोध पूर्वीही होते आणि अजूनही आहेत.

म्हणूनच जेव्हा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मध्ये तालिबानच्या विरोधात लढत होत तेव्हा मजार-ए-शरीफ का शेर म्हणून ओळखला जाणारा अब्दुल रशीद दोस्तम तालिबानच्या विरोधात लढाईत नॉर्दन अलायन्स च्या माध्यमातून सामील झालेला होता.




अमेरिका किंवा रशियाच्या पाठिंब्याने उभी राहिलेली बुजगावणी सरकार टिकून राहात नाहीत. त्याचं कारण या दोन्ही महासत्ता अफगाणिस्तानच्या मूळ स्ट्रक्चर किंवा मॉडेलला आमुलाग्र बदलण्याचा प्रयत्न करतात आणि हा होऊ पाहणारा बदल त्यांच्या टोळ्यांच्या संस्कृतीच्या मुळावर येईल ही भीती अफगाण लोकांना वाटते आणि ही बुजगावणी सरकार ऐनवेळेला पळ काढतात किंवा मोडून पडतात.

तालिब म्हणजे विद्यार्थी. तालिबानचा अर्थ मात्र, सध्याच्या काळात फार वेगळा आहे.

ओसामा बिन लादेन ने तिथे आश्रय घेतला. कारण त्याला दुसऱ्या ठिकाणी आश्रय अशक्य होता. ओसामा तालिबानचा सदस्य नव्हता. तर त्याला तालिबानने आश्रय दिलेला होता.


जगभरातल्या इस्लामिक दहशतवादी संघटना आणि तालिबान मधला हा मूळ फरक महत्वाचा आहे. त्यामुळे इथल्या कट्टरवादी मुस्लिमांनी अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या ताब्यात गेल्याने हुरळून जाऊन जग पुन्हा दार-उल-इस्लाम च्या दिशेने वाटचाल करायला लागलेलं आहे. असला अडाणी समज करून घेण्याच कारण नाही. तालिबान म्हणजे सगळ्या जगाला धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळत अशी अवस्था झालेली आहे. या घडामोडीचा आपल्यावर होणारा परिणाम दुसऱ्या भागात.

आनंद शितोळे

Updated : 19 Aug 2021 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top