10 Minute Delivery Banned : १० मिनिट डिलिव्हरी बंद तरी दहशत कायम!
“दहा मिनिटात” डिलिव्हरी : ग्राहक सेवा नाही. गिग वर्कर्स वर दहशत बसवणे हा इरादा होता. तो तसाच राहणार - संजीव चांदोरकर
X
10 Minute Delivery Banned “दहा मिनिटात” डिलिव्हरी : ग्राहक सेवा नाही. Gig Workers गिग वर्कर्स वर दहशत बसवणे हा इरादा होता. तो तसाच राहणार आहे ! हे Model मॉडेल बंद करणार असल्याच्या बातम्या आहेत. पण ही सुविधा ग्राहकांसाठी नव्हतीच, ती गिग वर्कर्सवर कॉर्पोरेट भांडवलाची दहशत बसवण्यासाठी होती. मूळ मुद्दा ती दहशत तशीच राहणार का हा आहे ! Quick commerce industry
कालच्या बातमीप्रमाणे गिग वर्करच्या संपानंतर, government सरकारकडून आलेल्या दडपणानंतर, Blinkit and Swiggy ब्लिंकिंट, स्विगी यांनी त्यांची दहा मिनिटात डिलिव्हरी देण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असेलच तर त्याचे स्वागत. gig worker strike ग्राहकाच्या एखाद्या गंभीर व्याधीवर/ आजारावर / ट्रीटमेंट साठी अमुक एक मिनिटात जीवनदायी औषध वा तत्सम वस्तू पोचली पाहिजे हा आग्रह समजण्यासारखा आहे. ही परिस्थिती सोडून दररोजच्या वापराच्या कोणत्याच गोष्टी अशा नाहीत की त्या कमीत कमी मिनिटात ग्राहकाला मिळाल्या पाहिजेत.
Let me repeat. कोणतीही वस्तू त्या विशिष्ट मिनिटाला मिळाली नाही तर कोणीही ग्राहक मरत नसतोय.
ग्राहकाला १२ वाजता खायचे असेल, आणि त्याला माहिती दिली की बाबा जिन्नस पोचायला किमान एक तास लागणार आहे तर तो त्याप्रमाणे प्लॅनिंग करेल. गूगल मॅप वर तर लाल रेषा बघून Estimated Time एका क्षणात मिळतोय. तंत्रज्ञान आहे. पण इरादा वेगळा आहे. किती ग्राहक….. “क्ष” कंपनी अर्ध्या तासात माल देते आणि “य” कंपनी दहा मिनिटात देते, या निकषावर “य” कंपनीकडे ऑर्डर देत असेल ?
ग्राहक त्यांचे आवडते ब्रँड, मालाची गुणवत्ता व किंमत या निकषांवर कोणाला ऑर्डर द्यायची ते ठरवते. त्याला दहा मिनिट ऐवजी अर्ध्या तासात माल मिळणार असेल तरी तो आपला ब्रँड किंवा काय खायचे त्याचा निर्णय बदलणार नसतो. डिलिव्हरी बॉईजना मिळणारा मेहनताना किती डिलिव्हरी केल्या यावर ठरणार असेल तर जास्त डिलिव्हरी करण्यासाठी तेवढा इन्सेन्टिव्ह पुरेसा आहे. त्यातून गिग वर्कर्सना आपल्या वेळेचे, व्यक्तिगत कामांचे, शारीरिक तक्रारींचे व्यवस्थापन करण्यास अवकाश प्राप्त होईल. त्यांना कमी धापा लागतील. मानसिक ताण कमी होईल.
असे जर असेल तर अमुक मिनिटात डिलिव्हरी या आयडिया मागील रॅशनल काय ? त्याचे रॅशनल आहे या सर्व कॉर्पोरेटना गिग वर्कर्सना अमानवी शिस्तीच्या दहशतीखाली ठेवायचे आहे. दहा मिनिटात डिलिव्हरी मॉडेल बंद केले तरी ते रॅशनल बदलणार नाहीये. ठरलेल्या मिनिटांमध्ये ग्राहकाला माल पोहोचवला नाही तर आपले रेटिंग कमी होईल, आपला मेहनताना कापला जाईल, आपल्याला ब्लॉक केले जाईल, आपली मिळकत बंद झाली की आपल्या कुटुंबांची, लहान मुलांची आबाळ होईल…. तुम्हीच कल्पना करून तर बघा. त्या माणसाच्या शरीरातील नसा, स्नायू, रक्तवाहिन्या सतत किती तणावात असू शकतात.
मानवी श्रमाला जिवाच्या आकांतात ठेवले की वर्कर्स संघिटत व्हायला घाबरतात, मिळेल ते वेतन घ्यायची तयारी ठेवतात. कंपनीच्या गेट बाहेर हजारो बेकारांची रिझर्व्ह आर्मी हे या सिस्टीमच्या भात्यातील अजून एक हत्यार !
त्यातून मानवी श्रमाकडून जास्तीत जास्त वाटा कॉर्पोरेट भांडवलाला आपल्या खिशात घालता येतो. श्रमिकांवर अमानुष आणि अविवेकी दहशत बसवण्याचे, गिग वर्कर्स काही पहिले उदाहरण नाही. ऍमेझॉनच्या जगभरच्या गोडाउन्स मध्ये हेच होत आहे. अगदी आपल्या मारुती कंपनीच्या गुरुगावच्या मानेसर मध्ये झालेला हिंसाचार कामगारांना टॉयलेटसाठी देखील जाणे कठीण केले गेल्यामुळं झाला होता. किंवा ॲप बेस घरकाम करणाऱ्या बाया देणाऱ्या कंपन्या आज हेच करत आहेत.
दहशत!
ह्युमन रिसोर्स व्यवस्थपनाचे खूप पुरातन सिक्रेट आहे हे: दहशत !
पूर्वी ऐयाशी सरंजामदार गुलामांवर दहशत बसवायचे. आता उच्चशिक्षित, सुटेड बुटेड कॉर्पोरेट व्यवस्थापक तेच करत आहेत.
संजीव चांदोरकर
अर्थतज्ज्ञ






