हिरव्या देवा... जंगल वाचवायला तू धाव रं...
X
मुंबईतील आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यात राहणारे पर्यावरण संरक्षक प्रकाश भोईर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या कवितेच्या शैलीतून शुभेच्छा देत झाडे लावण्याचा संदेश दिला आहे.
प्रकाश भोईर हे मुंबईतील जंगल म्हणून ओळख असणाऱ्या आरे कॉलनीतील अनेक वर्षांपासून स्थायिक आहेत. त्यांनी जंगल, झाडे, पशू-पक्षी वाचविण्याचा संकल्प केला असून याची जनजागृतीही मोठ्या प्रमाणात करत आहे.
तरुणाईला जंगलाचं, निसर्गाचं, पर्यावरणाचं महत्त्व पटवून देत पर्यवरणाचं संवर्धनाचं ध्येय हाती घेतलं आहे. झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश देत त्यांनी येणाऱ्या पिढीला ऑक्सिजनयुक्त पृथ्वी देण्याचा निर्धार केला आहे. तसेच फक्त संदेश देऊन थांबले नाहीत तर त्यांनी आजच्या दिवशी एक झाडं लावून आपला शब्द कृतीतून साध्य केला आहे.
पर्यावरणा संदर्भात मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना प्रकाश भोईर सांगतात की,
अलीकडच्या काळात विकासाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात पर्यावरणाची हानी होताना आपण पाहतोय.
उदा. मेट्रो कारशेड, वाढवण बंदर अनेक असे मोठे प्रकल्प येतात आणि त्यात वनस्पतींची, जंगलांची कत्तल केली जाते. आणि याचाच परिणाम म्हणून आपण आज वेगवेगळ्या आजारांना सामोरं जात आहोत. करोना महामारी, मोठ-मोठी चक्रीवादळं, अनियमितपणे येणाऱ्या पावसामुळे शेती परिणाम होत आहे. एकूणच काय तर आपण जे पेरलं आहे तेच आपण भोगतोय.
या ठिकाणी प्राणी, पक्षी इतर जीव सुद्धा आहेत. परंतू ते पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचवत नाही. पर्यावरणाला धोका पोहोचतो तर तो फक्त मानवामुळे... आपण केलेल्या या चूका आपल्यालाच सुधाराव्या लागतील. म्हणूनच या पर्यावरण दिनानिमित्त आपण एक तरी झाड लावून येणाऱ्या पिढीला ऑक्सिजनयुक्त पृथ्वी दिली पाहिजे. असं पर्यावरण संरक्षक प्रकाश भोईर यांनी सांगितले.