Home > मॅक्स ब्लॉग्ज > विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
X

आषाढी एकादशी महासोहळा असल्याने पंढरपूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे तेथील परिसर पांडूरंगाच्या नामघोषात धूमधूम ला आहे. जवळपास दर्शन रांगेतील दहा पत्रा शेड भाविकांनी भरून गेले आहेत. पाच किलोमीटर दर्शनासाठी रांग लांब गेली आहे. त्याचबरोबर विठूरायाच्या दर्शनाला दहा ते बारा तासांचा कालावधी सध्या लागत आहे. आषाढी एकादशी दिवशी हा कालावधी अधिक वाढण्याची शक्यता आहे येणारे भाविक वर्तवत आहेत. यापरिसरात फुलांचा बाजार भरला असुन फुलांमधुनच वेगवेगळे डेकोरेशन केलेले दिसुन येत आहे. विणा, मृदंग, हारमोनियम अशा अनेक वाद्याचें फुलांमधून चित्रण करण्यात आलेल पाहायला मिळत आहे.

Updated : 28 Jun 2023 3:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top